जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा शुभारंभ आता ग्रामविकास मंत्रालय आदेशानंतरच होणार आहे .
एक प्रकारे बदली प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली असून याबाबत पुढील निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी आता मात्र मंत्रालयीन परवानगी स्वरूपाचे असल्याने यामुळे बदली प्रक्रिया थांबलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्तरावरील यादी प्रसिद्ध करणे , रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे याच बरोबर अवघड क्षेत्राची यादी घोषित करणे या प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेल्या असून केवळ मंत्रालयीन आदेशाची आता वाट पाहिल्या जात आहे .
एकदा जर आदेश प्राप्त झाल्यास जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.
एक विचार केल्यास सहा महिन्याच्या अंतरात मध्ये दोन वर्षाच्या बदल्या होणार आहे 2022- 23 च्या बदल्या या दिवाळीत होणार तर 2023- 24 च्या बदल्या या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे एकूणच या कालावधीमध्ये सर्वाधिक शिक्षकांच्या बदल्या या होणार आहेत .
ऑनलाईन बदली मध्ये होऊ घातलेल्या या सर्व बदल्या एक प्रकारे भरपूर काही बदल शिक्षण क्षेत्रामध्ये घडून आणणार आहेत.
निश्चितच लवकरच बदली प्रक्रिया गती घेण्यासाठी जिल्हांतर्गत बदलीचा शुभारंभाचा आता केवळ मंत्रालयीन आदेश येणे बाकी आहे.
प्रकाशसिंग राजपूत
समूहनिर्माता
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
शाळा बंद करण्याचा असा केला छातभारतीने निषेध
कमी पटसंख्येच्या शाळा बाबत नविन धोरण
शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....
जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.