डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती योजना....

 देशातील एआयआयएमएस, आयआयएम, आयआयआयटीएस, एनआयटी, आयआयएससी आणि आयाएसईआर या शैक्षणिक संस्थामध्ये  शिकण्यासाठी शिष्टवृत्ती मिळते.


संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी आहे. अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती  योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

बारावीत किमान 55 टक्के गुण हवेत

पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथलय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क ही देण्यात येते. सदर शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह 11 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com या ईमेल वर पाठवावे. त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करण्यात यावा.

दिव्यांग शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

नागपूर : शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन महाडिबीटी प्रणाली मार्फत अंमलबजावणी करण्यात आली असून त्यानुषंगाने यावर्षी जिल्हा पातळीवर शालांत मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याची अंमलबजावणी 28 फेब्रुवारीपर्यंत होती. आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन डिबीटी अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 31 मार्चपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नियोजित वेळेत सादर करावे, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: