डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
shikashk badli लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shikashk badli लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे आजचे परिपत्रक|teacher-transfer-ottmaha-शिक्षक-बदली|

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे परिपत्रक....


या विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.

               

२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.


उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.


मूळ आदेश पहा...

शिक्षक बदली




शिक्षक बदल्या २०२२ शासन निर्णय Teacher transfer


 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत... शासन निर्णय 



 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.


२. सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांवावतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी, असे अपेक्षित आहे.


१) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी.


२) विशेष संवर्ग भाग-१ मधील शिक्षकांची यादी.

३) विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी.


४) निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy)


५) संभाव्य रिक्त पदांची यादी.


६) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.


३. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्याबाबत सुचविले आहे.


जी.आर.डाऊनलोड करा....