चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 127 वा*
दि 16/12/2023 ला 11.00 वाजता |
*संकल्पना व लेखिका*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१५ डिसेंबर २०२३
वार:शुक्रवार
तिथी:-मार्गशीर्ष शु ३ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Today's almanac
Date - 15 December 2023
Friday
Tithi-Margshirsh Shu 3 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:04, खगोलीय दुपार: 12:33, सूर्यास्त: 18:03, दिवस कालावधी: 10:59, रात्र कालावधी: 13:01.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हवेच.
Good Thought
Try to be a rainbow in someone else’s cloud.” ~ Maya Angelou
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजची म्हण
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's idiom
Better late than never To do something rather than not doing Well, we thought it was better late than never, but where are the others?
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजचे कोडे
*कोडे*
असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील
त्याला जास्त काळ धरून शकत नाही?
=> उत्तर – श्वास
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
कासव आणि बेडूक
नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, 'अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.'
तात्पर्य
- देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान प्रश्न
1)इंग्रजी वर्णमालेतील 15 वे अक्षर कोणते?
उत्तर:-O
2)इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता आहे?
उत्तर :- लाल
3)टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल
4)सिम कार्डमधील “सिम” म्हणजे काय?
उत्तर: सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल
5)जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?
उत्तरः एंजल फॉल्स
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा