डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Mid day meal on dining ....

                 मिड - डे- मिल आँन डायनिंग


  विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाण्यासाठी एकावेळेस ५० विद्यार्थी बसून जेवण करतील अशी डायनिंग टेबलची सुविधा शाळेतील बागेत करण्यात आली आहे. हा उपक्रम ही आजवरचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
         खाली जमिनीवर बसून आहार खात असतांना हवेने किंवा कोणी जवळपास चालून गेल्यामुळे ताटात धुळ , खडे येण्याची शक्यता असते याचबरोबर पावसाळ्यात ओल्या जागेवर आहार घेणे शक्य होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी योजना मी २०१७ साली बडकवस्ती माझ्या यापुर्वीच्या शाळेवर केलेली आहे. 
१३००० खर्चात मला ISO प्रमाणपत्र घेता आले असते पण ते फक्त कार्यालयात भिंतीवर ३ वर्ष सजून राहीले असते. तसे न करता तेवढया पैशात आमचे विद्यार्थी आनंदाने बागेत डायनिंग टेबलवर बसून जेवत आहे हाच शाळेचा व आमचा सन्मान आहे.

     प्रकाशसिंग राजपूत 
        सहशिक्षक 
     9960878457 

1 Comments:

Unknown म्हणाले...

तुमची शाळेसाठी मुलांसाठी असलेली तळमळ विविध उपक्रमांतून दिसून येते. Keep it up Sir!