डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

ISRO तर्फे आता विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ISRO आता विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे.



इयत्ता 8 वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. इस्रोच्या स्पेस क्युरिऑसिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. इस्रोच्या विविध केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे वर्ग घेणार आहेत.

शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे.

विद्यार्थ्यांना सहज अवगत होईल ISRO Free online  Education अशी सोपी भाषा चित्र आणि अॅनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे यात रिमोट सेन्सिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन  जिओ स्टेशनरी आणि सूर्य-समकालिक उपग्रह रिमोट सेन्सरचे प्रकार आणि मल्टीस्पेक्ट्रल स्कैनर या सारख्या विषयांचा समावेश असेल,

असा करा अर्ज – (ISRO Free online Education)

इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी या https://jigyasa.iirs.gov.in/login अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. इथे विद्यार्थ्यांनी तुम्हाला विचारलेली काही महत्वाचे तपशील भरायची आहेत.

विद्यार्थ्यांनी तुम्हाला विचारलेली काही महत्वाचे तपशील भरायची आहेत विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीबरोबरच शाळेचा तपशीलही विचारले (ISRO Free online  Education) जातील. तुमची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल.


सातव्या आयोगाचे फरकाचे हप्ते मिळणार

 आज दि १४ फेब्रुवारी च्या पत्रानूसार फेब्रुवारी २०२३ च्या वेतन व सातवा वेतन आयोगाचा राहीलेला पहिला, दुसरा हप्ता तसेच तिस-या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने त्यानुसार माहे फेब्रुवारी २०२३ चे वेतन देयकामध्ये लेखाशीर्ष  ची देयके ऑनलाईन महागाई भत्त्यासह व सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्ता काढण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहे. 




लेखाशीर्षामध्ये दि. १०/०२/२०२३ रोजीच्या बैठकीतील आढाव्यानुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अनलाइन काढणे पर्याप्त तरतूदीअभावी शक्य नसल्याने फक्त फेब्रुवारी २०२३ नियमित वेतन देयक व महागाई भत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचा-यांचे नियमित वेतन काढण्यात यावे असे पत्रात नमूद केलेले आहे.

संपूर्ण मराठवाडयातील संवर्ग १ ची तपासणी होणार

 जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळावं म्हणून बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या घटनेची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या धर्तीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्हा परिषद यांना पत्र पाठवण्यात आले आहे. 







ज्यात संवर्ग 1 मधून बदली वा सूट मिळविलेल्या गुरुजींची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्ग 1 मधून बदली झालेले तसेच सूट मिळविलेल्या गुरुजींची स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एवढेच नाही तर प्रमाणपत्रांची पडताळणीही करण्यात आली. यातून तब्बल 70 हून अधिक शिक्षक दोषी ठरविण्यात आले आहेत. 

यानंतर त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर विभागीय चौकशीही प्रस्तावित केली आहे.

 दरम्यान बीडच्या धर्तीवर संवर्ग 1 मधील शिक्षकांची  वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी करावी, असे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले आहेत. संबंधित कार्यवाहीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही नमूद केले आहे.

पंजाबचे शिक्षक अशैक्षणिक कामे करणार नाहीत

 

पंजाबचे शिक्षक  शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा पंजाबचे  मुख्यमंत्री  भगवंत मान यांनी केली आहे.



निवडणूक आयोगानं  नुकतीच पंजाब शासनाकडे जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. पण या कामासाठी  शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा सवाल मुख्यमंत्री  यांनी उपस्थित करत  जनगणनेच्या कामाला शिक्षकांना लावण्यास नकार दिले. राज्यात शिक्षकांची दिली जाणारी शिक्षणबाह्य कामे बंद करावी ही मान यांची प्रमुख मागणी आहे.

महाराष्ट्रात  अशैक्षणिक कामांचा बोजा....

अनेकदा शिक्षकांना शाळेबाहेरील अशैक्षणिक कामे दिली जातात. 

 शिक्षकांना जनगणना, निवडणूक मतदार नोंदणी यासारखी 150 हून अधिक प्रकारची कामे करावी लागतात. त्यामुळं शिक्षकांवरील अतिरीक्त कामाचा ताण कमी करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून अनेकदा  करण्यात आलेली आहे. 

शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. राज्य शासनाकडून शिक्षकांवर अशी कामे लादली जातात. शिक्षक संघटना त्यास विरोध करतात. अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलते किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा भार नेहमीच अधिक असल्याचे दिसून येते.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार नाहीत, असे परिपत्रकही शासनाने 2013 मध्ये काढले होते. त्यावेळी शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. 

किमान यापुढे तरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळ देता येईल आणि मुलांचा विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, शासनाचा हा निर्णय फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच निर्णय बदलत शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावीच लागतील असे परिपत्रक काढण्यात आले. शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, निवडणूक, सर्वेक्षण अशी विविध अशैक्षणिक कामे करणेही भाग पडते. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहणे, लसीकरण मोहिम राबवणे, सरकारी खात्यातील विभागांना मदत करणे यासारखी कामांचाही समावेश आहे.




बदली अपडेट

बदली अपडेट महत्त्वाचे ....


  *संवर्ग ०४ मधील शिक्षकाना कळविण्यात येते की , संवर्ग ०४ मधील  फेरी ०१ मधील विस्थापित शिक्षकाना फेरी २ मध्ये अर्ज करण्यासाठी १ दिवस वाढवून देण्यात आलेला असून  आपले बदली अर्ज ऑनलाइन करुन घ्यावेत.


*आता दि १२-०२-२०२३  रोजी रात्री ठीक १२:०० वाजता बदली पोर्टल बंद होत आहे .*

*आपण आपला अर्ज ऑनलाइन केला असेल आणि जर आपणास आपला अर्ज चुकला आहे असे वाटत असेल किंवा पसंतीक्रमामध्ये बदल करायचा असेल तर आपला ऑनलाइन केलेला अर्ज विड्रॉ करुन परत पसंतीक्रम अद्ययावत करुन आपला अर्ज सबमिट करु शकता.



  *जर आपण अर्ज केला नाही तर आपली बदली याच फेरीमध्ये  रॅंडम राउंड ने दुर्गम क्षेत्रातील रिक्त पदावर होवु शकते याची गंभिर्याने नोंद घ्यावी.*