डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

तुमची ईस्टेट तुमची आहे का? हे शेजारी ठरवणार का?

 एकच मिशन जुनी पेन्शन या हा नारा घेऊन राज्यातील लाखो कर्मचारी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेले आहे,

दिपीका एरंडे यांचे पेन्शन बाबत महत्त्वाचे वक्तव्य...

तुमची ईस्टेट शेजारी ठरवणार का?



राज्य मीडिया प्रमुख

जुनी पेन्शन संघटना


 शासनाने या सर्वांचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा त्यांच्या या हक्कावरीलच माझी एक रचना आपल्यासमोर सादर करत आहे .निश्चित आपणास आवडल्यास आपण ही जास्तीत जास्त शेअर करावी.

*आवडल्यास पुढे शेअर करा....*


*✊पेन्शन हवी पेन्शन....✊*


*सरकार मायबाप असू दे चिंता,*

*आमच्या कुटुंबाच्या भविष्याची ही,*

*आस साऱ्यास जगण्याची,*

*अधिकार आमचा हिरावून जगी*



*काळ सरता देह दाटतो अंती,*

*नको अंधार जीवन मावळता,*

*ग्रसलो या नियमाने सारेच,*

*उगवता सुर्य पाहू उजळता,*



*मागून हक्क सर्व समानता ,*

*समान कामास मिळे सम सुविधा,*

*जास्त देण्या कायच हा बोजा,*

*वाटतो का हेवा? देण्यास दुविधा...*



*सेवा बजावता वाटे समाधान,*

*चाकरीचे फळ म्हातारपणी,*

*सांभाळ या झिजलेल्या देहाचा,*

*पेन्शन मिळू दे सकलजणी...*



  *प्रकाशसिंग राजपूत*

    🚩छ. संभाजीनगर🚩



ही कविता फारच सुंदर आहे एकच मिशन...पेन्शन


🚩✊🚩 लढतोय आम्ही हक्कासाठी🚩✊🚩

शासकीय दरबारी आम्ही

प्रामाणिक चाकरी करतो

देशाच्या या भावी पिढीला

आम्ही शिक्षक घडवतो


अनेक अशासकीय कामे देऊन

सरकार राबवुन  घेत असते

शिकवणे हेच काम आमचे

त्यावेळी मात्र का विसरते


सगळ्यांना न्याय एक असावा

 विनंती आता करत आहोत

शांततेत राहुन मागण्यांसाठी

 हक्का साठी लढत आहोत


अन्याय आमच्यावर करु नका

सरकारी दरबारी  हवी हमी

आमची ताकद पाहताय तुम्ही

शिक्षकांना लेखु  नका  कमी


मागणी मान्य करुन आम्हाला

समान न्याय  व हक्क द्यावा

एकच पेन्शन या योजनेचा

सर्व कर्मचाऱ्यांना लाभ हवा


कवयित्री 

सुप्रिया इंगळे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





पहा का दिला संघाच्या तालुका अध्यक्षांनी राजीनामा 


पहा का दिला राजीनामा

 

संघाच्या शिलेदाराने संपातून माघार नाही दिला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा....





अवघड क्षेत्र फेरीतील पसंतीक्रम भरणेबाबत

 शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.  अवघड क्षेत्रातील फेरीसाठी शिक्षकांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर कसा भरावा याची माहिती आम्ही देणार आहोत .

अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रात दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष  पूर्ण झालेली आहे. अशा सर्व शिक्षकांची यादी यापूर्वी  विन्सिसने पोर्टलवर जाहीर केली होती .त्या यादीत विशेष संवर्ग एक मध्ये मोडत असलेले व ज्यांना बदलीतून सूट हवी आहे अशा शिक्षकांची नावे होती.
त्यांना बदलीतून सूट घेता यावी यासाठी या फेरी आधी  विशेष संवर्ग येथे अर्ज भरून घेतले होते.
त्यांचे अर्ज पडताळणीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता .ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी होती व ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडून मंजूर झाले अशा शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली .पण ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांनी रद्द केले त्या शिक्षकांची नावे यादी तशीच राहतील. त्यानंतर शिक्षकांची सुधारित यादी पोर्टलवर पुन्हा एकदा प्रसिद्ध होईल अवघड क्षेत्रात जितकी रिक्त पदे असतील तेवढेच शिक्षकांची नावे त्या यादीत असतील यादीच्या शिक्षकांची नावे येतील त्यांना पोर्टलवर आपला पसंतीक्रम देण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिलेला आहे . 
जे शिक्षक आपला पसंती क्रम पोर्टलवर देणार नाही त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर बदलीने नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर भरावा परंतु त्या पसंती क्रमाप्रमाणे साधा उपलब्ध नसतील तर त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल.
पसंतीक्रम भरण्यासाठी -
शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करावे.
त्यातील एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक केले की स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की अर्जदाराचे पूर्ण नाव त्याच्या शालार्थ क्रमांक व विद्यमान शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल त्याखाली सिलेक्ट प्रेफरन्सेस म्हणजे पर्याय निवडा दिलेले आहे. तुम्हाला खाली रेड बॉक्स मध्ये मिनिमम चॉईसेस म्हणजे किमान पर्याय एक व मॅक्झिमम चॉईसेस म्हणजे कमाल पर्याय तीस अथवा उपलब्ध असलेल्या पर्यायांशी संख्या दिसेल तुम्ही कमाल पर्यायांपैकी किती पर्याय निवडले त्याची संख्याही येथे तुम्हाला दिसेल.



खालील ड्रॉप डाऊन मधून तुम्हाला तालुका निवडायचा आहे. व त्याखालील मधून शाळा निवडायची आहे येथे पर्यायाचे बंधन नाही तुम्ही कमीत कमी एक पर्याय निवडून अर्ज सबमिट करू शकता पर्याय निवडून झाल्यावर खाली तुम्हाला एक स्वीकारण स्वीकारावे लागेल त्यात असे नमूद केले आहे की मी दिलेल्या पसंती क्रमाप्रमाणे पद उपलब्ध असेल तर मला त्या जागेवर नियुक्ती मिळेल परंतु माझ्या पसंती क्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसतील तर उपलब्ध जागेवर माझी बदलीने नियुक्ती केली जाईल हे मला मान्य आहे तुम्ही चेक बॉक्स चेक केला की तुम्हाला सेव व सबमिटचे बटन दिसू लागेल तुम्ही तुमचे पर्याय सेव करून ठेवू शकता सबमिट बटन वर क्लिक केले की ओटीपी प्रविष्ट करून फॉर्म सबमिट करू शकता इथे शिक्षकांनी लक्षात ठेवावे नुसता फॉर्म सेव करून चालणार नाही तर तो सबमिट करावा लागेल नाहीतर तुमचा पसंतीक्रम ग्राह्य धरला जाणार नाही ओटीपी प्रवेश करून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे हा अर्ज तुम्ही पुन्हा म्हणजेच मागेही घेऊ शकता करण्यासाठी पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट वर क्लिक करावे आपलिकेशन फॉर्मवर क्लिक केले असता स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की तुम्ही भरलेल्या पसंती क्रमाचा अर्ज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याखाली म्हणजे विकल्प मागे घ्या हे बटन दिसेल त्यावर क्लिक केले असता ओटीपी प्रविष्ट करून तुम्ही तुमचे विकल्प मागे घेऊ शकता व मुदत असेपर्यंत अर्ज पुन्हा भरू शकता अर्ज भरायची मुदत असेपर्यंत पोर्टलवर अर्ज कितीही वेळा भरून ते विट्रो करू शकता परंतु एकदा का तारीख उलटली की नंतर तुम्ही पोर्टलवर सबमिट करावा त्यानंतर पोर्टलवर बदली प्रक्रिया राबवली जाईल व बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून निर्गमित केले जातील 2022 च्या बदलीचे सर्व टप्पे पूर्ण होतील.






आरटीई प्रवेशबाबत

 आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झालेली होती.

 त्याची १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख  १९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.


राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.

यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.

या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.

१७ मार्चपर्यंत मुदत

मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने कळविले आहे

नेमका मोफत प्रवेश कोणास ?

 अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, हे विद्यार्थी मोफत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारावर या गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो. याशिवाय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असावे. कोरोनामध्ये पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवेश मिळणार आहे.

कोणती  कागदपत्रे लागतात ?


- रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल आदी.
- आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला.
- विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला.
- विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.