डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट | da hike|

 आजच्या मंत्रिमंडळ  बैठकीत ४ % ने महागाई 
भत्ता वाढणार ?


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ da hike  करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

da hike


काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना महागाई भत्ता ४२ टक्के झालेला आहे.  आता राज्य  सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्याची तयारी केल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा महागाई भत्ता आता ४६ टक्के होईल.


विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश | mdm |

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत.......mdm

mdm

केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ टक्के निधीमधून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दि. १४ मार्च, २०१९ रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. त्यानुषंगाने केंद्र शासनाने सन २०२०-२१ पासून प्रकल्प मंजूरी मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या ५ टक्के निधी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास उपलब्ध करुन दिला जात आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.


अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना


राज्यांतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषि विभागाने केली आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे.

तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध


करुन दिल्यास विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोषणमूल्य मिळणार आहेत. सदर बाबींचा विचार करून सन


२०२३ २४ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तुत योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत मंजूर निधीतून


२३ आठवड्याकरीता नियमित पोषण आहारसोबत विद्यार्थ्यांना अंडी व केळी यांचा लाभ देण्याची बाब

शासनाच्या विचाराधीन होती..


शासन निर्णय :-


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टीक पदार्थ देण्याकरिता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.


1. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्याकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी


देण्यात यावीत.


॥ सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंड्यासाठी रु.५/- इतका दर निर्धारित करण्यात येत आहे.


iii. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.

iv. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन


आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा


पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात सदर योजनेचा लाभ देणे आवश्यक राहील.


v. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत रु.५/- मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक

फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

vi. प्रस्तुत उपक्रमाकरीता शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी पहिल्या टप्प्यात एक महिन्यांसाठी आवश्यक असलेला निधी ग्रामीण भागातील शाळांना (केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतर्गत असलेल्या शाळा वगळून) अग्रीम स्वरुपात देण्यात यावा. तहनंतर सदर निधीचा शाळांनी केलेला विनियोग, उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेवून पुढील निधी शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल.


vii. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडलेली अंडी / अंडा पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पुरक आहार म्हणून केळी देण्यात यावी. सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची महापालिका/नगरपालिका स्तरावर तपासणी करुन संबंधित जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी प्रत्येकी दोन महिन्यानी संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी/फळे यांच्या देयकांची अदायगी करावी.


vii. शाळा स्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक (प्राथ.) यांच्या स्तरावरून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ.) तसेच, सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.

. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११०७१७१४००५४२१ असा आहे.


विद्यार्थी ज्ञानआनंद महोत्सव | student knowledge event |

बनगांव शाळेत ज्ञान आनंद मेळावा 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनगाव केंद्र करमाड ता./जि. छ. संभाजीनगर येथे  विद्यार्थी ज्ञानआनंद महोत्सव (knowledge event) साजरा करण्यात आला.

knowledge event


विशेष -

1)सहभाग -जि.प प्रा शा गारखेडा नं1 चे विद्यार्थी, जि.प .प्रा.शा वरझडीचे विद्यार्थी, जि .प प्रा.शा गेवराई कुबेर चे विद्यार्थी आणि जि.प प्रा शा बनगाव चे विद्यार्थी

2) उपस्थिती  जि प प्रा शा गारखेडा नं १ शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री हरेल सर व त्यांच्या शाळेचे शा व्य समिती अध्यक्ष, आदर्श शिक्षक श्री नितीन गबाले सर, बनगावची सर्व टीम

3) प्रमुख स्पर्धा - प्रश्नमंजुषा स्पर्धा,श्रुतलेखन स्पर्धा, गणित मुलभूत  क्रियांवर स्पर्धा परीक्षा, इंग्रजी कसे बोलावे या साठी विविध activity

4) बक्षीस वितरण* विजेत्या संघाला, स्पर्धकाला आकर्षक बक्षिसे देण्यात आली

5 ) भोजनव्यवस्था* चविष्ट खिचडी, भेळ, सोनपापडी, बिस्किटे याचे मुलांना वाटप.            

6 ) स्पर्धात्मत युगात निडर व निर्भय उत्साही विद्यार्थी निर्माण  करणे ,अभ्यासाची गोडी,     

संपूर्ण दिवसभर मुलांनी या ज्ञान मेळाव्याचा आनंद लुटता, कल्पक आणि सर्जनशील शिक्षकांच्या प्रयत्नातून हा उत्सव खूपच छान साजरा करण्यात आला 

knowledge event

knowledge event


10 वी दिवाळी अभ्यास diwali abhyas

 

अॕक्टिव्ह गुरुजी व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी खास दिवाळी सुट्टी निमित्त घेऊन आला आहे. दिवाळी अभ्यास diwali abhyas  

विद्यार्थ्यांना  भरभरून अभ्यासासह दिवाळी सुट्टीत आनंद साजरा करावा अभ्यासासह सुट्टीचाही आनंद मुलांनी घेत आनंददायी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही विशेष पोस्ट आपणापर्यंत पोहोचवत आहे .

diwali abhyas
निर्मिती सचिन शेळके व प्रसारण डिजिटल समूह

diwali abhyas  

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपणही पोहोचवावी आपल्या शाळेच्या गावाच्या ग्रुप वर ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!


9 वी दिवाळी अभ्यास diwali abhyas

 

अॕक्टिव्ह गुरुजी व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी खास दिवाळी सुट्टी निमित्त घेऊन आला आहे. दिवाळी अभ्यास diwali abhyas  

विद्यार्थ्यांना  भरभरून अभ्यासासह दिवाळी सुट्टीत आनंद साजरा करावा अभ्यासासह सुट्टीचाही आनंद मुलांनी घेत आनंददायी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही विशेष पोस्ट आपणापर्यंत पोहोचवत आहे .

diwali abhyas
निर्मिती सचिन शेळके व प्रसारण डिजिटल समूह

diwali abhyas  

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपणही पोहोचवावी आपल्या शाळेच्या गावाच्या ग्रुप वर ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!