डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
School open लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
School open लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राज्यभरात इंग्रजी शाळा आजपासून सुरु होणार

 राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी कोणतीच परवागनी दिली नाही. 

त्यानंतरही राज्यात 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या मुंबई वगळता राज्यातील शाळा आज (दि.17) सुरू करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेशी संलग्नित इंग्लिश स्कूल संस्थाचालकांनी घेतला आहे.

       

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोसिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली.



महाराष्ट्रात 'मेस्टा' संघटनेशी संलग्न 18 हजार शाळा आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची संघटनेने तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात तायडे म्हणाले, 'पुण्यात जवळपास दीड हजार शाळा संघटनेशी संलग्नित आहेत. करोना संसर्ग कमी आहे, त्याठिकाणी शाळा उद्यापासून सुरू होतील. ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याठिकाणच्या शाळा 50 टक्‍के विद्यार्थी क्षमतेने सुरू केले जाणार आहे.'

या निर्णयाला प्रशासनाची मान्यताच नाही...

दरम्यान, ग्रामीण भागातील शिक्षकांसह अनेक शिक्षण तज्ज्ञांनी सरसकट शाळा बंद करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारकडून या संदर्भात अद्याप विचार केला जात आहे. तर 'मेस्टा' या संघटनेशी संलग्न असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रशासनाची मान्यता नसताना या शाळा नेमक्‍या कशा सुरू करणार? हा सुद्धा प्रश्न आहे.



मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....#back to school

 मुरुमखेडावाडी शाळेत पाखरं आनंदाने झेपावलीत....


मार्च २०२० नंतर  जवळजवळ २० महिन्यानंतर  १ ली ते ४ थी वर्ग सुरु झाले. 




      पहिला दिवस मुलांचा उत्साह गगन भरारी घेणाराच जणू...... हक्काची सुंदर  शाळा व येथे पाऊल पडले ते वेगळया विश्वात रमले...... 





        २४ पैकी  २२ विद्यार्थी उपस्थित होत. आज त्यांच्या हस्ते नविन संगणक उदघाटन ही झाले व डोंगराळ भागात गुगल सर्च इंजिन आता सज्ज झाला असून आता संपुर्ण जग हे वर्गात आल्याचे वाटू लागले. Skype चे ही दिमाखात खाते सुरुवात होत आता लवकरच जगवारी..... नवी गगन भरारी ही होणारच..... 

        



 *दिवसभराचा आनंद वेचल्यानंतर शाळा सुटल्यावर आमचा ग्रूप फोटो व त्यातील मुलांची प्रसन्नता मनाला भुरळ पाडणारीच आहे.....*

*थांबलो जरा आणखी  हरलो नाही,*
*उत्साह नवा दाटला मंत्र नवा जपला,*
*घेऊ तीच भरारी पंख हे पुन्हा पसरले,*
*सामना या भवितव्याचा नव्याने सजला....*



*प्रकाशसिंग राजपूत  व दिलीप आढे*

         सहशिक्षक 

  जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी ,

   केंद्र  करमाड, ता/जि औरंगाबाद

इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे....#school open



आता इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६




२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी असे आदेश काढण्यात आले. 



(i)  शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.


ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. 


iii) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.


(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.


(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे  विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविंडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.


२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.


२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. 


२.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.


३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील •अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.


४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा अशा सुचना देण्यात आल्या  आहे.


५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करण्याच्चे सुचविले आहे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावयाचा आहे. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करावयाचे आहे. 


शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६



Back to school

Watch video now

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे महाराष्ट्रात शाळा बंद पडली आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर अवद्या विश्वामध्ये शिक्षणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण न भेटल्याने डिजिटल साधनांची कमी असल्याने गेल्या दीड वर्षात शिक्षणावर परिणाम थोडाफार झालेला दिसून येत आहे. या वर्षी 4 ऑक्टोबर पासून करोनाचा  प्रभाव कमी झाल्याने राज्यात  शाळा पाचवी ते बारावी चे वर्ग नियमित सुरू झालेले आहे. एक नवीन  उत्साह विद्यार्थी  शिक्षकांमध्ये दिसून येत आहे यामध्ये पालकांचाही सहभाग वाढलेला दिसून येत आहे शिक्षण व शाळा ही सोबत असणाऱ्या गोष्टी असल्याने त्यांना वेगळे करणे शक्य होणार नाही. मुळात ऑनलाइन शिक्षण हा फक्त एक पर्याय असू शकतो परंतु संपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही यासाठी शाळा नियमित सुरू झालेल्या ह्या फारच उपयुक्त ठरणार आहे लवकरच पहिली ते चौथी चे ही वर्ग इमेज सुरू होऊन शिक्षण प्रवास सुखाचा होवो