डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती योजना....

 देशातील एआयआयएमएस, आयआयएम, आयआयआयटीएस, एनआयटी, आयआयएससी आणि आयाएसईआर या शैक्षणिक संस्थामध्ये  शिकण्यासाठी शिष्टवृत्ती मिळते.


संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी आहे. अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती  योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

बारावीत किमान 55 टक्के गुण हवेत

पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथलय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क ही देण्यात येते. सदर शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह 11 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com या ईमेल वर पाठवावे. त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करण्यात यावा.

दिव्यांग शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

नागपूर : शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन महाडिबीटी प्रणाली मार्फत अंमलबजावणी करण्यात आली असून त्यानुषंगाने यावर्षी जिल्हा पातळीवर शालांत मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याची अंमलबजावणी 28 फेब्रुवारीपर्यंत होती. आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन डिबीटी अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 31 मार्चपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नियोजित वेळेत सादर करावे, 

शिक्षक बदलीबाबत महत्त्वाची माहिती #teachertransfer,

 बदली अपडेट ....


शिक्षक बदली सॉफ्टवेअरसाठी* विकास पथक (https://www.vinsys.com) आणि सातारा आणि पुणे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात आज पुण्यातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात बैठक झाली. 



सॉफ्टवेअर प्रणालीच्या विकासात झालेल्या प्रगतीचा आढावा पुणे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला.

  • सॉफ्टवेअर सुरक्षा, उपयोगिता आणि जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करेल.
  •  सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना एकावेळी एका उपकरणावरून लॉग इन करण्यास अनुमती देईल आणि प्रत्येक लॉगिनमध्ये IP पत्ता आणि लॉग संग्रहित असेल. 
  • ब्लॉकचेनची संकल्पना लागू करताना, ऑडिट लॉग एकमेकांशी जोडले जातील, ज्यामुळे एकल एंट्री सुधारणे अशक्य होईल. 
  • डेटामधील प्रत्येक बदल ट्रेस करता येण्याजोगा असेल आणि ज्या व्यक्तीच्या डेटामध्ये बदल केला गेला आहे त्या व्यक्तीला दृश्यमान असेल, जरी एखाद्या प्राधिकरणाने त्यात बदल केला असेल. 
  • प्रत्येक सबमिशनसाठी *6 अंकी OTP* द्वारे अधिकृतता आवश्यक असेल. सॉफ्टवेअर वापरात आणण्यापूर्वी, सॉफ्टवेअरचे सुरक्षा ऑडिट करण्यासाठी मान्यताप्राप्त तृतीय-पक्ष एजन्सीद्वारे *सुरक्षा ऑडिट* केले जाऊ शकते.



सॉफ्टवेअर हे शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि राज्य सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यासपीठ आहे - कोणत्याही प्राधिकरण किंवा व्यक्तीच्या हस्तक्षेपास वाव नाही. कार्यपद्धतीमध्ये *भूमिका-आधारित विभाजन* असेल, त्यामुळे प्रत्येक अधिकारी फक्त त्याची भूमिका बजावू शकतो आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.



हे सॉफ्टवेअर *मराठी आणि इंग्रजी* भाषांमध्ये उपलब्ध असेल. *संगणक किंवा मोबाईल* फोन वापरून सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. *कार्यक्षम प्रवेश* आणि *सुलभ नेव्हिगेशन* ला अनुमती देण्यासाठी प्रत्येक स्क्रीनवर मर्यादित माहिती असेल. *वेबसाईट अपंग व्यक्तींसाठी अनुकूल बनवण्यासाठी देखील पावले उचलली जात आहेत.* सर्व्हरची रचना अशा प्रकारे केली जात आहे की प्रतिसाद वेळ तीन सेकंदात असेल.


बदली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा डेटा *इतर प्रत्येक शिक्षकाला* दिसेल. शिक्षक *प्रणालीमध्ये त्यांचा डेटा बदलण्याची* विनंती करू शकतात आणि इतर शिक्षकांनी चुकीची माहिती प्रविष्ट केली असल्यास आक्षेप देखील नोंदवू शकतात. सर्व शिक्षक आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट *डॅशबोर्ड* दाखवले जातील; सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती असलेला एक स्पष्ट *सूचना फलक* आहे.


असा अंदाज आहे की हस्तांतरण सूची अंतिम करण्यासाठी सॉफ्टवेअर किमान 2.5 दिवसांसाठी *एकाधिक पुनरावृत्ती* आयोजित करेल.


सर्व सहभागींचा डेटा *शालार्थ आणि सरल* पोर्टलवरून प्राप्त केला जाईल. म्हणून, सर्व शिक्षकांना विनंती आहे की ताबडतोब *डेटा अपडेट करा* - विशेषतः त्यांचे आधार क्रमांक, नवीनतम फोन नंबर आणि सेवा रेकॉर्ड सत्यापित करा. सॉफ्टवेअर लाइव्ह होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांना *कठीण किंवा अवघड नसलेल्या* भागातील शाळा कार्यान्वित करण्यासाठी घोषित करण्याची विनंती केली जाते.




7 एप्रिल 2021 च्या सरकारी ठरावानुसार सॉफ्टवेअर विकसित केले आहे की नाही याची *तपासणी* करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या *3 व्यक्तींना* आमंत्रित करण्याची समितीची योजना आहे? एक हॅकाथॉन आयोजित केली जाईल ज्याद्वारे आम्ही सिस्टममधील कोणत्याही सुरक्षा त्रुटी ओळखण्यात आणि त्या दुरुस्त करण्यात सक्षम होऊ. सॉफ्टवेअरच्या वापराबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तयार केला जाईल.


हे सॉफ्टवेअर *अत्यंत खबरदारी* आणि *वेगवान गतीने* विकसित केले जात आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच वेबसाइट सुरू होईल आणि वेळापत्रकानुसार शिक्षक बदल धोरण लागू केले जाईल.

                           


शाळा प्रवेश वयात बदल जाणून घ्या...#school,

 नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय किती असावं हा काही गेल्या वर्षांपासून चाललेला घोळ अखेर सरकारने मिटवला आहे. 




शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी (school admission)  बालकांचे किमान वय(age) किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आलं आहे. 


यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने, ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने, सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे.



याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता बदल करण्यात आला आहे.

जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. 

त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.

आधार आधारित संच मान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन...

 सन २०२१ -२०२२ चे शिक्षक समायोजन हे आता संच मान्यता आधारित तेही सरल पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार आहे.



 पोर्टलवर (portal) विद्यार्थ्याचे आधार (adhar) नोंद क्रमांक नोदणी करणे करिता दि. ३१.०३.२०२२ पर्यत मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करिता करावयाच्या योग्य त्या उपाययोजना आयुक्त (शिक्षण) यांनी निश्चित कराव्यात व त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश आले आहेत. 

यानंतरच दि. ३१.०३.२०२२ अखेर सरल पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन २०२१-२०२२ ची संच मान्यता दि. १५.०४.२०२२ पर्यत अंतिम करण्यात यावी.


सदर अंतिम संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही दि. ३१.०५.२०२२ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. वरील प्रमाणे आवश्यक सूचना तातडीने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी व शाळाव्यवस्थापक/मुख्याध्यापक यांच्या निर्दशनास आणून त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी असेही आदेशात म्हटलेले आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाल...

 ई-श्रम कार्ड पोर्टल




असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.


एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.

पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.

मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other details वर क्लिक करायचं आहे.

आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yes नसाल तर no वर टिक करायचं आहे.

त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.

त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.