अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकाना बदली
करुन घ्यावयाची आहे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त जागा म्हणुन दाखवण्यात येणार आहेत.
हा नविन बदल झालेला आहे.ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकास बदली हवी आहे त्यांनी आपले नाव आगोदरच द्यावयाचे आहे. आपन बदलीसाठी नाव दिल्यास आपले पद रिक्त दाखवण्यात येणार आहे.
(उणीव संवर्ग ०१/०२ मधील एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील जागा मागितली आणि त्या शिक्षकाची बदली पसंतीक्रमात दिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत झाली तर त्या अवघड क्षेत्रातील शाळेतील बदली इछुक शिक्षक बदली अर्ज करण्या आगोदर विस्थापित होइल. आणि बदली इछुक शिक्षकाने बदलीमध्ये पसंतीक्रम देवुन सुद्धा पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर तो परत विस्थापित होइल. आणि त्याची जागा भरल्यामुळे त्याला प्रशासनामार्फत शाळा द्यावीच लागेल. इथ थोडा गोधळ उडणार आहे. ही या बदली धोरणातील उणिव राहणार आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकाने दिलेल्या पसंतीक्रमामधील शाळा मिळेलच असे काही नाही आणि तो बदली इछुक आसल्यामुळे त्याची जागा रिक्त दाखवल्यामुळे तो बदलीच्या आगोदरच विस्थापित होइल हा शिक्षक विस्थापित झाल्यानंतर या विस्थापित शिक्षकास पदस्थापना कशी द्यायची याचा उलगडा कोठेही नाही कारण हा शिक्षक बदलीच्या आगोदरच विस्थापित होणार आहे त्यामुळे बदली इछुक यादीमध्ये नाव द्यावे की नाही याच विचारात तो राहु शकतो.)