डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू |mobile-blast-headmaster-zpschool|


मोटारसायकलवरून जातांना  खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


सुरेश संग्रामेसरांना भावपुर्ण श्रध्दांजली 


या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर मुख्याध्यापकाच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मोबाईलचा स्फोट नेमका कसा झाला याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगावटोला येथे ही धक्कादायक घटना घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक मुख्याध्यापकाचं नाव आहे. सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या मागे बसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील

सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही मोटारसायकलवरुन नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं जात असताना ही घटना घडली.

खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाल्यानंतर सुरेश संग्रामे यांच्या कपड्याला आग लागली होती. भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तज्ञांच्या म्हणण्यांनुसार अनेक कारणांनी मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. मात्र यातील प्रमुख कारण म्हणजे मोबाईलची बॅटरी आहे. मोबाईल अनेक तास चार्जिंगला ठेवल्याने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. तर मोबाईल जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास बॅटरी जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अतिप्रमाणात चार्जिंग न करण्याचा सल्ला अनेक जण देतात.


conclusion - सदरील मृत शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक होते. सतत प्रशासकीय कामात मोबाईलचा जेवढा वापर होत आहे . ते पाहता एकूणच ही बाब ही या स्फोटाला कारणीभूत ठरु शकते. प्रथमतः मोबाईल कसे काम करतो याबद्दल थोडक्यात सांगतो.

मोबाईलचे १) Cpu(प्रोसेसर) 2) Storage 3) Mother Board 4) Battery हे प्रमुख भाग आहे. मोबाईल प्रोसेस ram व rom या दोन मेमरीतून करतो. Cpu हा मोबाईलचा मेंदू जो संपूर्ण प्रक्रिया पार पाडतांना सतत motherboard वरील विविध chip ला माहिती देवाणघेवाण करतो यासाठी बॕटरीकडून ऊर्जा प्राप्त होत. पूर्ण प्रक्रिया होते. सतत येणाऱ्या पीडीएफ ,अॕप व त्याचा डाटा मेमरी फुल करत जातात तेव्हा याच प्रक्रिया पार पाडतांना cpu वरील प्रोसेसर तापून मोबाईलचा motherboard सह बॕटरीला ही गरम करणे सुरु करतो. या शिवाय कमी नेटवर्क क्षेत्रात इंटरनेट मुळे ही मोबाईल तापतो एकूणच  निर्माण झालेली ही उष्णता लिथियम बॕटरीला एका अत्यंत धोकादायक बनवतो व बॕटरीमध्ये लिथियम कोटींग असलेल्या घडी असलेल्या सेल मधील सेपरेटर कागद उष्णतेने खराब होऊन बॕटरीत अंतर्गत शाॕटसर्किट करत बॕटरीला स्फोटक स्वरूप प्रदान करतात. 

यासाठी आपल्या  फोन प्रोसेसवर लक्ष ठेवा, अनावश्यक डाटा कमी करा स्क्रीन लाईट ही कमी ठेवा, बॕकग्राऊंड अॕप बंद करत चला. व पीडीएफ फाईल्स व व्हाटसअप डाटा वेळेत डिलीट करत चला. व फोनची वेळेच्या वेळी अॕण्ड्राॕईड अपडेट करत चला. 


   प्रकाशसिंग राजपूत 

जि.प.प्रा.शा. मुरूमखेडावाडी 

    तंत्रस्नेही शिक्षक 

छ.संभाजीनगर 

१ जानेवारी पासून शिक्षक बदली वेळापत्रक...



बदली अधिकार प्राप्त शिक्षक पती-पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मागदर्शन|teacher-transfer|

 बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये पती-पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मागदर्शन करणेबाबत.,

 बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये पती-पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल, तर त्यांनी दिलेल्या ३० प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे. यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही. त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही. सबब, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या (टप्पा क्र. ४) या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती-पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी.असे आदेशात म्हटलेले आहे.


संपूर्ण आदेश पहा...



शिक्षक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक पहा...

शालेय पोषण आहार वार्षिक संकलित एक्सेल |mdm-excel|

पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र 

 मुख्याध्यापकांचे काम सोपे होणार...

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रद्वारे मी प्रकाशसिंग  राजपूत घेऊन आलो आहे. 
शालेय पोषण आहार चे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजना म्हणजेच शालेय मध्यान भोजन योजनेसाठी आवश्यक असलेले खिचडीच्या प्रत्येक वस्तूचे वार्षिक साठा नोंद घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी एक्सेल शीट आपणास देत आहे.   


आलेले साहित्य शिल्लक साहित्य वापरलेले साहित्य या सर्वांचा व्यवस्थित आकडेमोड होत मुख्याध्यापकाचे काम सोपे होणार आहे आपणही वापराव इतरांनाही नक्की शेअर करा.

 या एक्सेलचे दोन प्रकार करण्यात आलेले आहे पहिल्या भागामध्ये संकलित म्हणजे एकत्र सर्व वस्तूची सीट आहे व पुढे प्रत्येक वस्तूंच्या 15 शीट दिलेले आहे प्रत्येक वस्तूची वेगळी शीट आपणास काढता येणार आहे.

एक्सेल शीट डाउनलोड करा.



‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’|one-nation-one-subscriiption|

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे. ‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेवर सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

one nation one subscription


ही योजना लागू झाल्यावर त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. देशातील १.८ कोटी विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना काय?

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेत देशभरातील सर्व विद्यापीठांना जोडण्यात येणार आहे. सर्व विद्यापीठे आपले संशोधन, जर्नल शेअर करणार आहेत. ते देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेत प्रमुख ३० आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचा समावेश केला गेला आहे. केंद्र सरकार  , राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी लिहिलेले संशोधन लेख मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा

‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या सर्व जर्नल डिजिटल प्रक्रियाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोग देशभरातील विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांना देणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशक १३ हजारापेक्षा अधिक ई जर्नल्स ६ हजार ३०० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहचवली जाते.



एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया |teachers-online-transfer-intra-district|

 एक जानेवारीपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया


छ. संभाजीनगर यंदा शिक्षकांची बदली प्रक्रिया न झाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाने जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शिक्षक बदलीचे वेळापत्रक   


  • ■ १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी :

  • ■ बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्धी व आक्षेपांवर निर्णय 

  • ■ १ ते ३१ मार्च : समानीकरणाअंतर्गत व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती निश्चित करणे.
  • ■ १ ते २० एप्रिल : बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करीत उपलब्ध करणे
  • ■ २१ ते २७ एप्रिल : समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे निश्चित करणे.


■ २८ एप्रिल ते ३ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग एक रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ ४ ते १५ मे : विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे.

■ १० ते १५ मे : बदली अधिकारप्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ १६ ते २१ मे : बदलीपात्र शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २२ ते २७ मे : विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे.

■ २८ ते ३१ मे : अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. एक जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यांत ही प्रक्रिया

शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांसाठी धोरण निश्चित केले असून, त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे.

सुरू राहील. ऑनलाइन पोर्टलद्वारे ही बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करीत शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यावर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच, जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध सूचना जारी करावी असे आदेश शासनाने दिले आहेत.

बदली प्रक्रियेत समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यात दुरुस्ती करणे ही कार्यवाही २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करावी.

बदली प्रक्रिया सुरू झाल्यावर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे, असे निर्देशही दिले आहेत.

मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) यांची मुख्य जबाबदारी |pro-presidingofficer-election-maharashtra|

 

मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) यांची मुख्य जबाबदारी म्हणजे मतदान प्रक्रियेचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करणे.

 निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी याची काळजी घेणे त्यांचे काम असते. खालीलप्रमाणे त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत.


१. मतदान केंद्राची व्यवस्था     



मतदान केंद्रावर वेळेवर पोहोचून सर्व आवश्यक सामानाची तपासणी करणे.
ईव्हीएम/व्हीव्हीपॅट यंत्रे, मतदार यादी आणि इतर साहित्य योग्य पद्धतीने तयार करणे.
मतदारांसाठी प्रवेश, बसण्याची व्यवस्था, आणि गोपनीयता सुनिश्चित करणे.

२. मतदान प्रक्रियेचे संचालन


ठरलेल्या वेळेत मतदान सुरू करणे आणि नियोजित वेळेत संपवणे.
मतदानाच्या गोपनीयतेची हमी देणे.
फक्त पात्र मतदारांनीच मतदान करावे, याची खात्री करणे.

३. मतदारांची ओळख निश्चित करणे


मतदार यादीतील नाव आणि ओळखपत्र तपासणे.
मतदारांच्या नावावर योग्य चिन्ह (टिक) करणे आणि त्यांना मतदानासाठी परवानगी देणे.
डुप्लिकेट किंवा फसव्या मतदानास प्रतिबंध करणे.


केंद्राध्यक्ष संकलन प्रपत्र डाऊनलोड  करा...


४. मदत आणि समस्या सोडवणे


मतदारांना प्रक्रिया समजावून सांगणे, तसेच ज्यांना अडचण आहे त्यांना सहाय्य करणे.
मतदान केंद्रावर शांतता आणि सुव्यवस्था राखणे.

५. उमेदवारांचे प्रतिनिधी (एजंट्स) यांच्याशी समन्वय


मतदान एजंट्सना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे.
सर्व उमेदवारांना समान वागणूक देणे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावास टाळणे.

६. दस्तऐवज आणि अहवाल तयार करणे


मतदान प्रक्रियेचा सविस्तर नोंद ठेवणे.
मतदान पूर्ण झाल्यावर यंत्रे, अहवाल, आणि इतर साहित्य सुरक्षितपणे सील करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणे.

७. तांत्रिक आणि इतर समस्या हाताळणे


मतदान यंत्रातील बिघाड असल्यास, ती तत्काळ दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना करणे.
कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास वरिष्ठांना कळवणे.


मतदान केंद्राध्यक्ष काम सोप्या पद्धतीने करण्यासाठी डाऊनलोड करा...




conclusion :

मतदान केंद्राध्यक्ष हा संपूर्ण मतदान प्रक्रियेचा प्रमुख असतो. त्याच्या कार्यक्षमता, पारदर्शकता, आणि जबाबदारीमुळे निवडणुकीतील निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते.



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुट्टीबाबत महत्त्वाचे आदेश

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत महत्त्वाचे आदेश

क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील,


४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी, तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


मुळ आदेश पहा...