डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

२६/११ शहीदांना काव्यमय मानवंदना....#police #brave

मुंबई वर झालेला अतिरेकी हल्ला आपल्या वीर जवानांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांना यमसदनी पाठवले.... त्यांच्या या अफाट शौर्यास माझी काव्यमय मानवंदना.....





 🚨 🚓सदरक्षणाय...🚓🚨


सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,

या जन्मी होत अशी जनसेवा ,

लावुनी जीवाची बाजी करे देशसेवा...


दिवस रात्र  सदैव उभे राहती ,

शांती समाजास तेव्हाच लाभती,

येता संकट कसलेही जेव्हा,

खाकीत शोभूनी वीर हे लढती...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


सक्त घडत यांचा असा पहारा,

वाटत कठोर जरी यांचा दरारा,

मन आतुन असतेच कोमल,

मानवी सेवेत स्वतःस ठेवे जहाल,

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


अतिरेक्यांशी लढला उभ्या छातीने,

दिसे फक्त जनकल्याण खाकीने,

धावूनी  देत जीव  ओवाळून,

प्रेम असे मायभुचे मृत्यूस कवटाळून...

 

( सदरक्षणास मिळत नवं बळ,

खलनिग्रहणास बनत काळ,)


      *🪶प्रकाशसिंग राजपूत🪶*

            औरंगाबाद 

       9960878457

सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर, १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळेतील मुलांची शाळा सुरू होणार... #School open #primary open

 सुमारे दोन वर्षांच्या कालावधी नंतर ...

१ डिसेंबर २०२१ पासून प्राथमिक शाळेतील मुलांसह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत.


 सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.




मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली.  राज्य शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच कोविड प्रोटोकॉलसह तपशीलवार मानक कार्यप्रणाली  (S.O.P) जारी केली जाणार आहे..


 ऑक्टोबरपासून, 

  • शहरी महाराष्ट्रातील शाळा 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 
  • ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झाल्या होत्या.


 'राज्य मंत्रिमंडळाने आज राज्यभरातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ४ थी वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  बालरोग टास्क फोर्स आणि इतरांशी सलग चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.  आम्ही शाळा आणि पालकांसाठी तपशीलवार एसओपी तयार करण्यासाठी काही दिवस मागितले आहेत आणि म्हणून 1 डिसेंबरपासून ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,शिक्षणमंत्री  म्हणाल्या .  या वर्षाच्या सुरुवातीला या टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती जेव्हा तज्ञांना भीती होती की संभाव्य तिसऱ्या लहरीमुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो.

 कोविड-19 साथीच्या आजाराने राज्यात मार्च 2020 पासून शाळांमधील प्रत्यक्ष  वर्ग बंद केले होते.  12 जुलैपासून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या वर्गासाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले होते. 4 ऑक्टोबर रोजी शहरी भागातील शाळा 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, तर ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.


 शिक्षणमंत्री  म्हणाल्या  की, राज्य सरकारने निर्णय घेण्यापूर्वी दिवाळीनंतर 15 दिवस कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवले.  सणासुदीनंतर राज्यातील दैनंदिन प्रकरणे वाढू शकतात, अशी चिंता होती, परंतु सुदैवाने तसे झाले नाही.


 प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात येणाऱ्या अडचणी मान्य करताना गायकवाड म्हणाले की, हे एक आवश्यक पाऊल आहे.  'इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आणि शारीरिक अंतर राखण्याची सक्ती करणे कठीण आहे कारण ते खूपच लहान आहेत.  पण त्यांना पुन्हा शाळेत आणणेही आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून ते घरीच असल्याने हळूहळू ते मुख्य प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता आहे,असे गायकवाड यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


 विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे.  हे लक्षात घेऊन एसओपीमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिकाही निश्चित केली जाईल,असेही त्या म्हणाल्या.  पुढील सहा दिवसांत, शाळा, पालक आणि मुलांना शारीरिक वर्गांमध्ये सुरक्षितपणे बदलण्यासाठी अनुकूल करण्यावर भर दिला जाईल, कारण जवळपास दोन वर्षांपासून वर्गखोल्या बंद आहेत, अशा त्या म्हणाल्या.

पेन्शन संघर्ष यात्रा दिवस ३ रा.....#pension #dcps #nps

 *जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती..!*


( *निमंत्रक : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* )

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

( २४ नोव्हेंबर २०२१, बुधवार )





*१. सिन्नर : स्वागत* 


सिन्नर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेची आपली टीम तसेच शिक्षक संघ ( थोरात गट) यांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी संघर्ष यात्रेचे सिन्नर नगरीत स्वागत केले. 


*२. संगमनेर येथील स्वागत, पायी रॅली व सभा :* 


संगमनेर शहरातील घुलेवाडी फाटा पासून गाड्यांची रॅली पंचायत समिती पर्यंत पोहचली. तिथे रॅलीच स्वागत BDO साहेब यांनी केले. तिथून रॅली १ किमी चालत सभास्थळी पोहचली. 


संगमनेर मध्ये जोरदार, धडाकेबाज, आकर्षक नियोजन टीम ने केले होते. आमदार सुधीर तांबे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ताजी ढाकणे, लिपिकवर्गिय संघटनेचे सचिव जोर्वेकरजी यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्या टीम सह उपस्थित होते. 

या संपूर्ण उत्तम सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, सचिन नाबगे, शिवाजी आव्हाड, अमोल साळवे, विश्वस्त बाजीराव मोढवे सह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार. सर्वच टीमचे अभिनंदन..! यासोबतच आपल्या तालुक्यातील  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*३. राजगुरुनगर (खेड, पुणे ) येथील सभा :*


इंकलाब जिंदाबाद करून हसत फासावर लटकलेल्या ध्येयवेड्या शहीद राजगुरू यांच्या जन्मभूमीत  आजची झालेली सभा अतिशय उत्तम रित्या पार पडली.


प्राध्यापक, वन , आरोग्य आदी या सह शिक्षक संघटनेचे विविध स्तरीय पदाधिकारी, पेन्शन शिलेदार यावेळी उपस्थित होते. 


सदरची सभा देखील दणक्यात पार पडली. या आजच्या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभागृहाच्या जवळपास ५०% महिला भगिनी या वेळी उपस्थित होऊन पेन्शन विरोधात एल्गार करत होत्या. 


या उत्तम सभेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, वैभव सदाकाळ, योगेश ठोसर, विनायक शिंदे, सोमनाथ कुदळे यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*४. पुणे मनपा टीम कडून प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम :*


दिवसभराच्या धावपळीतून काहीतरी वेगळे करत आपले विविध प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे पुणे मनपा टीमचे जितूजी फापाळे, प्रणव काळे आदी पदाधिकारी यांनी केले.


*उपस्थित जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती सहकारी 

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

वितेश खांडेकर - राज्याध्यक्ष, मधुकर काठोळे

समन्वयक - सर्व शिक्षक संघटना, शैलेश भदाने - वनरक्षक वनपाल संघटना सचिव, गोविंद उगले - राज्य महासचिव, श्री. प्राजक्त झावरे पाटील - राज्य कार्याध्यक्ष, श्री. आशुतोष चौधरी - राज्य कार्याध्यक्ष, श्री. सुनिल दुधे - राज्य सल्लागार, श्री. शैलेश राऊत - कार्यालयीन चिटणीस, संजय सोनार - राज्य संघटक, श्रीमती दीपिका एरंडे मॅडम - राज्य मीडिया प्रमुख, श्री. नदीम पटेल - विश्वस्त, श्री. अनिल वाकडे - विभागप्रमुख नागपूर, अतुल खांडेकर - तालुकाध्यक्ष उमरेड, नागपूर, अनिल पत्रे - तालुकाध्यक्ष मौदा, नागपूर


सहकाऱ्यांनो,

भक्कम पाठबळ आणि प्रेम असेच राहू द्यात.


*कायम आपलाच,*

श्री. प्राजक्त झावरे पाटील

राज्य कार्याध्यक्ष

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

______________________________

मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...#robotics #robotcar

 


मुरुमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली रोबोटिक्स कार ...


https://youtu.be/FfJ93rVAg2s



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही आता तंत्रज्ञान क्षेत्राची गोडी लागत आहे.  औरंगाबाद तालुक्यातील मुरूमखेडावाडी अतिशय दुर्गम डोंगर भागात असलेली एक प्राथमिक शाळा आहे. 





अवघड क्षेत्रात शाळा असताना सुद्धा येथे अनेक बदल पाहायला दिसून येतात.यापूर्वीही

  •  रोबोसेपियन डेमो ,
    ड्रोन प्रात्यक्षिक, 
    ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
    सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
    करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
     हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
     १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • ड्रोन प्रात्यक्षिक, 
  • ऍडव्हान्स व्हिडीओ ट्रान्समीटर  , 
  • सोलार ऊर्जेवर २ वर्षापासून चालणारा आमचा अभ्यासकट्टा, 
  • करोना बाबतीत "हात पाय धुवू करोना वाडीबाहेर ठेवू",
  •  हरित शाळा अभियान अंतर्गतचे तयार झालेले घनवन व त्यास अत्याधुनिक पद्धतीने जलसिंचन,
  •  १००% डिजिटल व सुंदर शाळा अशी भव्य झेप शाळेने घेतलेली आहे.....
  • सुंदर माझी शाळा


 असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग घेण्यात आले आहे.

 याच बरोबर विद्यार्थ्यांनी श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोट कार ची जुळवणी करत ही कार ठरवलेल्या ट्रॕकववर कशी चालते याचे प्रात्यक्षिक ही सादर केले आहे.

ही कार  स्वतः ठरलेल्या मार्गावर चालते आणि लवकरच यावरच आधारित एक उपयुक्त नवीन मॉडेल तयार करणार आहे. ज्याचा उपयोग निश्चितच एक मार्गदर्शक असा ठरणार आहे. अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्ष गंगुबाई विष्णू बचाटे शाळेतील शिक्षक  श्री  प्रकाशसिंग राजपूत दिलीप आढे, , वैजिनाथ साबळे, काशिनाथ बचाटे, सुदाम बचाटे , धरमसिंग बालोद, गजानन साबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

एस टी कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी...#st #Pagar #salary

 

एस.टी. कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी ....



राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता मोठी भरघोस वाढ होणार आहे.


 ज्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.

 त्यानंतरची आता ही मूळ वेतनात वाढ होणार आहे .त्याच्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 कर्मचाऱ्यांच्या सेवा नुसार या वेतनामध्ये वाढ होणार आहे ज्याप्रमाणे

  •  एक ते दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनामध्ये 5000 ची वाढ होणार आहे.
  • १० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मध्ये 4000 ची वाढ होणार आहे.
  •  तर 20 पेक्षा जास्त वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मधील 2500/-  ची वाढ होणार आहे.

 2021  झालेली ही वाढ एस.टी.  कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची  बातमी असणार आहे

🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू... #unicef covid

 राष्ट्रीय स्तरावरील आयोजित स्पर्धेत...

 जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी , केंद्र / बीट करमाड , ता/ जि. औरंगाबाद  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना या संकटापासून वाडीला वाचविण्यासाठी शोधलेला हा उपाय खूपच महत्त्वाचा व वाडीच्या लोकांना आरोग्य व स्वच्छतेचा संदेश देणारा ठरणार आहे. 



जगभरामध्ये पसरलेल्या करणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . लोकांचा बाहेर जाणे येणे  थांबवता येत नाही. पण घरी येताना त्यांनी जर स्वच्छतेची काळजी घेतली तर निश्चित या संकटापासून वाचण्यासाठी पूरक असा उपक्रम मुरूमखेडावाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे .त्यांना या कामासाठी शाळेचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलेले आहे.



वर स्टोरी पहा 

 शालेय जीवनात मुलांना मिळालेला हा अनुभव पुढील आयुष्यामध्ये त्यांना निश्चितच आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण होण्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. समाजाविषयी एक नागरिक म्हणून आपले काय देणे असते याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांना टाळता येते याची जाणीव सुद्धा त्यांना यामुळे होणार आहे. हे करत असतांना विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस याबाबतीत विचार करण्यास सुरुवात केली त्यांना मुख्यतः खालील समस्या या सतावत होत्या.




१) लोक वारंवार बाहेरगावी जातात.
२) हात पाय न धुता तसेच घरात येतात.
३) लोकांना हात धुण्याची योग्य पद्धत माहीत नाही.
४) डोंगर खोर्‍यात वाडी असल्याने सुरक्षित आहे पण सतत जाणारे-येणारे धोका वाढवीत आहे.

       या सर्व समस्यांवर विचार करत त्यांनी *🙌🏼हात पाय धुवू.....करोनाला वाडीबाहेर ठेवू...*

    या उपक्रमाची स्वतः आखणी केली . वाडीतील मोठया मुलांच्या सहकार्याने वाडीत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्यांनी शाळेसमोर हात पाय धुण्यासाठी नळ व वटा निर्माण केला व तेथे हँण्डवाँश लिक्विड उपलब्ध करुन दिले. 

             एक प्रकारचा थांबा निर्माण करत लोकांना बाहेरून येतांना हात पाय धुवून वाडीत येण्याविषयी प्रबोधन केले व हात धुण्याची योग्य पद्धत ही समजावली.

       "small things make big change"

       याप्रमाणे या उपक्रमाचा फायदा खालीलप्रमाणे होणार आहे.

१) लोक बाहेरून येतांना हात पाय स्वच्छ करुन येणार असल्याने कुटूंबाला तसेच पर्यायाने समाजाचा कोरोना पासून बचाव होणार आहे.

२) हात धुण्याची योग्य पद्धत ही लोकांना माहित होणार आहे.

३) जेव्हा शाळा उघडातील तेव्हा शाळेत येतांना व शाळेतून जातांना विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.


           *विद्यार्थी सहभागी टीम*


जयपाल बालोद,पार्थ बचाटे,  साक्षी बचाटे , कल्याणी बचाटे, सागर बालोद, प्रतिक्षा बचाटे.*

                *मार्गदर्शक*

        *प्रकाशसिंग राजपूत*

            

               *सहकार्य*

    *श्री दिलीप आढे*

*अर्जून बालोद व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य*


Share for care....

▶️ *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🎞️


आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....

 आँनलाईन व डिजिटल शिक्षण- तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे....


जगभरात आलेले संकट हे खरंच आव्हानात्मक आहे. भारत देश विकसनशील राष्ट्र असून आपल्या देशात आरोग्य व शिक्षण या संमातर बाबी आहेत. पण अशा परिस्थितीत दोन्हीही संकटात आहे. 

       शिक्षण व्यवस्थेत आपण कधीच या परिस्थितीचा विचार केलेला नाही. एकवेळ आरोग्य साधने आपण लवकर निर्मित करुन उभारणी करु शकतो ,परंतु  शिक्षणात असे करणे आवाहनात्मक असणार आहे.

       तरी पण सोशल मिडिया व डिजिटल साधने सर्वत्र पसरले असल्याने आपण बहुतांशी कार्य किंवा  शैक्षणिक आव्हान पेलु शकतो.माञ १००% प्राप्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल .




       आपली शिक्षण पद्धती  ही आजवर शाळा व शिक्षण या स्वरुपातच बंधिस्त राहीलेली आहे. 

शाळेतच शिक्षण होईल याच पद्धतीने आपण राहीलो आहे त्यामुळे पण अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून लांब झालेले दिसतात. शिक्षक हा गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने कार्य करत आलेला आहे. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर शिक्षण प्रवास सुरु होतो तर पुढे त्याची शैक्षणिक प्रगती व आर्थिक परिस्थिती यावर त्याचे शिक्षण कसे होईल हे अवलंबून असते.साधारणतः हीच परिस्थिती  पुढे त्याला त्याच्या क्षमतेचा, कौशल्याचा व आवडीचा विचार न करत वाहत नेत असते. 

         कोरोना विषाणूने आलेला आजार एकूणच संपुर्ण शिक्षण प्रवाहाला थांबवून टाकतोय, खरं तर अशा परिस्थितीचा कोणत्याही शैक्षणिक धोरणात किंवा अभ्यासक्रम निर्मितीत विचार केलेला नाही. त्यामूळे आज समोर येऊन ठेपलेला हा कोरोना राक्षस आपल्या शैक्षणिक प्रगतीला थांबवून मागे आणू शकतो. आपण पुस्तक छापायचे व तोच अभ्यास विद्यार्थ्यांनी आत्मसात करत त्या आधारे गुणवत्ता तपासणी करायची हे ही त्या विद्यार्थ्यांची आवड किंवा अभिरुची न बघता. पुस्तकात बंद असलेले ज्ञान हेच त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार.

     गेल्या काही दिवसात दिक्षा अँप निर्मिती झाली व पुस्तकात क्यु आर कोडचा समावेश झाला व आपली पुस्तके छपाई सह डिजिटल स्वरूपात बनु शकली आहे.

        *डिजिटल व आँनलाईन शिक्षण स्वरूप*

📄 डी.एड /बी.एड शिक्षणात आदर्श पाठ सादरीकरण केल्या जाते ,त्याचप्रमाणे पाठयघटकातील प्रत्येक प्रकरणाचे आदर्श अध्यापनाचे व्हिडीओ जर पुस्तकात क्यु आर कोड स्वरुपात करण्यात आले तर फक्त अशा संकटातच नव्हे तर अनेकदा विद्यार्थी आजारपणाने गैरहजर राहीला किंवा पालकांचे अंशकालीन स्थलांतर होत असेल तर या नविन पद्धतीने त्या घटकांचे ज्ञान प्राप्त करु शकेल. व अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे अध्यापन सहज उपलब्ध होईल. पाठयक्रम रचना करतांना संबंधित अभ्यासगट अथवा राज्यातील विद्या प्राधिकरण यामार्फत १००% आदर्श पाठ त्या संपुर्ण घटकांचे बनवत क्यु आर कोडच्या साहाय्याने समाविष्ट करणे खूप हिताचे ठरेल.




🌐 बालक - पालक या स्वरूपात  व्हाटसअप समूह अथवा ब्राँडकास्ट लिस्ट बनवून एकञित इ कन्टेट देवाण घेवाण करणे.

▶️ अध्ययन निष्पती आधारित व्हिडीओंचे संकलन इयत्ता निहाय करत ते विद्यार्थ्यांना अध्ययन करिता नियोजनबद्ध पोहोच करणे.


📲दिक्षा अँपचे नियोजनबद्ध वापर तसेच अनेक शैक्षणिक  बोलो अँप, खुट इ. प्रभावी वापर करणे.


📲   क्लाऊड मिटींग, झुम अँप किंवा स्कायपी गुगल मीट या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी व्हिडीओ काँन्फरिंग करत अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतीमान करणे.


🧾 आँनलाईन टेस्टचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी प्राप्त क्षमतेचे मुल्यमापन करत आवश्यक असलेले अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करत वरील माध्यमातून तयारी करणे.

📱 मोबाईल एस.एम.एस पद्धतीने ज्यांच्याकडे अँण्ड्राईड किंवा मल्टिमिडिया फोन नाहीत अशा विद्यार्थ्यांना अध्ययन स्वरूप समजावत स्वयंअध्ययनास प्रवृत्त करत लघुत्तम कन्टेट एस एम एस द्वारे पाठवणे.

📱आँडीओ काँन्फरस काँल माध्यमातून शिक्षक एकञित सुचना अथवा श्राव्य अध्यापन ही शक्य होऊ शकते.

या सर्व क्रिया जलद होण्यात काही अडचणी आहेत त्या म्हणजे ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन नसणे, मोबाईल नेटवर्क जलद नसणे, नेटवर्क असले तरी महागडे इंटरनेट पँक, पालकांचा विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यातील उदासिनता.

       याबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेत शाळा, तालुका व जिल्हा समन्वय राहण्यासाठी  शिक्षक बहुतांशी तंञस्नेही नसल्याने निर्माण होणारी अडचण, तथा पालकांचे पुर्ण सहकार्य या सर्व गोष्टी  आँनलाईन व डिजिटल शिक्षण यावर प्रभाव टाकणारे आहेत.


     *प्रकाशसिंग राजपूत*

          सहशिक्षक 

जि.प.प्रा,शा.मुरुमखेडावाडी

  


    आँनलाईन व डिजिटल शिक्षण - तंञज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे.


If combined Child orphan and old age home

किती छान होईल ना? जर अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र केले तर....*


समाजात सदैव दोन घटक फारच दुर्लक्षित केलेले दिसून येतात. एक म्हणजे ज्यांना या समाजात नागरिक म्हणून तयार व्हायचे आहे ते तर दुसरे म्हणजे ज्यांनी या समाजासाठी खूप काही करून ठेवलेले असते परंतू त्यांचे असणे माञ समाजाला ओझे वाटू लागते. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात  आली असेल ती म्हणजे इथे चर्चा होत आहे ज्याला या जगात कोणीही नाही अशी अनाथ मुले व ज्याला या जगात सर्वजण असून ही परिस्थितीने झालेली परकी वृद्ध मंडळी ज्यांना त्यांचे कुटुंबातील लोक पहायला तयार नाहीत.




     आपण समाजात पहात असतो मुलांच्या  वाढदिवसाच्या दिवशी बरीच मंडळी या दोन्ही घटकांना एका दिवसा करिता का होईना परंतू प्रेम जिव्हाळा दाखवून परत येतात. परंतू याने काही यांचे जीवन बदलू शकत नाही .  


        एकीकडे देशाचे उज्वल भविष्य तर दुसरीकडे देशाच्या विकासाला हातभार लावून थकलेले खांदे*.

 एक सोशल मिडियावर एक फोटो याच बाबतीत वाचला व मन ते वाचून अगदी आतून पेटून उठले .खरंच जर या दोन्हीही घटकांना एकत्र आणले तर यांच्या आयुष्यात किती बदल होईल. मुलांना संस्कारांची , आदर्शवादी विचारांची व ममता, प्रेम जिव्हाळा याची शिदोरीच मिळेल. वयोवृद्धांना ही यांच्या सोबत नवचैतन्य व जीवन जगण्यातील नैराश्यावर उपाय मिळेल, नक्कीच आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर काही दिवस खरे जगण्याचे समाधान त्यांनाही मिळून समाजात एक नवा बदल या दोन्हीहीच्या एकत्रित होण्यातून मिळेल.



          अशा एका सामान्य बदलाने या दोन्हीही घटकावर सकारात्मक बदल होत असेल तर याकडे गांभीर्याने विचार करुन त्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे. आपल्या समाजाला पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा विसर होत आहे त्यामुळेच वृद्धाश्रम हे नको असलेले परंतू एक कटु सत्य भारतीय संस्कृतीत निर्माण झालेले आहे. 

         अतिथी देवोभव !.... माननारे आपण भारतीय लोक घरातीलच लोकांना बाहेर काढू लागलो हे आपल्या भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास  नाहीतर काय? .

        अलिप्त विभक्त कुटुंब पद्धती ही खरंतर समाजात खूप मोठी दरी निर्माण करणारी ठरली आहे. यातूनच स्वार्थ निर्माण होत तीच बीजे पेरली जाऊ लागली. ३०-४० वर्षापूर्वी इतकी वाईट अवस्था आपल्या कुटुंब  पद्धतीची नव्हती कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत नांदत होती. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण हे कुटूंब पद्धतीला हानी पोहचविणारे ठरले आहे. सुखसोयी करीता माणूस शहराच्या वाटा जरी धरू लागला,  परंतू वृद्धाश्रम ही  समाजात निर्माण झालेली समस्या फार जटील बनून राहीली आहे. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी आई वडील कष्ट करत राहीले त्यांनेच म्हातारपणी त्यांना असे परके करायचे हे किती कष्टदायी व मनाला त्रास देणारे आहे. त्यांच्या संपुर्ण आयुष्यातील हा वेदनादायी प्रसंगच असतो.

       अनाथ आश्रम मधील काही मुलांचे भाग्य उजळते ज्यांना दत्तक घेणारे पुढे सरकावतात परंतू प्रत्येक बालकाला हे भाग्य लाभत नाही. अशा सर्व बालकांना जर आश्रयरुपी या वृद्धांची वटवृक्षरूपी सावली मिळाल्यास त्यांच्यावर पडलेल्या संस्काराने नक्कीच त्यांचे ही भाग्य हे उजळून येईल पर्याने समाजाला उत्कृष्ट नागरिक ही लाभतील .  आई वडील नसले तरी असंख्य आजोबा आजी हे यांचे पालक बनतील तेव्हा यांना अनाथ बनविणारा देव ही स्वतःच्या निर्णयाचा विचार करु लागेल.

      अनाथ आश्रम व वृध्दाश्रम एकत्र करण्याच्या दिशेने समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे होईल या बाबतीत राजकीय , सामाजिक नवचैतना निर्माण होत भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाला प्रेरणा तर नक्कीच मिळेल आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीला जोपासणारे नागरिक म्हणून अभिमानाने या समाजात जगू शकू. 


          उत्कर्षाचा पेटवू नव ज्वाला,
          अनाथ न राहील येथील बाळा,
         आधाराची लाभेल एक काठी,
        वृद्धपणी सुटेल परकेपणाच्या गाठी....



        प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत 

                 

 आपल्याला काय वाटते काॕमेंटमध्ये अवश्य लिहा....

जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा... #4k #Ultra hd

🍂🍁🥀🌺🌸☘️🌿🥀🍁🍂

*🔮 सोशल मिडियावर पहिल्यांदा  अशी पोस्ट येत आहे .....*🔮


*_जिल्हा परिषद शाळा 4 k स्वरूपात नक्कीच पहा..._*




*Ultra Hd असा रेझ्युलेशन फाॕरमॕट ज्याला आपण 4k फाॕरमॕट म्हणून ही ओळखत असतो. 

आज Led tv घेतांना किंवा महागडे फोन घेतांना हा सपोर्ट आहे की नाही हे पाहिल्या जाते.*



    *आपल्या जिल्हा परिषद शाळा या डिजिटल युगात मागे नाहीत ..... जास्तीत जास्त शेअर करा....*

      *प्रकाशसिंग राजपूत*
              सहशिक्षक 

जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,

कें. करमाड, ता/ जि,औरंगाबाद 

व्हिडीओ पहातांना Quality - advance setting 1080 + पुढे पहा......

आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?... #school opening #digital portal.

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥



आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....



आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......   

हा फक्त एक  समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....

            डिजिटल समूह हा अनेक  वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*