डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

राज्यभरात इंग्रजी शाळा आजपासून सुरु होणार

 राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी कोणतीच परवागनी दिली नाही. 

त्यानंतरही राज्यात 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या मुंबई वगळता राज्यातील शाळा आज (दि.17) सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी घेतला आहे.

       

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोसिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली.



महाराष्ट्रात 'मेस्टा' संघटनेशी संलग्न 18 हजार शाळा आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची संघटनेने तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात तायडे म्हणाले, 'पुण्यात जवळपास दीड हजार शाळा संघटनेशी संलग्नित आहेत. करोना संसर्ग कमी आहे, त्याठिकाणी शाळा उद्यापासून सुरू होतील. ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याठिकाणच्या शाळा 50 टक्‍के विद्यार्थी क्षमतेने सुरू केले जाणार आहे.'

या निर्णयाला प्रशासनाची मान्यताच नाही...

दरम्यान, ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारकडून या संदर्भात अद्याप विचार केला जात आहे. तर 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रशासनाची मान्यता नसताना या शाळा नेमक्‍या कशा सुरू करणार? हा सुद्धा प्रश्न आहे.



३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

पालकांना लुटायला मोकळे होतील, यांना म्हणावे , फीस कमी करा आणी खुशाल शाळा चालू करा.बघू यांची तरी हिम्मत.

Unknown म्हणाले...

8 च चालू केली शाळा त दुसऱ्या दिवशी पासूनच drees आणा मग शुज आणा मग तिसऱ्या दिवशी मेसेज आला की फीस भरा म्हणून...
अरे मुलांचं नुकसान होतंय तर शिक्षणावर भर द्या ना बाकी गोष्टी वर सक्ती का बरं...
अन या सक्तीच्या गोष्टी किती दिवस राहिलेत सत्र संपायला इंग्रजी शाळांचे तर 2 अडीच महिने

Unknown म्हणाले...

8 च दिवस चालू केली शाळा त दुसऱ्या दिवशी पासूनच drees आणा मग शुज आणा मग तिसऱ्या दिवशी मेसेज आला की फीस भरा म्हणून...
अरे मुलांचं नुकसान होतंय तर शिक्षणावर भर द्या ना बाकी गोष्टी वर सक्ती का बरं...
अन या सक्तीच्या गोष्टी किती दिवस राहिलेत सत्र संपायला इंग्रजी शाळांचे तर 2 अडीच महिने