डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Download navoday hall ticket | navoday exam |

नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील टॅब वर क्लिक करायचे आहे.

download navoday hall ticket


रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख टाकून हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे download navoday hall ticket


download navoday hall ticket
नवोदय परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड...


 रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नसल्यास खालील लिंक वर जाऊन  तो नंबर आपणास उपलब्ध होऊ शकतो.


https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ChildernPrint/findRegistrationno






शालेय परिपाठ दिवस 127 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 127 वा*  

दि 16/12/2023 ला 11.00 वाजता 

*संकल्पना व लेखिका*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

१५ डिसेंबर २०२३

वार:शुक्रवार

तिथी:-मार्गशीर्ष शु ३ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 15 December 2023

         Friday

 Tithi-Margshirsh Shu 3 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शुक्रवार, 15 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:04, खगोलीय दुपार: 12:33, सूर्यास्त: 18:03, दिवस कालावधी: 10:59, रात्र कालावधी: 13:01.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हवेच.


Good Thought
Try to be a rainbow in someone else’s cloud.” ~ Maya Angelou

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष


१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आजची म्हण

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's idiom

Better late than never To do something rather than not doing Well, we thought it was better late than never, but where are the others?

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


आजचे कोडे

*कोडे*

असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,

परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील

त्याला जास्त काळ धरून शकत नाही?


=> उत्तर – श्वास

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*

कासव आणि बेडूक

नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, 'अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.'


तात्पर्य


- देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान प्रश्न

1)इंग्रजी वर्णमालेतील 15 वे अक्षर कोणते?

उत्तर:-O


2)इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता आहे?

उत्तर :- लाल


3)टेलिफोनचा शोध कोणी लावला?


उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल


4)सिम कार्डमधील “सिम” म्हणजे काय?


उत्तर: सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल


5)जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?


उत्तरः एंजल फॉल्स

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शालेय परिपाठ दिवस १२६ | school assembly |

 चला सोपा करूया परिपाठ

दिवस 126 वा*


शालेय परिपाठ

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

१४ डिसेंबर २०२३

वार:गुरूवार

तिथी:-मार्गशीर्ष शु २ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 14 December 2023

         Thursday

 Tithi-Margshirsh Shu 2 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 गुरुवार, 14 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:03, 

खगोलीय दुपार: 12:33, 

सूर्यास्त: 18:03, 

दिवस कालावधी: 11:00, 

रात्र कालावधी: 13:00.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

कामात आनंद निर्माण केला की

त्याचं ओझं वाटत नाही.

Good thought

Do it now sometimes later becomes never.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व अर्थ*

"अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे!"

अर्थ:काम एकाचे आणि त्रास, दंड मात्र दुसऱ्याला.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Idiom

To break someone’s bubble

:-To do or say something that proves someone else’s beliefs are not true

:-He just broke my bubble when he said that he was a part of it.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजचे कोडे*

12 जण जेवायला आणि 3 जण वाढायला.

एक पळू पळू वाढतो.

दुसरा हळू हळू वाढतो.

तिसरा घंटा झाल्या शिवाय हालतच नाही!

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर:-घड्याळातळे 12 अंक आणि सेकंद काटा,मिनिट काटा आणि तास काटा.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सामान्य ज्ञान प्रश्न*

1)भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत?


उत्तर: इंदिरा गांधी


2)भारतात किती राज्ये आहेत?


उत्तर: 28 राज्ये


3)भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?


उत्तर: 8 केंद्रशासित प्रदेश


4)भारताचा पहिला नागरिक कोण आहे?


उत्तर: भारताचे राष्ट्रपती


5.गावाचा प्रथम नागरिक कोण असतो?

उत्तर: गावाचे सरपंच

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*

एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्‍हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्‍हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्‍याला नावं ठेवायला जागा नाही.’


तात्पर्य


– एखाद्याला मदत केल्याने स्वतःचाच विनाश होत असेल तर अशी मदत न करणे हेच शहाणपणाचे आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

श्लोक

सदा सर्वदा योग तुझा घडावा।

 तुझे कारणी देह माझा पडावा।।

 उपेक्षु नको गुणवंता अनंता। 

रघु नायका मागणे हेची आता।।

केंद्रप्रमुख परीक्षा व्हिडीओ ३ व ४

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहाच्या वतीने जिल्हा परिषद मधील केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या तयारीचा विषय ....

आपल्या YouTube चॕनल @prayagainstitute  (  www.youtube.com/c/Prayagainstitute )

       पेपर एक आणि पेपर दोन बद्दल सविस्तर माहिती दररोज अगदी  मोफत 👍👍

ही संधी दिल्या बद्दल  समूहनिर्माता  प्रकाशसिंग राजपूत व मुख्यप्रशासक श्रीमती लीना वैदयमॕडम यांचे  आभार...

आजचे व्हिडिओ👍👍


व्हिडीओ ३ रा    राष्ट्रीय बालहक्क संरक्षक आयोग 




व्हिडीओ ४ था बालकासंबंधीचे  सर्व  कायदे 







परिपाठ दिवस १२५ वा

 चला सोपा करूया परिपाठ

दिवस 125 वा



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

१३ डिसेंबर २०२३

वार:बुधवार

तिथी:-मार्गशीर्ष शु १ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "



Today's almanac

 Date - 13 December 2023

         Wednesday

 Tithi-Margshirsh Shu 1 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilawal"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 बुधवार, 13 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:03,

 खगोलीय दुपार: 12:32, 

सूर्यास्त: 18:02, 

दिवस कालावधी: 10:59, 

रात्र कालावधी: 13:01.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही."


Good thought

"When things go wrong, don't go with them." -- Elvis Presley


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी व त्याचा अर्थ

आधीच तारे त्यात शिरले वारे – स्वतःच्या हौसेत दुस-यांच्या उत्तेजनाची भर पडणे.


English proverb

Better Late Than Never.

कधीही न केल्यापेक्षा उशिरा का होईना केलेले अधिक चांगले.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

बाहेरून आहे ते हिरवे

आत मध्ये पिवळे मोत्याचे दाणे

लोक आहेत त्याचे दिवाणे

उत्तर मक्याचे कणीस


नदीच्या काठावरील एका झाडावर एका कोंबड्याने अंडे घातले. तर ते अंडे कोठे पडेल जमिनीवर की नदीमध्ये?

उत्तर:-कोंबडा अंडे देत नाही

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

भारत 

राष्ट्रीय प्रतीक – 

राष्ट्रीय पक्षी – भारतीय मोर ( पावो क्रिस्टेटस् )

राष्ट्रीय पुष्प – कमळ ( नेलंबो न्यूसिपेरा गार्टन )

राष्ट्रीय वृक्ष – वटवृक्ष ( फाइकस बेंघालेंसिस )

राष्ट्रगीत - जन-गण-मन

राष्ट्रीय गीत – वंदे मातरम्

राष्ट्रीय वाक्य – सत्यमेव जयते

राष्ट्रीय ध्वज – तिरंगा

राष्ट्रीय नदी – गंगा

राष्ट्रीय प्राणी - वाघ ( पैंथरा टाइग्रिस लिन्नायस )

राष्ट्रीय वारसा प्राणी - गजराज

राष्ट्रीय फळ – आंबा ( मेगिनिफेरा इंडिका )

राष्ट्रीय खेळ – हॉकी

राजभाषा – देवनागरी लिपीमध्ये लिहिण्यात येणारी हिंदी

राष्ट्रीय दिनदर्शिका – शक संवत्

राष्ट्रपिता – महात्मा गाँधी

राष्ट्रीय मुद्रा – रुपया ( चलन चिन्ह ₹ आहे जे 15 जुलै 2010 पासून स्वीकारले)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक


नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजीरे।

 माथा शेंदुर पाझरे वरीवरे दुर्वांकुराचे तुरे।।

 माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे। गोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे।।


केंद्रप्रमुख परिक्षा मार्गदर्शक व्हिडीओ