डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विद्यार्थ्यांनी शेळया वळायला मागितले

 

'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.



इगतपुरी  तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक  जिल्हा परिषदेवर  निघाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात देखील इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन केले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पालक सभेत शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे.

येथील 43 विद्यार्थी हे पालकांकडून किंवा एकमेकांना शिकून शाळेचा विसर पडू देत नाही.

दरम्यान आता येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची मशाल घेतली असून हे विद्यार्थी नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. 'आम्हाला शाळा नको, शेळ्या वळायला द्याव्यात' अशी अनोखी मागणी घेऊन 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघाले आहेत. आपले दप्तर पाठीला लावून आणि सोबत शेळ्या घेऊन विद्यार्थी घोषणा देत आहेत. प्रशासनाचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून दप्तर जमा करण्यात येणार आहे. यासोबतच आम्हाला शाळा नको आता शेळ्या द्या अशी मागणीही केली.

नेमके  प्रकरण काय ?

दरेवाडी गावानजीक भाम धरण बांधण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना विस्थापित करण्यात आले. येथून जवळच म्हणजेच चारशे ते पाचशे मिटर अंतरावर गाव विस्थापित करण्यात आले. 

त्याचबरोबर येथील शाळा देखील त्या गावात उभारण्यात आली. मात्र येथील 30 ते 35 कुटुंबांनी विस्थापित होण्यास नकार दिला. परिणामी 43 विद्यार्थी देखील जुन्या गावात राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथेच शाळा असायला हवी. मात्र सर्व शिक्षा अभियानानुसार एक किलोमीटर परिघात शाळा असणे अनिवार्य आहे. त्यानुसार संबंधित 43 विद्यार्थ्यांसाठी विस्थापित गावात शाळा उभारण्यात आली आहे. ही शाळा या गावापासून अवघी चारशे ते पाचशे मीटरवर आहे, मात्र तरी देखील 43 विदयार्थ्यांची मागणी आहे कि शाळा इथंच पाहिजे.


शाळा बंद करण्याचा असा केला छात्रभारतीने निषेध



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: