डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
बदली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बदली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिल्हातंर्गत बदली अपडेट जिल्हाअंतर्गत बदलीबाबत...

            _जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात शासन निर्णय तयार झाला असून उद्या किंवा समोरच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे...._

 *आंतरजिल्हा बदलीबाबत...*

               _आंतरजिल्हा बदली संदर्भात वेळापत्रक सुद्धा लवकर निर्गमित होऊन बदल्या कार्यान्वित होणार आहेत..._ माहिती सौजन्य


                       

                *संतोष पिट्टलावाड*

                      राज्यध्यक्ष

      शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य


                  रवी अम्बुले

               विभागीय अध्यक्ष

शिक्षक सहकार संघटना नागपूर विभाग

बदली आॕनलाईन की आॕफलाईन #transfer,

 बदली प्रक्रिया सतत बदलत परत तिथेच....

शिक्षक बदली प्रक्रिया ही दिवसेंदिवस फारच जठील होत चाललेली आहे .

यासाठी दोन वेळेस ऑनलाईन बदलीचे सॉफ्टवेअर निर्माण झालेले आहे .असंख्य सुधारित धोरणही तयार करण्यात आले परंतु परिस्थिती जर पाहिली तर ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वेळखाऊ ठरत आहे .

ज्यामुळे आता पूर्ण संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. ऑनलाइन बदली प्रक्रियेत जितके न्यायालयीन प्रकरणे झाली तितके आजवर ऑफलाईन बदलीत कधी झालेले दिसून येत नाही.

 मध्यंतरीच्या काळात आलेला एलसीडी पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी मानला गेला जाऊ शकतो. कारण या बदली प्रक्रियेमध्ये बदली मागणाऱ्याला समोरच पर्याय देऊन बदली केल्या जायची आणि त्याचे समाधान त्या बदलीवर निश्चितच होऊन जायचे जवळजवळ 90% च्या वर समाधान या बदली मध्ये होऊन जायचे. परंतु आता जर विचार केला तर ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये प्रत्येक संवर्गात  प्रत्येक घटकावर अन्याय होत आहे असे दिसून येत आहे. आणि या बदली प्रक्रियेमधून खरंतर वेळ वाचवणारी प्रक्रिया हवी होती. तसं न होता यामध्ये अधिकार वेळ संपूर्ण प्रशासन व शिक्षकांचा जात आहे. एका हिशोबाने पाहिले तर आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वरदानच म्हणावी लागेल कारण आंतर जिल्हा बदलीला या प्रक्रियेने गतिमान केलेले आहे .

त्या स्वरूपात जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन बदलीनेस केल्या गेल्यास याचा निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे, परंतु जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही  जर एलसीडी पॅटर्ननुसार करण्यात आली व यासाठी जो संकलित डाटा जर एका ठिकाणी घेऊन असं जर करण्यात आले तर यामध्ये असं वाटत नाही की कोणावर अन्याय होईल माहिती संपूर्णतः निपक्षपाती राहून कुणालाही फायदा अथवा अन्याय करणारी ठरणार नाही .

संवर्ग निहाय या प्रकीयेत लवकरच बदली प्रक्रिया पुर्ण होण्यास लाभ होईल.

    प्रकाशसिंग राजपूत 

समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

हे केवळ माझे वैयक्तिक मत आहे  आपणांस काय वाटते ते काॕमेंट करा.....

शिक्षक बदली न होण्याबाबत शिक्षक संघटनांची भुमिका

 शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरत आहे, दरवर्षी बदली प्रक्रिया करणे आणि ती 31 मे पूर्वी ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण 7 एप्रिल 2021 च्या जीआरमध्ये नमूद आहे.

    उच्च न्यायालयाने देखील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.    शिक्षक संघटनांची याविषयी भुमिका  काय?


    शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे, तसेच शिक्षकांच्या बदल्या या तर तीन वर्षांनी झाल्याचं पाहिजे, असं म्हणत शिक्षक संघटनेने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शासनाने जर हा निर्णयही घेतला नाही तर राज्यभरात रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनानी दिला आहे.

    राज्य शासन जर बदल्यांसंदर्भात शिक्षण धोरणानुसार वागत असेल तर हा शिक्षकांवर अन्याय आहे. बदल्याच झाल्या नाही तर शिक्षक एकाच ठिकाणी खितपत पडेल.शिक्षकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाने शिक्षकांच्या बदल्या संदर्भात प्रमाणबद्ध धोरण सुचवावं आणि बदल्यांचा निर्णय बदलावा. शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत या धोरणाला शिक्षक संघटनांचा स्पष्ट विरोध आहे. जर शासन या धोरणावरच ठाम असेल तर राज्यभरात रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनानी दिला आहे.

जिल्हातर्गत बदलीचा ६वा टप्पा रद्द होणार नाही...!

 बदलु संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न 

मा. मंत्री, ग्राम विकास मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दालन क्र. १२३. पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे गुरुवार, १६.०३.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीचे इतिवृत्त सोबत दिलेले आहे.  


शिक्षक आॕनलाईन बदली अपडेट

  बदली अपडेट्स


महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला लवकरच सुरुवात होत आहे. ऑनलाइन माहिती भरताना राज्यातील दीड हजार शिक्षकांनी आपले बंद असलेले मोबाईल नंबर दिले आहेत. 

     या दीड हजार शिक्षकांनी आपले चालू असलेले मोबाईल नंबर देण्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

चालू असलेले  मोबाईल नंबर मिळाले की बदली प्रक्रिया सुरू करायला कोणतीही अडचण येणार नाही मोबाईल नंबर अपडेट झाले की कोणत्याही क्षणी बदली प्रक्रिया सुरू होऊ शकते.

 तसेच राज्यातील केंद्रप्रमुखांना एकापेक्षा अधिक केंद्रांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. केंद्रप्रमुखांच्या काही जागा ह्या राज्य सरकार व स्पर्धा परीक्षेद्वारे भरायचे असल्याने त्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तात्पुरत्या अभावित स्वरूपात भरण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात येत आहे. हा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत ग्रामविकास विभागाकडे जाईल. शिक्षण आयुक्त कार्यालयाशी सतत संपर्कात आहोत.*

शिक्षक बदल्या २०२२ शासन निर्णय Teacher transfer


 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत... शासन निर्णय  जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.


२. सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांवावतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी, असे अपेक्षित आहे.


१) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी.


२) विशेष संवर्ग भाग-१ मधील शिक्षकांची यादी.

३) विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी.


४) निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy)


५) संभाव्य रिक्त पदांची यादी.


६) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.


३. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्याबाबत सुचविले आहे.


जी.आर.डाऊनलोड करा....