डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक बदल्या २०२२ शासन निर्णय Teacher transfer


 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत... शासन निर्णय 



 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.


२. सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांवावतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी, असे अपेक्षित आहे.


१) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी.


२) विशेष संवर्ग भाग-१ मधील शिक्षकांची यादी.

३) विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी.


४) निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy)


५) संभाव्य रिक्त पदांची यादी.


६) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.


३. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्याबाबत सुचविले आहे.


जी.आर.डाऊनलोड करा....

२ टिप्पण्या:

DG म्हणाले...

29/05/2018 रोजी बदली झालेले शिक्षक हे बदली पात्र आहेत का? या प्रस्तावित बदल्यांसाठी कोणते शिक्षक बदलीपात्र म्हणून गणले जाणार आहेत ?

Sanjayrao Deshmukh म्हणाले...

नाही .
दि.३१/०५/१७ पुर्वि शाळेत रुजु झालेले शिक्षक . ( आस्थापनेत १० वर्षे पूर्ण केली असतील तर .