जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळावं म्हणून बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या घटनेची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या धर्तीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्हा परिषद यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
ज्यात संवर्ग 1 मधून बदली वा सूट मिळविलेल्या गुरुजींची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्ग 1 मधून बदली झालेले तसेच सूट मिळविलेल्या गुरुजींची स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एवढेच नाही तर प्रमाणपत्रांची पडताळणीही करण्यात आली. यातून तब्बल 70 हून अधिक शिक्षक दोषी ठरविण्यात आले आहेत.
यानंतर त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर विभागीय चौकशीही प्रस्तावित केली आहे.
दरम्यान बीडच्या धर्तीवर संवर्ग 1 मधील शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी करावी, असे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले आहेत. संबंधित कार्यवाहीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही नमूद केले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.