शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
"शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका "
"जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा"
"एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती"
"बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी"
अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमी पटसंख्येच्या शाळा बाबत नविन धोरण
शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....
जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.