डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 190 वा

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस190 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -९ मार्च २०२४

वार- शनिवार

तिथी- माघ कृ १४ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि १८ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शनिवार, 09 मार्च 2024

सूर्योदय 06:52, 

खगोलीय दुपार: 12:49, 

सूर्यास्त: 18:47,

दिवस कालावधी: 11:55, 

रात्र कालावधी: 12:05.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार


"तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलात तरी हरकत नाही, पण मानसिकतेने गरीब राहू नका"


Good Thought


Trust yourself!You know more that you think you do.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

लेबनॉन देशाचा शिक्षक दिन


9 मार्च 1982 : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग


9 मार्च 1454: अमेरिगो वेस्पुची,इटालियन खलाशी यांचा जन्मदिवस.


9 मार्च1930 : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक यांचा जन्मदिवस


9 मार्च 1934: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर यांचा जन्मदिवस (मृत्यू: 27 मार्च 1968)


special day


 

 Teacher's Day in Lebanon


 March 9, 1982: All the planets in the solar system are on the opposite side of the sun


 9 March 1454: Birthday of Amerigo Vespucci, Italian sailor.


 9 March 1930 : Dr.  U.  m.  Pathan – Birth anniversary of Vyasangi scholar of saint literature


 March 9, 1934: Birthday of Yuri Gagarin – the first astronaut to orbit the Earth (died: March 27, 1968)



🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी व तिचा अर्थ

रोज घाली शिव्या आणि एकदशीला गाई ओव्या

अर्थ:- एखाद्या दिवशी चांगले वर्तन ठेवणे.


English proverb


Better safe than sorry.


Meaning: It is better to be precautious than to have regrets later on.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

दोन बोटांचा रस्ता

त्यावर चाले रेल्वे

लोकांसाठी आहे उपयोगाची

क्षणात आग लावते


उत्तर:-आगपेटी


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

1 तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय?

उत्तर:-


2 तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते?

उत्तर:-


3 तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय?

उत्तर:- 


4 वारकऱ्यांनी संत तुकाराम यांना कोणती उपाधी दिली आहे?

उत्तर:-


5 संत तुकाराम यांचे गुरू कोण होते ?

उत्तर:-



General knowledge

 1 What is the full name of Tukaram Maharaj?

 -


 2 Which is the birthplace of Tukaram Maharaj?

 -


 3 What is the name of Tukaram Maharaj's famous book?

 -


 4 What is the title given to Saint Tukaram by Varkaras?

 -


 5 Who was Saint Tukaram's Guru?

 -


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


बोधकथा

खऱ्या खोट्याची पारख


एका सोनाराच्या मृत्यूनंतर  त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."


मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”


दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते  शिकू लागला.


थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.


एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."


आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?

  

मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.


काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"


तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.


पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."


सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: