डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय शिक्षणमंत्री राजस्थान दौऱ्यावर

 शिक्षण मंत्री दीपक केसरकर  हे राजस्थानची शिक्षणातील प्रगती जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत.



शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेवर पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, डॉक्टर या सगळ्यांनी टीका केली. मुलांच्या आणि पालकांच्या मनावर रोजच्या अभ्यासामुळे आणि कालबाह्य परीक्षा पद्धतीमुळे जे मानसिक आणि बौद्धिक ओझं निर्माण होतं, ते आधी कमी करायला हवं, अशी मागणी त्यावेळेला केली गेली होती. या मागणी नंतर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला होता की, त्याबद्दल निर्णय अजून व्हायचा आहे. 

राजस्थान मधील शिक्षण देशात उत्कृष्ट -


 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ईटीव्ही भारतने राजस्थान मध्ये धडे गिरवण्या बाबत कारण विचारले असता त्यांनी खुलासा केला, आम्ही राजस्थानमध्ये शिक्षणाचे झालेले प्रयोग पाहण्यासाठी जात आहोत. मी स्वतः आणि शिक्षण विभाग देखील सोबत असणार आहे. आम्ही प्रथम जयपुर येथे जाणार आहोत जेथे शिक्षण क्षेत्रात चांगलं कार्य झालेलं आहे. आम्ही ते समजून घेणार आहोत. त्यानंतर चंदीगड, हरियाणा असा दौरा करून मग महाराष्ट्रात परतणार आहोत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणार आहोत. त्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरणार आहे.

महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे नाही राहिलं पाहिजे:

राजस्थानमध्ये जाण्याचं कारण असं की राजस्थानामधील सिक्कर-झुंझुनू व जयपूर हे असे जिल्हे आहेत जेथील सरकारी शाळा ह्या सर्वोत्तम श्रेणीमध्ये गणल्या जातात.

 केंद्र सरकारच्या 2020 च्या शालेय शिक्षणा संदर्भात अहवालात राजस्थान देशात प्रथम क्रमांकावर होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिक्षण विभाग तेथून धडे गिरवून आल्यानंतर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विषमता किती दूर करतात, राज्याला गुणात्मक दृष्ट्या किती प्रगतीपथावर नेतात, हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र त्यासाठी शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ञांनी यांना यावर लक्ष ठेवावंच लागणार.



किल्ले बनवा स्पर्धा

 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई कुबेर* येथे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद उत्साह होता दोन दिवसाच्या प्रचंड मेहनतीने छोट्या मावळ्यांनी दगड माती चिखल कालवून छोटी छोटी किल्ले बनवली छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचा या उपक्रमातून एक अनोखी प्रेरणा लेकरांना मिळाली यामुळे त्यांच्यातील

*योग्य नियोजन*

*एकीची भावना*

*शिवरायांबद्दलचा प्रचंड आदर*

*सामूहिक श्रमदान* 

*ऐतिहासिक प्रसंगाची अनुभूती*

या वर्षा अनेक मूल्याची रुजवणूक झाली 

किल्ले बनवताना मुले प्रचंड उत्साही आनंदी आणि दोन वर्षाचया करोना काळानंतर यावर्षीच्या मुक्त वातावरणात मुलांनी दगड माती विटा जमा करून स्वतः बनवलेले किल्ले यातून त्यांना एक वेगळाच आनंद मिळाला यावेळी शाळेतील आमचे सर्व शिक्षक सहकारी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी ही किल्ले पाहण्यासाठी व लेकरांचे कौतुक करण्यासाठी आले होते गेल्या पंधरा वर्षापासून करुणा काळ वगळता मी ज्या ज्या शाळेवर असतो त्या शाळेत हा दिवाळीच्या सुट्टी पूर्वीचा माझा खूप आवडता व विद्यार्थ्यांचा प्रचंड आवडता उपक्रम आहे शिवरायांच्या कार्याला या माध्यमातून  प्रचंड आदर ठेवून त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी जी गड किल्ले राखली व संवर्धन केली त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा

🙏 *कालिदास रणनवरे*

    जि.प.प्रा. शा. गेवराई कुबेर

केंद्र करमाड , ता/ जि.औरंगाबाद 





हात धुण्याचा शोध....

 हात धुण्‍याचा शोध....इतिहास 


"स्वच्छ धुवून वारंवार हात...
       रोगांची येणार नाही साथ..."


    जगात हात धुण्याचे महत्त्व करोनानंतर नक्कीच सर्वत्र पटलेले आहे. परंतु याबाबतीत जगात नेमकी केव्हा कशी ओळख झाली हे पाहणे आपल्यासाठी रंजकदार होणार आहे.

      युरोपमध्‍ये सन इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50% नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
     हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे.

आपण सारे हात धुऊ .... नविन जबरदस्त गीत....

आपण सारे हात धूवूया..या रे या सारे.
साबण लावून हात धूवूया..जंतू घालवू सारे..//धृ//

साबण लावा हाता वरती..
चोळा त्याला मागे पुढती...
हात चोळूनी फेस करा रे..जंतू जातिल सारे......(1)

बोटांच्या या...फटीत जंतू...
घासून त्यांना...मारून टाकू...
घासा..रगडा..पाणी टाका..स्वच्छ हात धूवा रे .....(2)

हात पूसाया...रूमाल घ्यावा..
हात पूसूनी...स्वच्छ करावा..
उरले सुरले..सर्वही जातिल...स्वच्छ हात धूवा रे...(3)

हात धूण्याचा...ध्यास धरा रे...
आरोग्याचा...हा मंत्र खरा रे...
कास धरूनी सूदृढतेची...करा संकल्प नवा रे....(4)

शपथ घेवूया..हात धूण्याची...
अस्वच्छतेला...संपवण्याची...
रोगराईला विराम देवू...निश्चय हाच हवा रे...(5)


हातपाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू...




       आमच्या मुरुमखेडावाडी शाळेने सन २०२० मध्ये तर करोना परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन फॉर चेंज अंतर्गत शाळेच्या समोर वाडीच्या लोकांना बाहेरून आल्यावर हात धुण्यासाठी व्यवस्था केली व हात धुण्याबाबतीत सतत प्रात्यक्षिक ही दिले. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दिड वर्षात करोना वाडीत आलेला नाही.


पुष्‍कळ लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. हात धुण्‍याचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखे ही स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात धूवून घ्‍यावेत.
   

१५ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस


हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
       
खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे
दुषित पाणी किवा अन्नातून ,आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास...अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास अनेक सुक्ष्म विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच फुफ्फुस्, यकृताचे  आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
               
या रोगांचा प्रसार रोखता येतो  तो म्हणजे नियमित स्वच्छ हात धुवून


   
    स्वच्छ हात धुण्याची पद्धत
१)प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी.   
२) हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा.

३)दोन बोटांमधील बेचक्या तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी.
४)हात धुतांना साबण कमीत कमी 20 सेकंदापर्येत ठेवणे आवश्यक आहे.
५)हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
       
          हात कितीवेळा व कधी धुवावे...




दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी
शौचालयाचा वापर केल्यानंतर
पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर
सापसफाई केल्यानंतर
आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर
बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर

हात धुण्यासाठी निश्चित संख्या नाही फक्त ती एक सवय व्हावी जेणेकरून आजारांना आळा बसून येईल.

       प्रकाशसिंग राजपूत
          औरंगाबाद 


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

देवा सुखाने शिकवू कधी...

 देवा सुखाने शिकवू कधी....



शाळेची वाजत घंटा रोज चालत होती  भारी,

व्हाटसअप आल्यापासून बिघडली  सारी,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



कोरोनाने विणला  होता मोठा सापळा,

शाळेला लागला होता भला मोठा ताळा...

सांग सांग देवा  सुखाने शिकवू

 कधी....



प्रयोगाची बनली आॕनलाईनची शाळा,

नेटवर्क नव्हता मोबाईल खिशात बाळा,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



करोनाला बसली एकदाची दातखिळी,

शिक्षण देतांना रोजच परिपत्रकाने भरे शिक्षकांची झोळी,

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



वैतागून सोडते व्हाटसअप वरील दरारा,

साहेब 🫴 म्हणी वरच्या साहेबांचा  आदेश करारा

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



शाळेला लागली आता पटसंख्येची चिंता,

शिक्षण झरा लागला आटायला पटसंख्या गिणता...

सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी....



 *🖋️प्रकाशसिंग राजपूत🖋️*

9960878457 

      औरंगाबाद




सुट्टी झाली कमी...

 औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या पत्रामुळे शिक्षकांच्या तब्बल आठवडाभराच्या सुट्ट्या कमी झालेल्या आहेत.

 प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर इतका होता परंतु आमदारांनी पत्र दिल्यामुळे या सुट्ट्या कमी करून 22 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर अशा करण्यात आलेले असून याबाबतीत औरंगाबादचे शिक्षक श्री महेश लबडे यांनी प्रत्यक्ष आमदारांना फोनवर याबाबतीत विचारणा केली .


खाली आपण काॕल ऐकू शकता.




शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीचे निषेध


विद्यार्थ्यांनी शेळया वळायला मागितले

 

'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.



इगतपुरी  तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक  जिल्हा परिषदेवर  निघाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात देखील इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन केले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पालक सभेत शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे.

येथील 43 विद्यार्थी हे पालकांकडून किंवा एकमेकांना शिकून शाळेचा विसर पडू देत नाही.

दरम्यान आता येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची मशाल घेतली असून हे विद्यार्थी नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. 'आम्हाला शाळा नको, शेळ्या वळायला द्याव्यात' अशी अनोखी मागणी घेऊन 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघाले आहेत. आपले दप्तर पाठीला लावून आणि सोबत शेळ्या घेऊन विद्यार्थी घोषणा देत आहेत. प्रशासनाचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून दप्तर जमा करण्यात येणार आहे. यासोबतच आम्हाला शाळा नको आता शेळ्या द्या अशी मागणीही केली.

नेमके  प्रकरण काय ?

दरेवाडी गावानजीक भाम धरण बांधण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना विस्थापित करण्यात आले. येथून जवळच म्हणजेच चारशे ते पाचशे मिटर अंतरावर गाव विस्थापित करण्यात आले. 

त्याचबरोबर येथील शाळा देखील त्या गावात उभारण्यात आली. मात्र येथील 30 ते 35 कुटुंबांनी विस्थापित होण्यास नकार दिला. परिणामी 43 विद्यार्थी देखील जुन्या गावात राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथेच शाळा असायला हवी. मात्र सर्व शिक्षा अभियानानुसार एक किलोमीटर परिघात शाळा असणे अनिवार्य आहे. त्यानुसार संबंधित 43 विद्यार्थ्यांसाठी विस्थापित गावात शाळा उभारण्यात आली आहे. ही शाळा या गावापासून अवघी चारशे ते पाचशे मीटरवर आहे, मात्र तरी देखील 43 विदयार्थ्यांची मागणी आहे कि शाळा इथंच पाहिजे.


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीने निषेध



NMMS 2022-23 परीक्षा बाबत सूचना

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ प्रसिद्धी निवेदनाबाबत आजचे पत्र .


 परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर

२०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

आजचे आदेश पहा....


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीचे निषेध






१०,२०,३० आश्वासित बाबत महत्त्वाचा आदेश

  ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. ०१.०१.२०१६ पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल." या उपपरिच्छेदाखालील तक्त्यामध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी आता सदर तक्त्यात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


पहा सविस्तर आदेश....




जिल्हातंर्गत बदली बाबत आजची अपडेट

जिल्हातंर्गत बदली अपडेट

  जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा शुभारंभ आता ग्रामविकास मंत्रालय आदेशानंतरच होणार आहे .



एक प्रकारे बदली प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली असून याबाबत पुढील निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी आता मात्र  मंत्रालयीन परवानगी  स्वरूपाचे असल्याने यामुळे बदली प्रक्रिया थांबलेली आहे.

 जिल्हा परिषदेच्या स्तरावरील यादी प्रसिद्ध करणे , रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे याच बरोबर अवघड क्षेत्राची यादी घोषित करणे या प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेल्या असून केवळ मंत्रालयीन आदेशाची आता वाट पाहिल्या जात आहे .

एकदा जर  आदेश प्राप्त झाल्यास  जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

 एक विचार केल्यास सहा महिन्याच्या अंतरात मध्ये दोन वर्षाच्या बदल्या होणार आहे 2022- 23 च्या बदल्या या दिवाळीत होणार तर 2023- 24 च्या बदल्या या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे एकूणच या कालावधीमध्ये सर्वाधिक शिक्षकांच्या बदल्या या होणार आहेत .

ऑनलाईन बदली मध्ये होऊ घातलेल्या या सर्व बदल्या एक प्रकारे भरपूर काही बदल शिक्षण क्षेत्रामध्ये घडून आणणार आहेत.

 निश्चितच लवकरच बदली प्रक्रिया गती घेण्यासाठी  जिल्हांतर्गत बदलीचा शुभारंभाचा आता केवळ मंत्रालयीन आदेश येणे  बाकी आहे.

  प्रकाशसिंग राजपूत

   समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 


शाळा बंद करण्याचा असा केला छातभारतीने निषेध




१०० पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने केला शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

 

शिंदे गटाच्या  मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.


"शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका "

"जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा"

"एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती"

"बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी"

अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.