जिल्हातंर्गत बदलीबाबत आजचा महत्त्वाचा व्हिडीओ विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात vinsys कडून मार्गदर्शक व्हिडीओ पहा....
जिल्हातंर्गत बदलीबाबत आजचा महत्त्वाचा व्हिडीओ विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात vinsys कडून मार्गदर्शक व्हिडीओ पहा....
भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडूंसोबत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी साधलेला हा संवाद व्हिडिओ स्वरूपामध्ये पाठवत आहे.
विद्यार्थ्यांना हा माहितीपट म्हणून जर दाखवण्यात आला तर खेळाडूंचा विषयी त्यांच्या मनात निश्चित नवीन आदर निर्माण होणार आहे यासाठी खालील लिंक ला आपण व्हिडिओला क्लिक करायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून अंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलम्पिक मध्ये भारताचं नाव मोठं करणारे या खेळाडूंचा गौरव होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय सुद्धा होईल.
आरोग्य आणि शिक्षणासाठी 2021-22 यावर्षी देशभरातून केंद्र सरकारकडे 47 हजार 307.70 करोड इतका उपकर जमा झालेला आहे.
यासंदर्भात शिक्षण क्षेत्र आणि राजकीय पक्षांनी सरकारला जाब विचारला आहे की, अब्जावधी रुपये शासनाकडे जमा होऊन सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार खर्च करत नाही.
मात्र शिक्षण उपकर हा केवळ शिक्षणाच्या कामासाठीच खर्च केला जाईल, अशी महत्वाची दुरुस्ती देखील केंद्र सरकारने केली आहे.
राज्याच्या प्रत्येक व्यक्तीकडून दर दिवशी प्रवास असो कोणताही खर्च असो त्यामधून शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रस्ते व सुविधेकरीता, शेती योजनांसाठी उपकर घेतला जातो. आणि हा उपकर जमा होऊन केंद्र शासनाकडे तो गोळा होतो. केंद्र सरकारने 25 दिवसांपूर्वी यामध्ये बदल करत शिक्षण उपकर हा केवळ शिक्षणाच्या कामासाठीच खर्च केला जाईल, अशी तरतूद केली.
शिक्षण उपकराद्वारे सरकारकडे अब्जावधी रुपये जमा होतात तरी नवीन शाळांना मूलभूत सुविधा व नवीन शिक्षक भरती सरकार करत नसल्याचा आरोप नेत्यांनी केलेला आहे.
शिक्षण उपकर रोजगार हमी उपकर कायदा राज्यामध्ये 1962 पासून लागू झालेला होता.
२१ व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करुन देत असतांना एकीकडे आॕनलाईन कामांचा होत असलेला भडीमार फारच चिंतनीय आहे.
जि.प.शिक्षकांची हीच व्यथा खूपच सुरेख पद्धतीने शाॕर्ट फिल्म स्वरूपात मांडली ती माझे मित्र व राष्ट्रीय पुरस्कार तथा ICT पुरस्कार विजेते खुर्शीद शेख सरांनीसर डिजिटल स्कूल गडचिरोली समूहाचे ते कृतिशील सदस्य आहेत याचा निश्चितच अभिमान आहे.
संकलन
प्रकाशसिंग राजपूत
समूहनिर्माता
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
शाॕर्ट फिल्म पहा ....👇