*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई कुबेर* येथे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद उत्साह होता दोन दिवसाच्या प्रचंड मेहनतीने छोट्या मावळ्यांनी दगड माती चिखल कालवून छोटी छोटी किल्ले बनवली छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचा या उपक्रमातून एक अनोखी प्रेरणा लेकरांना मिळाली यामुळे त्यांच्यातील
*योग्य नियोजन*
*एकीची भावना*
*शिवरायांबद्दलचा प्रचंड आदर*
*सामूहिक श्रमदान*
*ऐतिहासिक प्रसंगाची अनुभूती*
या वर्षा अनेक मूल्याची रुजवणूक झाली
किल्ले बनवताना मुले प्रचंड उत्साही आनंदी आणि दोन वर्षाचया करोना काळानंतर यावर्षीच्या मुक्त वातावरणात मुलांनी दगड माती विटा जमा करून स्वतः बनवलेले किल्ले यातून त्यांना एक वेगळाच आनंद मिळाला यावेळी शाळेतील आमचे सर्व शिक्षक सहकारी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी ही किल्ले पाहण्यासाठी व लेकरांचे कौतुक करण्यासाठी आले होते गेल्या पंधरा वर्षापासून करुणा काळ वगळता मी ज्या ज्या शाळेवर असतो त्या शाळेत हा दिवाळीच्या सुट्टी पूर्वीचा माझा खूप आवडता व विद्यार्थ्यांचा प्रचंड आवडता उपक्रम आहे शिवरायांच्या कार्याला या माध्यमातून प्रचंड आदर ठेवून त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी जी गड किल्ले राखली व संवर्धन केली त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा
🙏 *कालिदास रणनवरे*
जि.प.प्रा. शा. गेवराई कुबेर
केंद्र करमाड , ता/ जि.औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.