शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत आज राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.
सविस्तरपणे जी.आर. वाचा .....
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत आज राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.
सविस्तरपणे जी.आर. वाचा .....
त्यानंतरही राज्यात 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या मुंबई वगळता राज्यातील शाळा आज (दि.17) सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी घेतला आहे.
महाराष्ट्रात 'मेस्टा' संघटनेशी संलग्न 18 हजार शाळा आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची संघटनेने तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात तायडे म्हणाले, 'पुण्यात जवळपास दीड हजार शाळा संघटनेशी संलग्नित आहेत. करोना संसर्ग कमी आहे, त्याठिकाणी शाळा उद्यापासून सुरू होतील. ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याठिकाणच्या शाळा 50 टक्के विद्यार्थी क्षमतेने सुरू केले जाणार आहे.'
दरम्यान, ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारकडून या संदर्भात अद्याप विचार केला जात आहे. तर 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रशासनाची मान्यता नसताना या शाळा नेमक्या कशा सुरू करणार? हा सुद्धा प्रश्न आहे.
पहिला दिवस मुलांचा उत्साह गगन भरारी घेणाराच जणू...... हक्काची सुंदर शाळा व येथे पाऊल पडले ते वेगळया विश्वात रमले......
२४ पैकी २२ विद्यार्थी उपस्थित होत. आज त्यांच्या हस्ते नविन संगणक उदघाटन ही झाले व डोंगराळ भागात गुगल सर्च इंजिन आता सज्ज झाला असून आता संपुर्ण जग हे वर्गात आल्याचे वाटू लागले. Skype चे ही दिमाखात खाते सुरुवात होत आता लवकरच जगवारी..... नवी गगन भरारी ही होणारच.....
*दिवसभराचा आनंद वेचल्यानंतर शाळा सुटल्यावर आमचा ग्रूप फोटो व त्यातील मुलांची प्रसन्नता मनाला भुरळ पाडणारीच आहे.....*
*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे*
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी ,
केंद्र करमाड, ता/जि औरंगाबाद