देवा सुखाने शिकवू कधी....
शाळेची वाजत घंटा रोज चालत होती भारी,
व्हाटसअप आल्यापासून बिघडली सारी,
सांग सांग देवा सुखाने शिकवू कधी....
कोरोनाने विणला होता मोठा सापळा,
शाळेला लागला होता भला मोठा ताळा...
सांग सांग देवा सुखाने शिकवू
कधी....
प्रयोगाची बनली आॕनलाईनची शाळा,
नेटवर्क नव्हता मोबाईल खिशात बाळा,
सांग सांग देवा सुखाने शिकवू कधी....
करोनाला बसली एकदाची दातखिळी,
शिक्षण देतांना रोजच परिपत्रकाने भरे शिक्षकांची झोळी,
सांग सांग देवा सुखाने शिकवू कधी....
वैतागून सोडते व्हाटसअप वरील दरारा,
साहेब 🫴 म्हणी वरच्या साहेबांचा आदेश करारा
सांग सांग देवा सुखाने शिकवू कधी....
शाळेला लागली आता पटसंख्येची चिंता,
शिक्षण झरा लागला आटायला पटसंख्या गिणता...
सांग सांग देवा सुखाने शिकवू कधी....
*🖋️प्रकाशसिंग राजपूत🖋️*
9960878457
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.