चला सोपा करूया परिपाठ
दिवस 126 वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -
१४ डिसेंबर २०२३
वार:गुरूवार
तिथी:-मार्गशीर्ष शु २ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Today's almanac
Date - 14 December 2023
Thursday
Tithi-Margshirsh Shu 2 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 14 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:03,
खगोलीय दुपार: 12:33,
सूर्यास्त: 18:03,
दिवस कालावधी: 11:00,
रात्र कालावधी: 13:00.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
Good thought
Do it now sometimes later becomes never.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजची म्हण व अर्थ*
"अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे!"
अर्थ:काम एकाचे आणि त्रास, दंड मात्र दुसऱ्याला.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Idiom
To break someone’s bubble
:-To do or say something that proves someone else’s beliefs are not true
:-He just broke my bubble when he said that he was a part of it.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*आजचे कोडे*
12 जण जेवायला आणि 3 जण वाढायला.
एक पळू पळू वाढतो.
दुसरा हळू हळू वाढतो.
तिसरा घंटा झाल्या शिवाय हालतच नाही!
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर:-घड्याळातळे 12 अंक आणि सेकंद काटा,मिनिट काटा आणि तास काटा.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*सामान्य ज्ञान प्रश्न*
1)भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर: इंदिरा गांधी
2)भारतात किती राज्ये आहेत?
उत्तर: 28 राज्ये
3)भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर: 8 केंद्रशासित प्रदेश
4)भारताचा पहिला नागरिक कोण आहे?
उत्तर: भारताचे राष्ट्रपती
5.गावाचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर: गावाचे सरपंच
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*बोधकथा*
एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’
तात्पर्य
– एखाद्याला मदत केल्याने स्वतःचाच विनाश होत असेल तर अशी मदत न करणे हेच शहाणपणाचे आहे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
श्लोक
सदा सर्वदा योग तुझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।।
उपेक्षु नको गुणवंता अनंता।
रघु नायका मागणे हेची आता।।
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.