जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांची दि. १५ मार्च २०२३ रोजीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. राज्यस्तरावरून दिनांक १० ते १३ मार्च २०२३ या कालावधीत सर्वेक्षण
साहित्य जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आलेले आहे. याबाबतची आवश्यक पूर्वतयारी जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेली होती .
मात्र दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यातील बरेच शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) साठी क्षेत्रीय अन्वेषक (FI) म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
याबाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची दिनांक १५ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन बैठक घेतली असता बरेच शिक्षक संपावर असल्याने सांगण्यात आले. तसेच बऱ्याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले. सदर बाबीचा विचार करता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येवू शकतात असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणारे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण सदर दिवशी होणार नाही. सर्वेक्षणाची पुढील दिनांक आपणास यथावकाश कळविण्यात येईल.असे पत्रात म्हटले आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.