डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जुलैत ४% महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

 सरकार जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता  वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान, महागाई भत्त्यामध्ये  4 टक्के वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापासून केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 दरम्यान, सलग दोन महिने एआयसीपीआय इंडेक्स  कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन 125.1 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत 125 अंकावर आला होता. पण मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स एक अंकाने वाढून 126 वर पोहचला. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची चर्चा आहे. 


राष्ट्रीय पुरस्कार निवड प्रक्रिया १ जूनपासून सुरु सरकारने यावर्षी सुरुवातीला 3 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए 38 टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: