डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे.






महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ५ जून रोजी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली  होती. 

केंद्रप्रमुख पदे ही बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता ५० टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेने ५० टक्के अनुशेष भरण्याच्या निर्णय घेतला होता; परंतु गेल्या ७९ वर्षांत ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्याने आता परीक्षेसाठी कमाल ५० वर्षे वयोमर्यादा आणि पदवीला ५० टक्के गुणांची अट ठेवल्याने अनेक सेवाज्येष्ठ, अनुभवी, राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पात्रता असूनही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते.



बी.एड. आवश्यक प्रमाणपत्रे b.ed, ycmou,

 अपेक्षित कागदपत्रे


(क) बी. एड. प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणी करतांना बी.एड. प्रवेश माहितीपुस्तिकेतील दिलेल्या महानगरपालिका आयुक्त/गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी / जिल्हा परिषद, प्रशासन अधिकारी / मुख्याध्यापक संस्था प्रमुख ह्यांनी प्राथमिक शिक्षकांना दिलेले शिफारस प्रमाणपत्र पडताळणीस येतांना प्रत्येक उमेदवारांनी भरून आणणे अनिवार्य आहे. (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र. ६ पाहावे.)


सर्व फाॕर्म डाऊनलोड करा...


 (ख) बी. एड. प्रवेश माहितीपुस्तिकेतील दिलेले मेंटॉर प्रमाणपत्र प्रत्येक उमेदवारांनी (शाळेतील वरिष्ठ शिक्षक) प्रवेश पडताळणी वेळी भरून आणणे अनिवार्य आहे. (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र. ८ पाहावे.)


(ग) Online संगणकीय मूळ अर्जाची प्रत.


(घ) शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती. 

(न) प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती अनुभवाचे दाखले.


(त) मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत अनुसूचित जाती (एस.सी.) जातीचा दाखला अनुसूचित जमाती (एस.टी.) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र विमुक्त जमाती / भटक्या जाती / इतर मागासवर्गीय / विशेष मागासवगीय

(VJ/NT/OBC/ SBC) जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे

वैध कालावधीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. EWS - प्रवर्गाच्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे /दाखले/ दस्तऐवज.


(ड) जन्मतारखेचा पुरावा दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.


(च) सर्व सेवेचे नेमणूक आदेश. शिक्षणधिकारी / शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता


पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती शाळा मान्यतापत्र. 

(छ) मेंटॉर (वरिष्ठ शिक्षक) मान्यता प्रमाणपत्र (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र. ८ पाहावे.)


(ज) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती.


(झ) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी. (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी) (न) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र महत्त्वाचे : आपण नोंदवलेल्या अध्यापन अनुभवाचा पुरावा म्हणून आपली मूळ सेवा पुस्तिका / सेवा


ऑर्डर इन्स्पेक्शन रिपोर्ट इ. पैकी किमान एका मूळ दस्त ऐवजाची प्रत तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे. समितीला मूळ कागदपत्र तपासताना शंका निर्माण झाल्यास त्या मुह्यासंदर्भात दुसऱ्या पुराव्याची मागणी समिती करेल. त्यावेळी तात्काळ तुम्ही तो सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे मूळ सेवा पुस्तिका व सेवा आदेशाच्या सर्व प्रती सोबत ठेवाव्यात.


11) आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे शासन नियमानुसार जातीचा दाखला, जात वैधता व ना सायस्तर (नॉन क्रिमीलेअर) दाखला इ. शासन नियमानुसार आवश्यक ते दस्तऐवज असणे बंधनकारक आहे. 12) सामाजिक आरक्षणासंदर्भात लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे खालीलप्रमाणे पुरावे असावे.


• दिव्यांग : दिव्यांग असल्याबाबतचे शासन निर्णयानुसार सक्षम अधिकान्याचे प्रमाणपत्र.


प्रकल्पग्रस्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, परंतू


त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक. • आपत्तीग्रस्त: उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे प्रमाणपत्र परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे


नाव असणे आवश्यक.


• स्वातंत्र सैनिक पाल्य सैनिकाची पर / अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबं


• आजी/माजी सैनिक पाल्यः सैनिकाची


/ अविवाहित मुलगी यांनी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक, नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक. विधवा : महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू

बी.एड. कागदपत्रे तपासणी व वेळापत्रक

 बी.एड. प्रवेश सन २०२३-२५ या तुकडीसाठी अनुभवाची अंतिम तारीख दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.



कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. 

1) बी. एड प्रवेशासाठी Online अर्ज भरलेल्या प्रवेशेच्छुकांनी प्रवेशअर्ज पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर नियोजित दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 

2) प्रवेश अर्ज पडताळणीसाठी प्रवेशेच्छुकाने आपला प्रवेश अर्ज भरतेवेळी वापरलेला User Id व Passwordआणावा, त्याशिवाय आपल्या अर्जाची पडताळणी होणार नाही.

 3) Online प्रवेश अजांची पडताळणी केलेलेच प्रवेश अर्ज बी.एड. प्रवेश सन २०२३ २५ साठी पात्र राहतील. 

4) विभागीय केंद्रामार्फत बी.एड. प्रवेशअर्ज कागदपत्र पडताळणी (Document Verification) न करणारे उमेदवार सन २०२३ २५ तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील. 

5) प्रवेश अर्ज पडताळणी करतांना उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी समितीला प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे मूळ पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. पुरावे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यात कोणत्याही स्वरूपाच्या नवीन माहितीची भर घातली जाणार नाही ह्याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 (6) विभागीय केंद्रावर प्रवेश अर्ज पडताळणी दरम्यान शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचा गोंधळ / गोंगाट

निर्माण होणार नाही याची काळजी घेवून समितीला पूर्णतः सहकार्य करावे.

 7) कागदपत्र पडताळणी समिती कक्षात फक्त उमेदवारांनाच प्रवेश करता येईल. उमेदवारांशिवाय अन्य नातेवाईकांना पडताळणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. 

8) उमेदवारांनी प्रवेश समितीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी, जबरदस्ती, मारहाण, अपशब्द वापर, वाद घालणे, दस्तऐवज चोरी, सरकारी कार्यालयात गोंधळ अथवा अनधिकृत जमाव केल्यास भारतीय दंड संहितेनुसार (IPC) कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

संपुर्ण सुचना व मार्गदर्शन पहाण्यासाठी पत्र डाऊनलोड करा...





वेळापत्रक पहाण्यासाठी क्लिक करा...