डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जुनी पेन्शन




 राजस्थान प्रमाणे महाराष्ट्र राज्यात ही पेन्शन लागू होईल का? आपणांस काय वाटते ते मत नोंदवा.... 






  अवघड क्षेत्रात बदली अपडेट


अवघड क्षेत्रातील बदली करिता भरावयाचे पर्याय साठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले  असून.

 यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे 17 मार्चला जिल्ह्यानुसार किती प्रमाणात  फॉर्म भरण्यात आलेले आहे. ते खालील यादीमध्ये दिलेले आहे.

 तरी ज्यांचे पर्याय भरायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर अवघड क्षेत्रातील त्यांचे पर्याय भरून अर्ज सबमिट करावा.




या संघटनेच्या संपात सहभागी न होणाऱ्या पदाधिकारींवर शिस्तभंगाची कारवाई होणार

 ✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻




*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

🙏🏻📜✍🏻

*संघर्ष नको...परंतु सर्व पाहिजे*

    आम्ही सरकारी, निम-सरकारी शिक्षक, कर्मचारी असल्यामुळे आम्हाला आमचे सर्व सेवा विषयक लाभ, सर्व आवश्यक सुविधा मिळायलाच पाहिजे. नव्हे तो आमचा हक्क आहे.  ते हक्क मिळत नसेल तर संघटनांनी आमच्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे, आंदोलने केलीच पाहिजे, संप केलाच पाहिजे... 

   मी मात्र संघर्षात उतरणार नाही. आंदोलन पुकारणाऱ्या नेतृत्वावर कारवाई झाली तरी चालेल. परंतु संपात उतरल्यावर मला मात्र धक्काही लागायला नको. 

    स्वराज्यासाठी- राष्ट्र उभारणीसाठी छत्रपती शिवराय पाहिजेत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पाहिजेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत. प्राग-परंपरा, वाईट रुढी दूर सारून सामाजिक न्यायासाठी महात्मा फुले, सावित्रीब्आई फुले, राजर्षी शाहू महाराज पाहिजेत. त्या-त्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत संकटाला तोंड देत या  लोकांनी आपले कार्य पार पाडले. त्यामुळेच ते महान झाले. हे सर्व आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु आपण कितपत कृतीत आणतो याचा विचार करणे गरजेचे आहे. 

   आमच्या मागण्यासाठी संप केला पाहिजे, आंदोलन का करत नाही. संघटना मूग गिळून बसल्या का. सरकारला विकल्या का असे म्हणणारे आम्ही..! संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारल्यानंतर- शासनाच्या धमक्यांना घाबरून, सोशल मीडियावरून दीड दमडीच्या लोकांकडून टीका होत होत असल्याने शाळेत, कार्यालयात संप सोडून पळून जाण्याची एखाद-दुसरी घटना चर्चेत येत आहे ही शोकांतिका आहे.

श्री संतोष ताठे राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)



   परंतु अनेक ठिकाणी १००% कर्मचारी, शिक्षक संपात आहेत ही सकारात्मकता लक्षात घेत नाही ही शोकांतिका आहे.

   मला जुनी पेन्शन पाहिजे. मला वेतन त्रुटी दुरुस्त करून पाहिजे. मला माझी वैयक्तिक सोय होईल असेच बदली धोरण पाहिजे. विषय पदवीधराची वेतनश्रेणी पाहिजे. मुख्यालय राहण्यातून सूट पाहिजे. आदर्श शिक्षकाची वेतनश्रेणी पाहिजे. १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पाहिजे. उच्च शैक्षणिक अर्हता असल्याने वरचे पद पाहिजे. अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून लागलेली माझी सेवा सर्व लाभासाठी मान्य केली पाहिजे. वस्ती शाळा स्वयंसेवक म्हणून पहिल्या दिवसापासून ची माझी सेवा सर्व गोष्टीसाठी मान्य केली पाहिजे. मला वार्षिक वेतन वाढ पाहिजे. नियमित महागाई भत्ता वेळेवर मिळाला पाहिजे. वाढीव रजा, विशेष सुट्ट्या, बाल संगोपन रजा पाहिजेत. पितृत्व रजा सुद्धा पाहिजे. अपंगत्वाचे सर्व फायदे मिळाले पाहिजे. नियमितपणे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत.       सरकारद्वारे राबवले जाणारे उपद्रवी उपक्रम मला नकोत. अशैक्षणिक कामे नकोत. 

      हे सर्व मिळण्यासाठी मला संघटनेची गरज आहे. संघटनेने माझे प्रश्न घेऊन लढले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. 

   *_मी मात्र संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद न देता संपावर येणार नाही, संपात सहभागी झाल्यावर पळपुटेपणा दाखवून कर्तव्यावर रुजू होण्याचा विचार करतो, घरीच राहतो. केवळ समाज माध्यमावरच व्यक्त होऊन आपली शूरता दाखवतो._*

   अशा प्रकारची नकारात्मक भूमिका, घाबरटपणा हा केवळ चळवळीशी विश्वासघात नसून- यातून आपणच सुरक्षित भविष्याचा विचार न करता आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. आपला आत्मघात करणार आहोत.

    सन्मा. अपवाद वगळता काही प्रसार माध्यमे, कवडीची सामाजिक किंमत नसलेले आयटी सेलचे चे अर्धसाक्षर, संपविरोधी भूमिका घेऊन सरकारकडून काही लाभ मिळतात का याची आस लावून बसलेले तथाकथित समाजसेवक- हे सर्व आज आम्हा कर्मचारी, शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकत आहे.

   मात्र आपल्याला संघर्ष कायम ठेवून, उद्याचा विचार करून संपात आपलाही सहभाग कायम ठेवायचा आहे. 

    १९७८ च्या ५४ दिवसाच्या संपातून मिळवलेले कुटुंब निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढी हे सर्व बंद करण्याचा कुविचार (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि कॉर्पोरेट घराण्याच्या दबावातून) होत असताना, कामगार कायदे बदलवून आमची सुरक्षितता धोक्यात आली असताना- *आपण संघर्षापासून दूर कसे राहू शकतो..?* 

   चळवळीतील प्रत्येकाला विनंती आहे की, आपल्या सहकारी बंधू-भगिनींना हे भयावह वास्तव समजावून सांगा. या आंदोलनातील त्यांचा सहभाग कायम राहण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. जे अजूनही संपात नाही त्यांना त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसदारांचे भविष्य अंधारात जाण्याची स्थिती व धोरण समजावून सांगा. 

    *शिक्षक भारती* च्या सर्व राज्य,विभाग,जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, कुठे नकारात्मक भावना न ठेवता संप यशस्वी झालाच पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे.

     _*शिक्षक भारती चे जे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी प्रत्यक्ष संपात सहभागी नसतील तर अशांच्या नकारात्मक भूमिकेची माहिती घेऊन त्यांच्यावर संघटनात्मक शिस्तभंगाची कारवाई करून पदमुक्त करण्याचाही निर्णय घेतला जाईल.*_

    *शिक्षक भारती* चे *_जे पदाधिकारी स्वतः संपात सहभागी होणार नाहीत किंवा राज्य शाखेकडून सूचना येण्यापूर्वी (अर्थात संप मागे घेण्यापूर्वी) संपातून माघार घेतील अशा कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला भविष्यात तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर कोणतेही पद दिले जाणार नाही._*

   *शिक्षक भारती* च्या *_कोणत्याही तालुका जिल्हा विभाग शाखेला संप  परस्पर मागे घेण्याचा असा नकारात्मक कोणताही निर्णय घेता येणार नाही._* 

   ज्या तालुका, जिल्हा, विभाग शाखा संपविरोधी भूमिका घेतील त्या शाखांच्या नकारात्मक भूमिकेचा गांभीर्याने विचार करून शाखा बरखास्तीचा निर्णय घेतला जाईल.

कळावे...!!

आपण सर्व उपरोक्त बाबीचा विचार करून चं योग्य निर्णय घ्याल या अपेक्षे सह...!


*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

        आपला 

   *संतोष ताठे* 

राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

महिलांना आता अर्ध्या तिकिटात प्रवास

 महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. 



सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. १७.०३.२०२३ पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्या येणार आहे. सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले.

त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.


१ सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत

शयन आसनी, शिवशाही (आसनी) शिवनेरी शिवाई (साधी व वातानुकुलीत) इतर इत्यादी ] बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७/०३/२०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. 

सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या

बसेस करिता देखील लागु राहील.

सदर योजना ही 'महिला सन्मान योजना 'या नावाने संबोधण्यात येत आहे.


सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे. सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.


 ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking)

घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.


सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे विंडो बुकींगव्दारे ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील


अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.

सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले


जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची

रक्कम आकारण्यात यावी.


 मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या


तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)


सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु.१०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु. ५०/- व रु. १००/- मुल्यवगांची जोड तिकीटे देण्यात यावीत. सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.


 लेखाशीर्ष ... 

महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.) १३ ७५ वर्षावरील महिलांसाठी 'अमृत जेष्ठ नागरिक' योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००%


सवलत अनुज्ञेय राहिल.. १४ ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना 'महिला सन्मान योजना' हीच सवलत अनुज्ञेय राहिल.


१५ ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.


सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तराव

एकच मिशनचा दिसतोय परिणाम

 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांची दि. १५ मार्च २०२३ रोजीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. राज्यस्तरावरून दिनांक १० ते १३ मार्च २०२३ या कालावधीत सर्वेक्षण

साहित्य जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आलेले आहे. याबाबतची आवश्यक पूर्वतयारी जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेली होती .

मात्र दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यातील बरेच शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) साठी क्षेत्रीय अन्वेषक (FI) म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 याबाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची दिनांक १५ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन बैठक घेतली असता बरेच शिक्षक संपावर असल्याने सांगण्यात आले. तसेच बऱ्याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले. सदर बाबीचा विचार करता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येवू शकतात असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणारे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण सदर दिवशी होणार नाही. सर्वेक्षणाची पुढील दिनांक आपणास यथावकाश कळविण्यात येईल.असे पत्रात म्हटले आहे.




तुमची ईस्टेट कुणाची छ. संभाजीनगर मध्ये वाघिनीची डरकाळी...