डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण..

 दक्षणा संस्था, पुणे ही सेवाभावी शिक्षण संस्था असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यासाठी विनामूल्य JEE आणि NEET विषयी निवासी स्कॉलरशिप व Indian Institute of Technology (IIT), National Institute of Technology (NIT) All India Institute of Medical Science (AIIMS) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण विषयक काम करीत आहे. 

दरवर्षी किमान ६०० विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि साधारणतः ८०% विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. दक्षणा या संस्थेने आतापर्यंत ७२००+ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत. दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते.

दक्षणा एक वर्षाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

 • विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे केली जाते.

सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३ २४ या वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी Joint Dakshana Selection Test (JDST) २०२४ साठी पात्र आहेत. इयत्ता दहावीला विज्ञान व गणित विषयामध्ये आवश्यक गुण पुढीलप्रमाणे आहे. GEN/EWS/OBC: 85%, SC:70%, ST:60%,PD: No Cut off

• तसेच ज्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत..

JDST (Joint Dakshana Selection Test) २०२४ नोंदणी प्रकिया:


पात्र विद्यार्थी http://apply.scholarship.dakshana.org/ दि.३१/१०/२०२३ पर्यंत येथे नोंदणी करू शकतात


• नोंदणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल आणि ३० मिनिटांच्या अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी ईमेल मिळेल.

पात्र विद्यार्थ्यांना JDST- २०२४ परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि डिसेंबर २०२३ पूर्वी त्यांच्याशी संस्थेकडून संपर्क केला जाईल.


• अधिक माहितीसाठी http://www.dakshana.org/jdst या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा +९१७७९८७८६४०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


• JDST परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये आपल्या राज्यातील / जिल्ह्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल.


दक्षणा निवासी शिष्यवृत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने पात्र, गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याबाबत आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात यावी..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: