डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत महत्त्वाचे

 वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी बाबतच्या न्यायालयीन निर्णयाच्या...

 कोर्टाच्या अवमान बाबतची कार्यवाही  करण्यात येऊ नये सचिवस्तरावरून औरंगाबाद खंडपीठ येथे त्याबाबतचे पत्र सादर करण्यात आले आहे.

वेतनत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.

तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.






जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....



१२ वी परीक्षेचा निकाल संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी |hsc result|

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत


मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृ‌तु 27 संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


१. mahresult.nic.in


२. http://hscresult.mkcl.org


३. www.mahahsscboard.in


४. https://results.digilocker.gov.in


५. www.tv9marathi.com


६. http://results.targetpublications.org


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्यर्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....


जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....




शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू|teacher transfer intra district|

 शिक्षक  अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्ती शिक्षकांच्या बदली बाबत ...

सुधारीत अटी लागू करणे बाबत असून सदरील शासन निर्णयात २) जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी.

 समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना प्राप्त आहेत.

उपरोक्त सर्व शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी विस्थापित झालेले तसेच शासन निर्णयातील निकषाच्या अनुषंगाने बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी विहित नमुन्यात आपल्याकडे अर्ज सादर करणे बाबत या कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक ५ अन्वये कळविण्यात आले होते. संदर्भीय पत्र क्रमांक ६ अन्वये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. तथापी दिनांक २६/०४/२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत विनंती बदलीची माहिती मागविण्यात आली होती. आपण सादर केलेल्या माहितीच्या आधारे जिल्हांतर्गत बदली बाबत प्राप्त अर्जाची संवर्ग-१ व संवर्ग-२ निहाय तसेच सर्वसाधारण अशी यादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीत खालील बाबीची खात्री करावी.

संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये नमुद १.८ विशेष संवर्ग भाग-१ मध्ये १.८.१ ते १.८.२० या प्रमाणे संवर्ग मधील शिक्षकांच्या नोंदी घेताना यादीमध्ये बाब नमुद करुन त्या बाबत आवश्यक अभिलेख्यावरुन -१ खात्री करावी. तसेच शासन निर्णयात नमुद ४.२.८ मध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करावी. तसेच ४.२.७ मध्ये नमुद नुसार विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदली साठी अर्ज करता येणार नाही या बाबत आपल्या तालुक्यातुन प्राप्त अर्जाबाबत खात्री करावी. तसेच संवर्ग-१ मध्ये बदली पात्र असतांना नकार दिला असल्यास संबधिताने लाभ घेतला आहे असे गृहीत धरुन आवश्यक ती कार्यवाही करावी.

संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये ४.३ मध्ये नमुद नुसार जे शिक्षक विशेष संवर्ग भाग २ मध्ये मोडतात त्यांनी विवरण पत्र क्रमांक ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघाच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या तालुक्यातील भाग २ मध्ये अर्ज सादर करत असलेल्या शिक्षकांकडून स्वयंघोषीत प्रमाणपत्र घेण्यात यावे. तसेच मुद्या क्र ४.३.६ नुसार विशेष संवर्ग २ खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमुद आहे. तीन वर्ष कालावधी पूर्ण होण्याआधी पती किंवा पत्नीने एकत्रीकरणाचा लाभ घेतला असल्यास संबंधितास यावर्षी विनंती बदलीचा लाभ घेता येणार नाही. त्यानुसार प्राप्त अर्जाची खात्री करावी. संवर्ग १, २ इतर, विस्थापीत व न्यायप्रविष्ठ निर्णयातील शिक्षक vec 6 आंतर जिल्हा बदलीने या जिल्हा परिषदेमध्ये हजर झाल्याचा दिनांक हा प्रथम नेमणुक दिनांक गृहीत धरावा.

तसेच आपल्या तालुक्यातुन बदल्यामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या प्राप्त अर्जाची विस्थापीत असल्याबाबतची खात्री करावी व वर्षे नमुद करुन बदलीसाठी विहीत केलेला कालावधी पुर्ण केला किंवा नाही याची खातरजमा करावी.

सदंभीय शासन निर्णय २ मधील १.७ मध्ये नमुद केल्यानुसार सन २०२२ मध्ये घोपीत केलेल्या अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली असेल अशा शिक्षकांना बदल्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यानुसार अशा शिक्षकांची नोंद आपल्या यादीत सेवा कालावधीसह नमुद करावी. कार्यरत शाळेत ५ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक हे विनंती बदलीस पात्र ठरतील. 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबधिताच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी संबधित शिक्षकांचे नाव सदरच्या यादीत संवर्गनिहाय सेवाजेष्ठतेनुसार नाव समाविष्ट करण्यात येवून शेरा रकाना मध्ये मा. न्यायालयीन प्रकरण असे नमुद करावे. (सोबत यादी)

आपल्या तालुक्यात बदली साठी प्राप्त झालेल्या बदली विनंती अर्जाचे आपण सादर केलेले प्रपत्र मध्ये नमुद असलेले सर्व बाबी काळजीपुर्वक आवश्यक अभिलेख्या आधारे तपासणी करुन आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरीत यादी सादर करावी. यादी प्रसिध्द केल्यानंतर येणाऱ्या आक्षेप दुरुस्तीसह अदयावत यादी रिक्त पदाच्या अहवालासह दिनांक २०/०५/२०२४ रोजी दुपारी २.०० पर्यत समक्ष सादर करावी. सदरच्या यादीत काही त्रुटी राहिल्यास त्या बाबत आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.






शिक्षक बदली बाबत निवेदन |teachers transfer |

 सार्वत्रिक बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवा...

 शिक्षक समितीची मागणी                                                                                     छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलांची लगीन घाई चालू झाली असून माहिती संकलित करणे याद्या बनवणे अर्ज मागवणे पडताळणी करणे ही कामे सध्या जोरात चालू आहे .

15 जून च्या आत बदल्या होतील असे वाटते परंतु या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदल्या करणार नाही अशी शिक्षण विभागातून समजते ही बदली प्रक्रिया राबवतांनी शिक्षकांना जर सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाली नाही तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही . शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते बदली हा शिक्षकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून या बदल्यांमध्ये तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया राबवली नाही तर ज्या शिक्षकांना तालुक्यामध्ये राहायचे परंतु बदली पात्र असल्यामुळे दुसऱ्या शाळेमध्ये बदली करून घ्यायची या प्रक्रियेमुळे त्या शिक्षकाची बदली होणार नाही शिक्षकांना सोयीच्या पदस्थापना मिळणार नाही पर्याय न अध्यापनाचे पवित्र काम समाधानकारक होणार नाही तेव्हा शिक्षक समितीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांना विनंती केली आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया अध्यापन चांगले होण्यासाठी राबवा या असे आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय साळकर नितीन नवले शाम राजपूत शालिग्राम खिस्ते सुनील धाटवळे साळवे केडी मगर अशोक डोळस बबन चव्हाण विलास चव्हाण दीपिका एरंडे मंगला मदने वर्षा देशमुख अर्चना गोरडे जयश्री राठोड प्रीती जाधव आदींनी दिले आहे,




दिवेरचे युद्ध व महाराणा प्रताप यांचा विजयी संघर्ष

 पार्श्वभूमी -

हल्दीघाटीची लढाई


महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्यातील युद्धाचे नाव होते "हल्दीघाटीची लढाई".  या युद्धाचा काळ इ.स.1576 होता.  मुघल साम्राज्याच्या विस्तारादरम्यान, अकबराने महाराणा प्रताप यांचे बहुतेक राज्य मेवाड ताब्यात घेतले.  याला महाराणा प्रताप यांनी विरोध केला आणि हल्दीघाटी येथे लढाईचे ठाणे होते.

दिवेरचे युद्ध -

मेवाडचे राजे महाराणा प्रताप आणि मुघल साम्राज्य यांच्यात संघर्ष झाला.  या युद्धात महाराणा प्रताप यांनी  मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तर अकबराने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.  हे युद्ध भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामध्ये महाराणा प्रताप यांच्या शौर्य आणि धैर्याची गाथा अमर आहे.



1576 च्या हल्दीघाटीच्या लढाईनंतरही अकबराने 1577 ते 1582 या काळात महाराणांना पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी सुमारे एक लाख सैन्य पाठवले होते, अशी इतिहासात नोंद आहे.  इंग्रज इतिहासकारांनी लिहिले आहे की हल्दीघाटीच्या लढाईचा दुसरा भाग, ज्याला ते 'दिवेरची लढाई' म्हणतात, मुघल सम्राटाचा दारुण पराभव ठरला.

कर्नल टॉड यांनीही त्यांच्या पुस्तकात हल्दीघाटीला 'मेवाडचा थर्मोपल्ली' असे संबोधले आहे, तर दिवेरच्या लढाईचे वर्णन 'मेवाडची मॅरेथॉन' असे केले आहे. पर्शियाचे ज्यामध्ये ग्रीसचा विजय झाला होता, या युद्धात ग्रीसने अतुलनीय शौर्य दाखवले होते), कर्नल टॉड यांनी लिहिले आहे की महाराणा आणि त्यांच्या सैन्याचे शौर्य आणि लढाऊ कौशल्य स्पार्टाच्या योद्ध्यांइतकेच शूर होते आणि ते स्वतःहून अधिक चांगले होते. रणांगणात चारपट मोठ्या सैन्यालाही ते घाबरत नव्हते .

दिवारच्या लढाईची योजना महाराणा प्रताप यांनी अरवली येथे असलेल्या मानकियावासाच्या जंगलात केली होती.  भामाशाहकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी मोठी फौज तयार केली होती.  खडबडीत जंगले, विस्कटलेले डोंगरी रस्ते, भिल्ल, राजपूत आणि स्थानिक रहिवाशांच्या गनिमी सैन्याचे सततचे हल्ले आणि साहित्य आणि शस्त्रास्त्रांची लूट यामुळे मुघल सैन्याची स्थिती बिघडत चालली होती.

हल्दीघाटीनंतर ऑक्टोबर १५८२ मध्ये दिवेरची लढाई झाली.  अकबराचा काका सुलतान खान याने या युद्धात मुघल सैन्याचे नेतृत्व केले.  तो विजयादशमीचा दिवस होता आणि महाराणाने आपल्या नव्याने संघटित सैन्याचे दोन भाग केले आणि युद्धाचा गजर केला.  एका तुकडीचे नेतृत्व स्वत: महाराणा प्रताप करत होते, तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व त्यांचा मुलगा अमर सिंह करत होता.

महाराणा प्रताप यांच्या सैन्याने महाराज कुमार अमर सिंह यांच्या नेतृत्वाखाली दिवारच्या शाही ठाण्यावर हल्ला केला.  हे युद्ध इतके भयंकर होते की प्रतापचा मुलगा अमरसिंह याने मुघल सेनापतीवर भाल्याने असा हल्ला केला की भाल्याने त्याच्या शरीराला आणि घोड्याला छेद दिला आणि तो जमिनीवर पडला आणि सेनापती पुतळ्यासारखा एका जागी अडकला.

बहलोल खानचा वध -

दुसरीकडे महाराणा प्रताप यांनी बहलोल खानच्या डोक्यावर एवढा वार केला की घोड्यासह त्याचे दोन तुकडे झाले.  स्थानिक इतिहासकारांचे म्हणणे आहे की या युद्धानंतर "मेवाडचे योद्धे एकाच फटक्यात घोड्यासह स्वाराचा वध करतात" अशी एक म्हण निर्माण झाली.

त्यांच्या सेनापतींची ही अवस्था पाहून मुघल सैन्यात घबराट पसरली आणि राजपूत सैन्याने अजमेरपर्यंत मुघलांचा पाठलाग केला.  भयंकर युद्धानंतर उर्वरित 36,000 मुघल सैनिकांनी महाराणासमोर शरणागती पत्करली.  दिवारच्या लढाईने मुघलांचे मनोधैर्य खचले.  दिवारच्या लढाईनंतर प्रतापने गोगुंडा, कुंभलगड, बस्सी, चावंड, जव्हार, मदरिया, मोही, मांडलगड ही महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली.

दिवेरची लढाई वरील अप्रतिम गीत पहा...