डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक

  आता दप्‍तराचा भार हलका करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. 




या पुस्तकामध्ये सर्व विषयांचा पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना दररोज वर्षभराच्या अभ्यासाची सर्वच पुस्तके शाळेत घेऊन येण्याची गरज पडणार नाही.

 वर्षातील चार शैक्षणिक सत्रांसाठी केवळ चार पुस्तके असतील, असे प्रा. गायकवाड म्हणाल्या.

शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इयत्ता 1 ली ते दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'मल्टी लँग्वेजेस इंटिग्रेटेड बुक' असतील. या वर्षात यश मिळाल्यानंतर त्यापुढील वर्षापासून 3 री आणि 4 थी च्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अभ्यासक्रम लागू होईल.

२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची अपेक्षा

 २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांला शिक्षण दर्जेदार मिळावे म्हणून चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे त्याने थेट चांगले शिक्षणाकरिता सैनिकी  शाळेत भरती करून द्या अशी मागणी केली आहे .



 सरकारी शाळेत मला पाहिजे तेवढे शिक्षण मिळत नाही मला IAS बनायच आहे, त्यासाठी मला चांगल्या शाळेत प्रवेश करून द्या अशी इच्छा व्यक्त करत त्याने एक प्रकारे 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणा च्या बाबतीत असलेल्या आकांक्षा आणि अपेक्षा व्यक्त केलेले आहे.

 थेट बीबीसी मराठी कडून घेण्यात आलेल्या त्या विद्यार्थ्यांची मुलाखत आपण खालील व्हिडीओत  पाहू शकता.




https://fb.watch/d5yHjAkyF5/


पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ

थोडक्यात शिक्षक बदल्यांचे टप्पे...


पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ देण्यात आली.


पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार वैयक्तिक माहिती


दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज


जात प्रवर्गानुसार रिक्त जागांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे घ्यावे लागते ना हरकत प्रमाणपत्र...


एकाच जिल्ह्यात तीन ते पाच वर्षांपर्यंत काम केलेले शिक्षकच बदल्यांसाठी पात्र


 दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्याने त्यात पारदर्शकता नसल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे त्यासंदर्भातील कार्यवाही झाली नाही. शाळा सुरु होताच पोर्टल निर्मितीची तयारी सुरु होणे अपेक्षित होते, पण त्यासाठी विलंब लागला. त्याचवेळी 'एनआयसी'ने पोर्टलचे काम करण्यास नकार कळविला. त्यानंतर नवीन खासगी संस्था नेमण्यात आली. 

आश्वासित प्रगती योजना १०/२०/३० खाजगी शिक्षक बाबत शिफारस

आता सरकारकडून त्या कंपनीला सर्व डेटा देण्यात आला असून अजूनही ३० टक्के काम राहिलेले आहे. त्यामुळे शिक्षकांची प्राथमिक माहिती भरणे (नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक, जात प्रवर्ग, शाळा, जिल्हा, बदली कुठे पाहिजे ज्याची माहिती) अपेक्षित आहे. सध्या पोर्टल अर्धवट स्थितीत असल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडेच ती माहिती ऑफलाइन द्यावी लागत आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दोन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने त्या शिक्षकांच्या बदल्या होतील. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अंदाजित दोन महिने लागतील, असा अंदाज आहे.