डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

लगबग शाळेची गीत ...राजपूत प्रकाशसिंग

गेली दोन वर्षे  कोरोनाने शिक्षणाची फार दैना केली आता मात्र विद्यार्थी नव्या आशेने शाळा उघडण्याची वाट पहात आहे यावरच लिहिलेले हे काव्य ...

 कुणी गीत बनवू इच्छित असाल तर स्वागत 

     गीतलेखन     प्रकाशसिंग राजपूत 

               औरंगाबाद  9960878457 



 

लगबग लगबग ओढ शाळेची आता...


शाळेची घंटा वाजण्याची होती चिंता,

वर्षामागे वर्ष करोनाने वाया जाता,

रोहीण्या येता मनी उत्सव नवा सजता,

लगबग लगबग ओढ शाळेची आता .....



सुट्टीचा मनास लोभ खूप होता,

आता मात्र नको रे देवा पुन्हा  ही थट्टा,

अभ्यास  गेला वाहून पुर जसा येता,

खूप  शिकायचं स्वप्नं सत्यात यावं आता...


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



खुलेल शाळा बहरुन आम्ही जाता,

शिक्षणाची शिदोरी पुन्हा मिळता,

तेज नवा आम्हा बालकांना येता,

घरोघरी दीप ज्ञानाचा दिसेल पेटता,


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....


खेळात नव्हता  रस काही उरता,

शाळेच्या गप्पांची उणीव राहता,

बालकांचा शत्रू करोना कसाच होता,

देवारं आस नव्याने घेतोय आता....


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



     *प्रकाशसिंग राजपूत*

           औरंगाबाद

        9960878457


 

सेतु अभ्यासक्रम व चाचणी

 सेतु पुर्नरचित अभ्यासक्रम चाचणी सन २०२२-२३ बाबतचे नियोजनबाबत खालील पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.






 

जुलैत ४% महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

 सरकार जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता  वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 



या दरम्यान, महागाई भत्त्यामध्ये  4 टक्के वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापासून केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 दरम्यान, सलग दोन महिने एआयसीपीआय इंडेक्स  कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन 125.1 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत 125 अंकावर आला होता. पण मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स एक अंकाने वाढून 126 वर पोहचला. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची चर्चा आहे. 


राष्ट्रीय पुरस्कार निवड प्रक्रिया १ जूनपासून सुरु 



सरकारने यावर्षी सुरुवातीला 3 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए 38 टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता.

केंद्र सरकार पीएम श्री शाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे

 विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार पीएम श्री शाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी सांगितली आहे .


केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान म्हणाले की, आम्ही पीएम श्री शाळा स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहोत, ज्या विद्यार्थ्यांचे भविष्य तयार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज असतील. ते म्हणाले की या अत्याधुनिक शाळा NEP 2020 साठी प्रयोगशाळा म्हणून काम करतील.



प्रधान म्हणाले की, शालेय शिक्षण हा पाया आहे ज्यावर भारत ज्ञानाची अर्थव्यवस्था बनेल. ते म्हणाले की, 21 व्या शतकातील आपल्या नवीन पिढीचे ज्ञान आणि कौशल्य आपण हिरावून घेऊ शकत नाही. मी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेकडून पीएम श्री शाळांच्या रूपात भविष्यातील बेंचमार्क मॉडेल तयार करण्यासाठी सूचना आणि अभिप्राय आमंत्रित करत आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करताना, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.

एकमेकांच्या अनुभवातून आणि यशातून शिकले पाहिजे, जेणेकरून शिकण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. अधिक दोलायमान बनवा आणि भारताला अधिक उंचीवर नेऊ. ते म्हणाले की, जागतिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेली ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून भारताला प्रस्थापित करण्यासाठी पुढील 25 वर्षे महत्त्वपूर्ण आहेत.

शालेय शिक्षणाचे हायब्रीड माॕडेल विकसित करा ... मा.पंतप्रधान मोदीजी...

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या 5+3+3+4 दृष्टिकोनामध्ये प्री-स्कूल ते माध्यमिक शाळा, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन प्रोग्राम (ECCE), शिक्षक प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण, कौशल्यावर भर देणे यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षणासह. विकासाचे एकत्रीकरण आणि प्राधान्य इ. मातृभाषेतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हे 21व्या शतकातील जागतिक नागरिक तयार करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

आंतरजिल्हा बदल्यासाठी आता ही अट...

या पूर्वीच्या बदली टप्प्यांमध्ये 10 टक्के ही अट ठेऊन बदली प्रकिऱ्येतून असे जिल्हे वगळले होते ती बाब एप्रिल 2021 gr मध्ये नाही असे शासन vinsys व टीम ला कळवते आहे. सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल बदली होईल पण कार्यमुक्त पुन्हा सदर बिंदू भरती झाल्यानंतर होईल...


त्यानुसारच आंतरजिल्हा बदली होणार आहे जीआर आपण खाली पाहू शकतात.