डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अत्युत्कृष्ट कामगिरी बाबत वेतनवाढ

 शासन सेवेत असताना अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणा-या शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या गोपनीय •अहवालाची प्रतवारी विचारात घेऊन दोन अथवा एक आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना अस्तित्वात होती. सदर योजनेच्या कार्यपध्दतीच्या विविध तरतूदी एकत्रित करण्याच्या उद्देशाने दिनांक १४.१२.२००६ नुसार शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले.




राज्य वेतन सुधारणा समितीने, सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा अहवाल दि.२०.१२.२००८ रोजी शासनास सादर केला होता. सदर अहवालातील परिच्छेद ३.२४ नुसार पीबी-४ व्यतिरिक्त इतर वेतनबैंड मधील ५ टक्के अधिकारी / कर्मचा-यांना अत्युत्कृष्ट कामासाठी ३ टक्के या साधारण दराने देण्यात येणा-या वेतनवाढीऐवजी ४ टक्के दराने वेतनवाढ मंजूर करावी. 

अशी वेतनवाढ संबंधित कर्मचा-यांना ५ वर्षातून एकदा मंजूर करावी. यापुढे वरीलप्रमाणे उच्च दराने वेतनवाढ मंजूर करण्यात येणार असल्यामुळे सध्याची एक किंवा २ आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची पध्दती बंद करण्यात यावी. या संबंधात सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी अशी शिफारस समितीने केली होती.


जी.आर डाऊनलोड करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: