डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
service लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
service लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आता गुगलच्या या सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना वापरता येणार नाही

 पारदर्शकता, अचूकतेसाठी सर्वच गोष्टी ऑनलाइन व्हाव्यात, असं सरकारचं धोरण आहे. त्यानुसार शासकीय विभागांमध्येही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 

इंटरनेट वापरताना गुगलच्या विविध सुविधांचा वापर केला जातो,पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन  या सुविधा वापरता येणार नाहीत. कारण सरकारकडून यासंबंधी नविन आदेश काढण्यात आलेला  आहे.



सुरक्षा स्थिती सुधारणं हा या आदेशामागचा उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

 महत्त्वाची शासकीय कागदपत्रं गुगल ड्राइव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केल्यास सुरक्षेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होऊ शकतात. 

ही बाब लक्षात घेऊन इंडियन काॕम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम  आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वतीनं एक नवा आदेश काढण्यात आला आहे.

या आदेशानुसार, खासकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन या सुविधांचा वापर करता येणार नाही.