डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नविन तंञज्ञानाची ओळख

नविन तंञज्ञानाची ओळख 


डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र हा शिक्षकांसाठी अनेक विविध कार्यक्रम घेतलेले आहे .यामुळे शिक्षकांना त्यांच्या कार्यामध्ये मदत मिळत आलेली आहे. अत्यंत उपयुक्त पीडीएफ अत्याधुनिक साधनांची माहिती ,नवीन पद्धती, शैक्षणिक व्हिडिओ अशा अनेक विविध उपक्रमांद्वारे शिक्षकांना उपयुक्त साहित्य समा मार्ग प्राप्त झालेले आहे .यामुळे शिक्षकांना दररोज अपडेट राहण्यामध्ये खूप मदत मिळाली आहे. त्यांना हे साहित्य वापरून विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रिया सुलभ करून देता आले.  अशाच प्रकारे समूहाद्वारे निर्मिती युट्युब वाहिनीचा ही वापर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विद्यार्थ्यांनाही या साधनांचा खूप मोठा उपयोग झालेला दिसून येत आहे. जेणेकरून प्रगत प्रगत महाराष्ट्र बनण्यासाठी डिजिटल समूहाने एक छोटेसे पाऊल उचललेले आहे. याच मिशनमध्ये आज जवळपास आठ हजार शिक्षक जोडलेली आहे. राज्यासह शेजारी असलेला कर्नाटक राज्याच्या  बेळगाव जिल्ह्यात ही समूह सक्रिय आहे.