डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

याडं की खुळं गीत...

 🤣  *नक्कीच तुमच्या आजूबाजूला अशा प्रवृत्ती वावरत असतील...😇😄*

व्यंगात्मक गीत...


*तर ऐका... व जास्तीत जास्त शेअर करा...*




https://youtu.be/75GLH4smJFQ



पुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कूल' सुरु होणार

  देशात नवीन शैक्षणिक धोरण आता राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून उच्च व तंत्र शिक्षणासह इतरही सर्व प्रकारचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांचा ओघ वाढणार आहे. मराठी मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करणार...


शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ (सेलिब्रिटी) इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व आदी कला शिकवतील. त्यानंतर स्पर्धा घेवून पहिल्या १ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेले सेलिब्रिटी या १ हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देतील,

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 'इंद्रधनुष्य २०२३' हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळीतील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. या सोहळ्यात २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला आणि क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.


अवघड क्षेत्रातील बदली अर्ज

 जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील पुढील टप्पा  म्हणजेच अवघड क्षेत्रात करावयाच्या बदल्यासाठी शिक्षकांनी जे फॉर्म भरायचे आहेत .

त्याबाबत आज विन्सिस तर्फे एक मार्गदर्शन पर व्हिडिओ पाठवण्यात आलेला आहे व अर्ज करण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ निश्चित सर्वांनी पहा जेणेकरून पुढील प्रक्रियेत अडचणी येणार नाही.





महाराष्ट्रात लवकरच शिक्षक भरती

 

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची  भरती होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती सभागृहात दिली.



राज्यातील पात्रता  धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.

आमदार राजेश एकडे आणि इतरांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली.



माननीय आयुष प्रसाद साहेब यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻माननीय आयुष प्रसाद  साहेब यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

✍🏻✍🏻✍🏻✍🏻

👉🏼 1)शिक्षक संवर्ग चार 4 साठी त्यांच्या बदल्या करत असताना कुठचीही जागा  समानीकरणामध्ये ठेवू नये. अर्थातच सर्व रिक्त व बदली  पात्र शिक्षकांच्या जागा त्या संवर्ग चार  4 साठी खुल्या करण्यात याव्यात.



 संवर्ग दोन  2

👉🏼2) संवर्ग 2 मध्ये या वर्षी बदली झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत 

या वर्षी ज्यांची संवर्ग 2 मध्ये बदली झालेली आहे अशा पती व पत्नी यांना इथून पुढे किमान 5 वर्षे बदलीपात्र धरण्यात येऊ नये.

 आयुष प्रसाद साहेब यांनी ही मागणी अमान्य केली आहे.

 संवर्ग तीन 3

👉🏼3)विषय - संवर्ग 3 मधील अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना येत्या  बदली प्रक्रियेत एक संधी मिळणेबाबत मागणी करण्यात आली होती

2019 च्या यादीनुसार ज्या शाळा अवघड मध्ये होत्या परंतु 2022 च्या यादीत त्या सुगम मध्ये आल्या आहेत. अशा शाळेतील शिक्षकांना येत्या जिल्हा अंतर्गत बदलीत संधी मिळावी कारण फेब्रुवारी 2023 मधील प्रक्रियेत राज्यातील अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना रिक्त पदे न दाखवल्याने  शिक्षकांनी बदली प्रक्रियेत सहभाग घेतला नाही आणि आज त्यांच्या शाळा सुगम मध्ये आल्यामुळे त्यांना त्याच शाळेत 10 वर्ष काढावे लागणार आहेत. त्यामुळे अशा अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना ज्यांनी यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही अशा शिक्षकांना पुन्हा एक संधी बदली प्रक्रियेत मिळावी ही  विनंती माननीय साहेबांनी मान्य केलेली आहे.


👉🏼4) सामाजिक शास्त्र, भाषा व विज्ञान या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या बदल्या करत असताना त्याची एकही जागा  समानीकरणांमध्ये ठेवू नये. या जागा  समानीकरणांमध्ये ठेवून खाजगी शाळेतील पदवीधर  शिक्षकांना समायोजनामध्ये पदस्थापना  देण्यात आलेली आहे ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधर शिक्षकांसाठी  अतिशय अन्यकारक आहे. यावर  माननीय आयुष  प्रसाद साहेब यांनी याबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये खाजगी प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली या जागावर पदस्थापना देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवणार व जागा ह्या समानीकरणांमध्ये टाकण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे आश्वासन माननीय साहेबांनी शिष्टमंडळास दिले आहे. व तसेच मला अध्यक्ष या नात्याने पुढच्या जिल्हा परिषद मध्ये किती खाजगी शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली पदस्थापना देण्यात आलेली आहे याचा आकडा माहित करण्याचे सुचविले आहे.

👉🏼 5)संवर्ग एक च्या बाबतीमध्ये "एन्जोप्लास्टी चा"शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात यावा अशा प्रकारचे मागणी करण्यात आली होती. अशा अनेक आजारांना संवर्ग एक मध्ये टाकू टाकण्याची मागणी येईल व त्यामुळे संवर्ग 1 एक च्या बदलीचा आकडा फुगलेला दिसेल व त्याचा परिणाम हा संवर्ग एक, दोन,तीन आणि चार वर होणार. यामुळे या आजाराला शासन निर्णयाच्या बदली प्रक्रियेत समावेश करता येणार नाही. असे स्पष्ट सांगितले

👉🏼6) सेवाजेष्ठतेची निश्चित तारीख ही 31 मे ऐवजी आता 30 जून ही धरण्यात येणार आहे. ही अनेक शिक्षकांच्या मागणी होती आणि या मागणीला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य करत न्याय दिला आहे.

 याबरोबर अनेक विषयावर चर्चा झाली.

 यावेळी महाराष्ट्र राज्यातून शिक्षक संघटना समन्वय समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

🌹🌹🌹🌹🌹