केंद्रप्रमुख परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व परीक्षा त्यांनी संधी सोडू नका सर्वांनी पुढील नियोजनानुसार अभ्यास चालू ठेवा...
पुढील आठवड्या मधील आपल्या केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी भरती परीक्षेकरिता नियोजित तासिका*...
पुढील आठवड्या मधील आपल्या केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी भरती परीक्षेकरिता नियोजित तासिका*...
पुढील व्हिडीओ 👇
4. 11 डिसेंबर सकाळी सात वाजता
राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी
conclusion
१२ डिसेंबर सकाळी सात वाजता
*राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग 2005*
6. 13 डिसेंबर सकाळी सात वाजता
*विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तारीख -
८ डिसेंबर २०२३
वार:शुक्रवार
तिथी:-कार्तिक कृ ११ शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Date - 8 December 2023
Friday
Tithi-kartik kru 11 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
शुक्रवार, 08 डिसेंबर 2023
सूर्योदय 07:00,
खगोलीय दुपार: 12:30,
सूर्यास्त: 18:01,
दिवस कालावधी: 11:01,
रात्र कालावधी: 12:59.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
“Every journey begins with a single step.”
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१९८५: सार्क परिषदेची स्थापना.
म्हणी व अर्थ
आधी शिदोरी मग जेजुरी – आधी जेवण केले कि मग देवाचे दर्शन घेणे.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
दोन अक्षरांचे माझे नाव
डोके झाकणे माझे काम
:-टोपी
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
वडिलांना मदत
भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥प
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तारीख -
७ डिसेंबर २०२३
वार:गुरूवार
तिथी:-कार्तिक कृ १० शके १९४५
शिवराज शक 350
अयन-दक्षिणायण
ऋतू - शरद ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलावल "
Date - 7 December 2023
Thurssday
Tithi-kartik kru 10 shak 1945
Ayana-Dakshinayana
Season:-Autumn season
"Jamadilawal" month of Muslims
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 07 डिसेंबर 2023
सूर्योदय 06:59,
खगोलीय दुपार: 12:29,
सूर्यास्त: 18:00,
दिवस कालावधी: 11:01,
रात्र कालावधी: 12:59.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
“Be the reason someone believes in the goodness of people.”
भारतीय लष्कर ध्वजदिन
आजची म्हण
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी
:-चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.
A stitch in time save nine -वेळीच केलेल्या उपायांमुळे संभाव्य हानी टळते.
कोडे
कोडे
असे कोणते फळ आहे ज्याला आपण न धुता खाऊ शकतो?
:-केळी
सोन्याची अंडी देणारी कोंबडी
एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले दिसून येते. जादूची कोंबडी आहे ही तिच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडी देते.
काही आठवडे चालू राहिले व तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला.शेतकऱ्याच्या बायको अत्यंत लोबी होती ती एक दिवस घरात शेतकरी नसताना कल्पना सुचते की आपण हिला कापून पोटातील सर्व अंडे काढले तर खूप मोठे श्रीमंत ठरू. ती त्या कोंबडीला कापते परंतु तिचा पोटामध्ये काहीच निघत नाही व कोंबडी मरण पावते.
1 सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव महाराष्ट्रात कोणी सुरू केले?
:-लोकमान्य टिळक
2भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
:-इंदिरा गांधी
3 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
:-सरदार वल्लभभाई पटेल
4 इंदिरा गांधीजी यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?
:-जवाहरलाल नेहरु आणि कमला नेहरू
5 इंदिरा गांधी यांच्या मुलांची नावे काय होती?
:- राजीव गांधी आणि संजीव गांधी
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
चिंता व्यक्त करताना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या झोपेची पद्धत बदलली आहे.
विशेषत: जे मुले मध्यरात्रीनंतरच झोपतात, परंतु त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागते, त्यामुळे त्यांच्या झोपेचा किमान कोटा नष्ट होतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी शाळा आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याबरोबरच 'पुस्तक नसलेल्या' शाळा, 'ई-क्लासेस' आणि शाळांना गुणवत्तेनुसार दर्जा देण्याबरोबरच विद्यार्थी वर्गावरील शिक्षणाचा भार कमी करण्याचे आवाहन केले. करायला बोलावले.
अनेक नवीन उपक्रम सुरू केले
राजभवन येथे शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी ही माहिती दिली. बैस यांनी या गोष्टी सांगितल्या तेव्हा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा आणि गिरीश महाजन, प्रधान सचिव शिक्षण रणजितसिंह देओल हेही उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित शाळेच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करताना राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे माय स्कूल, ब्युटीफुल स्कूल, स्टोरी-टेलिंग सॅटर्डे, एन्जॉयेबल रिडिंग, अॕडॉप्ट स्कूल अॅक्टिव्हिटी, माय स्कूल, माय बॅकयार्ड आणि क्लीननेस मॉनिटर यासारखे उपक्रम सुरू केले.
ग्रंथालयाचा अवलंब करण्याची गरज आहे
राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत परंतु बहुतांश जुनी आहेत, त्यामुळे त्या सर्वांचे पुनरुज्जीवन करून त्या जागेवर संगणक व इंटरनेट उपलब्ध करून 'लायब्ररी दत्तक' सुरू करण्याची गरज आहे, अशी खंतही राज्यपालांनी व्यक्त केली. बैस यांनी आवर्जून सांगितले की हे आवश्यक आहे कारण विद्यार्थी त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकांद्वारेच नव्हे तर इंटरनेट, सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांद्वारे देखील प्राप्त करतात जे त्यांचे IQ पातळी सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे शिक्षकांनीही शैक्षणिक बाबतीत नवनवीन गोष्टी शिकत राहायला हव्यात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमी शैक्षणिक गृहपाठ आणि "खेळ आणि सर्जनशील क्रियाकलापांवर भर देऊन शिक्षण अधिक आनंददायी बनवण्याचे" आवाहन केले.