डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
inter district transfer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
inter district transfer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आंतरजिल्हा बदलीचा ईमेल कसा असणार |inter district|online transfer| ottmaha|

 आंतरजिल्हा बदली अपडेट inter district transfer 



        आपल्या  gmail ला


उदयाला.....

जर बदली झाली तर


Your inter district transfer has been done as per your request...


असा मेल येईल....


आणि बदली नाही झाली तर...

You have not been transferred because vacancy is not available for choice you have given...


असा मेल येईल....



          रोस्टर नुसार रिक्त पदे असणार्‍या व साखळी होणार्‍या जिल्ह्यात  बदल्या झालेल्या शिक्षकांना व ज्यांची बदली होणार नाही त्यांना सुद्धा मेल येईल. 



            

 *माहितीस्तव*

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४.१२.२०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहे.

१. प्रत्येक जिल्ह्याला २ फाइल्स अद्ययावत करून पाठवायच्या आहेत. सदर फाईल्स व्हिन्सीस कंपनीकडून आपणास ईमेल वर पाठवलेल्या असून त्या अद्ययावत करून पाठवाव्या.

२. पहिल्या फाइल मध्ये जे शिक्षक २०१९ मध्ये रुजू झाले आहेत, अशा शिक्षकांची माहिती अद्ययावत करायची आहे.

३. दुसऱ्या फाइल मध्ये २०२२ मध्ये बदली झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल. त्या फाइलमध्ये २ कॉलम अद्ययावत करायचे आहेत.

(अ) Is Relieved - येथे yes किंवा no हे पर्याय भरायचे आहे. जर बदली शिक्षकाला त्या जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर yes निवडा नाहीतर no निवडा.

(आ) Status - येथे ड्रॉपडाउन मध्ये ४ पर्याय दिले आहेत.

१. Relieved -जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर निवडा.

२. Non relieved - जिल्ह्यातून मुक्त केले नसेल. संकलन-सतीश कोळी, शिक्षक समिती MSP

३. Rejected - शिक्षकाने बदली नाकारली असेल तर.

४. Court case - एखाद्या शिक्षकावर court case चालू असेल.

४. ईमेल मध्ये एक टेबल दिले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्याने बिंदुनामावली मध्ये खुल्या वर्गातील (एकूण) रिक्त पदांची जी संख्या भरली आहे ती टेबल मध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व EWS संवर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्यात.

वरीलप्रमाणे माहिती व्हिन्सीस कंपनीस तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

याबाबतचा आदेश पहा...


Inter district


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत | inter district | transfer | ottmaha|

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/ २०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि. ०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात,
येत आहेत. (31) शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी..


तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.
(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. असे आदेशीत करण्यात आलेले आहे.

पहा ७/०४/२०२१ चे आंतरजिल्हा बदली धोरण....*👇

https://youtu.be/C2Nqoo0wihY




inter district transfer आदेश पहा...👇


आंतरजिल्हा बदली


आंतरजिल्हा बदलीबाबत बिंदु नामावली अपलोड करण्याबाबत | inter district transfer

सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

.


बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा
अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक
शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर
अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. 

तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपआपल्या जिल्ह्यातील बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली यापुर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची कार्यवाही करावी.असे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना  आदेशीत करण्यात आलेले आहे.

मुळ आदेश पहा.... 


आंतरजिल्हा बदली