प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक
दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण..
दक्षणा संस्था, पुणे ही सेवाभावी शिक्षण संस्था असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यासाठी विनामूल्य JEE आणि NEET विषयी निवासी स्कॉलरशिप व Indian Institute of Technology (IIT), National Institute of Technology (NIT) All India Institute of Medical Science (AIIMS) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण विषयक काम करीत आहे.
दरवर्षी किमान ६०० विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि साधारणतः ८०% विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. दक्षणा या संस्थेने आतापर्यंत ७२००+ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत. दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते.
दक्षणा एक वर्षाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
• विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे केली जाते.
सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३ २४ या वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी Joint Dakshana Selection Test (JDST) २०२४ साठी पात्र आहेत. इयत्ता दहावीला विज्ञान व गणित विषयामध्ये आवश्यक गुण पुढीलप्रमाणे आहे. GEN/EWS/OBC: 85%, SC:70%, ST:60%,PD: No Cut off
• तसेच ज्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत..
JDST (Joint Dakshana Selection Test) २०२४ नोंदणी प्रकिया:
पात्र विद्यार्थी http://apply.scholarship.dakshana.org/ दि.३१/१०/२०२३ पर्यंत येथे नोंदणी करू शकतात
• नोंदणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल आणि ३० मिनिटांच्या अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी ईमेल मिळेल.
पात्र विद्यार्थ्यांना JDST- २०२४ परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि डिसेंबर २०२३ पूर्वी त्यांच्याशी संस्थेकडून संपर्क केला जाईल.
• अधिक माहितीसाठी http://www.dakshana.org/jdst या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा +९१७७९८७८६४०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
• JDST परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये आपल्या राज्यातील / जिल्ह्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल.
दक्षणा निवासी शिष्यवृत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने पात्र, गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याबाबत आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात यावी..
प्रशासन कारवाईचा आसुड उगारण्याच्या तयारीत
नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षर सर्वेक्षण २८ आॕक्टोंबर अंतिम मुदत...
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये संघटनांनी बहिष्कार कायम ठेवला आहे. मात्र, याेजना राबविताना कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाने २८ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. त्यानुसार दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘उल्लास’ ॲपवर निरक्षर आणि स्वयंसेवकांची ऑनलाइन जोडणी (टॅगिंग) करायची आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली हाेती. मात्र, शिक्षक संघटनांनी हे काम अशैक्षणिक ठरवत बहिष्कार टाकला हाेता.
राज्यात ऑफलाइन सर्वेक्षणाचे व काही प्रमाणात प्रशिक्षणाचेही कामकाज संघटनांनी बंद पाडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या योजनेचे काम मंदावले हाेते. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षण परिषदेच्या कार्यालय येथे नुकतीच यासंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये दिशा ठरविण्यानत आली आहे.
योजना संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी आणि एससीईआरटीचे संचालक अमोल येडगे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे सर्वेक्षण, ऑनलाइन नोंदणी व टॅगिंग, प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन, जिल्हास्तरीय बैठका यासह योजनेच्या कोणत्याही टप्प्यांवर कामात कुचराई करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कारवाईबाबतचे आदेशही २० ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.
७ वी मुल्यमापन नोंदी
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय.
प्राथमिक शिक्षण हे पायाभूत शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक अशा स्तरांवरील क्षमता आणि कौशल्ये यांचा विकास होऊन एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अपेक्षित असतो. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जातात. बोधात्मक उद्दिष्टे ठरविताना विषयांचा विचार केला जातो, तर भावात्मक उद्दिष्टे ठरविताना अभ्यासेतर कार्यक्रमांचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता व कौशल्ये निर्माण होण्यासाठी त्यांना वेगवगेळे अनुभव दिले जातात व अनेक अध्ययन-अध्यापनपद्धती वापरल्या जातात.
इयत्ता ७ वी मुल्यमापन नोंदी डाऊनलोड करा...
६ वी मुल्यमापन नोंदी
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय.
प्राथमिक शिक्षण हे पायाभूत शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक अशा स्तरांवरील क्षमता आणि कौशल्ये यांचा विकास होऊन एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अपेक्षित असतो. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली जातात. बोधात्मक उद्दिष्टे ठरविताना विषयांचा विचार केला जातो, तर भावात्मक उद्दिष्टे ठरविताना अभ्यासेतर कार्यक्रमांचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता व कौशल्ये निर्माण होण्यासाठी त्यांना वेगवगेळे अनुभव दिले जातात व अनेक अध्ययन-अध्यापनपद्धती वापरल्या जातात.