संघाच्या शिलेदाराने संपातून माघार नाही दिला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा....
शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. अवघड क्षेत्रातील फेरीसाठी शिक्षकांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर कसा भरावा याची माहिती आम्ही देणार आहोत .
अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रात दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण झालेली आहे. अशा सर्व शिक्षकांची यादी यापूर्वी विन्सिसने पोर्टलवर जाहीर केली होती .त्या यादीत विशेष संवर्ग एक मध्ये मोडत असलेले व ज्यांना बदलीतून सूट हवी आहे अशा शिक्षकांची नावे होती.आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झालेली होती.
त्याची १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख १९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.
यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.
या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.
कोणती कागदपत्रे लागतात ?
गीत अलंकार प्रस्तुत करत आहे...
श्रीमती सारिका बद्दे मॕडम यांची रचना गीत स्वरुपात ....
मानते मी.... गझल....
गायन श्रीमती आशा चौधरी मॕडम
संगीत व व्हिडीओ
प्रकाशसिंग राजपूत
शालेय जीवनात कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या ई-उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा तयार करणे आणि एकात्मिक अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येत असून एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र मिनीशाळेच्या सौजन्याने संकलित चाचणी क्र २ च्या नमुना प्रश्नपत्रिका एकाच पी.डी.एफ मध्ये उपलब्ध करून देत आहोत.
ही फक्त नमूना दाखल असून आपण आपल्या स्तरावर आपल्या परिने स्वतः चाचणी पेपर तयार करून चाचणी घेण्यास सोयीस्कर होण्यासाठी ही पी.डी.एफ देत आहोत.
नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी 👇