डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शाळेच्या रेकाॕर्डला जन्मतारीख, नावात, जातीत बदल करण्याची प्रक्रिया #school record,name change,

 शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या नाव, आडनाव, जात/ पोटजात व जन्मतारीख यात बदल करण्याबाबतचे नियम व पद्धती शाळेच्या अभिलेखातील विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, जात, पोटजात, जन्मतारीख इत्यादींसारख्या नोंदीत दुरुस्त्या करण्याबाबत विभागाकडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या पद्धतीत एकरूपता असावी म्हणून खालील सूचना दिलेल्या आहेत.



(१) सर्वसाधारण नोंदवहीत एकदा केलेल्या नोंदीत यथास्थिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बदल करता येणार नाही. ज्या ठिकाणी अशी पूर्वमान्यता घेतली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख त्यांच्या सहीनिशी तांबड्या शाईने मान्यता दिलेला बदल नोंदवहीतील व शेऱ्याच्या स्तंभात किंवा योग्य ठिकाणी बदल करण्यास परवानगी दिलेल्या प्राधिकान्यांच्या पत्राचा क्रमांक व दिनांक नमूद करतील.


(२) सर्वसाधारण नोंदवहीतील किंवा यथास्थिती शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील नोंदीत बदल करण्याबाबतचा अर्ज या कारणाकरिता विहित केलेल्या नमुन्यात विद्यार्थी जर अज्ञान असेल तर त्यांच्या/तिच्या आई-वडिलांनी / पालकांनी किंवा विद्यार्थी जर सज्ञान असेल तर त्याने / तिने स्वतः ज्या शाळेत विद्यार्थी शिकत असेल त्या शाळेच्या प्रमुखामार्फत शाळा ज्यांच्या अधिकारितेत येत असेल त्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा यथास्थिती संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला पाहिजे.


(३) या नियमात तरतूद केलेल्या मर्यादेशिवाय इतर कोणत्याही बाबतीत विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतर शाळेच्या अभिलेखात नोंदविलेल्या जन्मतारखेत बदलण् परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी सर्वसाधारण नोंदवहीतून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांत नक्कल करताना चूक झालेली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख इच्छित बदल प्रमाणपत्रात न करता प्रमाणपत्राच्या मागील बाजूस नोंदवील आणि नोंदीवर सही करून दिनांक टाकील. तसेच त्याचा शिक्का (रबर स्टॅम्प) उमटवील. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित शाळाप्रमुखाने पृष्ठांकित

केलेल्या नोंदीनुसार माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रात झालेली वर्णलेखनातील चूक किंवा खरीखुरी चूक दुरुस्त करण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्रपणे विचार करील.

शाळेच्या रेकाॕर्डला जन्मतारीख, नावात, जातीत बदल करण्याची प्रक्रिया  #school record,name change,    

टीप परिशिष्ट अठरामधील तरतुदीनुसार सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी त्या केल्यानंतर आई-वडिलांनी/पालकांनी साक्षांकित कराव्या लागतात. या नोंदीची जाणीव आई-वडिलांना / पालकांना करून दिल्यानंतर त्यांचे साक्षांकन घेतले असल्याची शाळाप्रमुखाने खात्री करून घेतली पाहिजे. शाळाप्रमुखाने प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याच्या प्रगतीपुस्तकात किंवा दिनदर्शिकेत केली पाहिजे व तिच्यावर विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची/पालकांची सही घेतली पाहिजे. 

(४) अनुज्ञेय बदल किंवा दुरुस्ती करण्याकरिता शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याकडून किंवा ज्याने शाळा सोडली आहे अशा विद्यार्थ्याकडून आलेल्या अर्जाबरोबर कोणतीही फी आकारली जाणार नाही.


(५) अर्ज पुढे पाठविताना शाळाप्रमुखाने अर्जावरील सही पालकाने/आईवडिलांनी विद्यार्थी जर सज्ञान असेल तर त्याने स्वतः केलेली असल्याची व अशा आ व्यक्तीनेच अर्ज केला असल्याची पडताळणी केली पाहिजे.


👉 जन्मतारखेतील बदलबाबत


(६) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना क्रमांक १ मध्ये अर्ज सादर केला पाहिजे. त्यामध्ये चुकीची नोंद कशी झाली याबाबतीत स्पष्टपणे स्पष्टीकरण करण्यात यावे.


(७) सुचविलेल्या बदलाच्या पुष्ट्यर्थ खालील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे. (एक) जन्मनोंदवहीतील प्रमाणित उतार.


(दोन) लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.


(तीन) ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत; आणि (चार) विद्यार्थ्यांच्या खऱ्या जन्मतारखेबाबत वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यासमोर


विदयार्थ्याच्या आईवडिलांनी किंवा पालकाने केलेले


(पाच) असल्यास, अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा


शपथपत्र; आणि


(८) दाखल केलेला कागदोपत्री पुरावा त्या मुलाची व आईवडिलांची स्पष्टपणे ओळख पटवणारा असल्याशिवाय आणि खरोखरीच चूक झाली आहे याबाबत कोणतीही शंका राहिली नाही अशा स्वरूपाचा असल्याशिवाय जन्मतारखेत कोणताही बदल करण्यास मंजुरी देऊ नये. बदल मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी तो मंजूर करण्याची कारणे लेखी नमूद करून ठेवली पाहिजेत.


शाळेच्या रेकाॕर्डला जन्मतारीख, नावात, जातीत बदल करण्याची प्रक्रिया  #school record,name change,    


👍नाव व आडनावातील बदल


(९) नावातील बदलांकरिता अर्जासोबत पुढील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे आणि पुढील पुराव्याची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय आणि त्याबाबत खात्री करून घेतल्याशिवाय कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाऊ नये.


अअ) दत्तविधानामुळे बदल झाला असेल तर त्याबाबतीत दत्तकपत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तकपत्राची प्रमाणित प्रत किंवा दत्तविधानामुळे नावामध्ये बदल झाला आहे हे दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र


(ब) विवाहामुळे बदल झाला असेल तर आईवडिलांचे किंवा पालकांचे व मुलींचे स्वतःचे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.


(क) अन्य सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकाने वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांपुढे केलेले शपथपत्र.


(१०) सार्वजनिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याच्या बाबतीत नावातील बदल मंजूर झाला असल्यास त्याने / तिने आपल्या नावातील बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे. मात्र विवाहामुळे नावात झालेला बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक नाही (११) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना क्र. २ मध्ये अर्ज सादर केला पाहिजे.


जात किंवा पोटजात यामधील बदल (केवळ मागासवर्गीय विदयार्थ्याच्या बाबतीत)


(१२) मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या जातीत किंवा पोट जातीत बदल करण्याकरिता


जात किंवा पोटजात यामधील बदल


(केवळ मागासवर्गीय विदयार्थ्याच्या बाबतीत) (१२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा पोटजातीत बदल करण्याकरिता


विदयार्थ्यांच्या पालकाने ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना ३ मध्ये अर्ज केला


पाहिजे.


(१३) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील सर्वसाधारण नोंदवहीतील "जात" किंवा "पोटजात" या बाबतीतील नोंदीत पुढील परिस्थितीत बदल करण्यास परवानगी


देता येईल :


(एक) सुरवातीलाच चुकीची नोंद केल्यामुळे.


(दोन) धर्मात बदल झाल्यामुळे.


(तीन) ती जात पूर्वी मागासवर्गीयेतर म्हणून समजली जात असेल व नंतर ती


शासनाने मागासवर्गय म्हणून घोषित केल्यामुळे किंवा ह्याउलट झाल्यामुळे.


(चार) दत्तविधानामुळे


(पाच) आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहामुळे


(सहा) अन्य कोणत्याही कारणामुळे


(१४) ह्या प्रयोजनासाठी जातीतील किंवा पोटजातीतील बदल करण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पुढील प्राधिकाऱ्यांनी दिलेले आवश्यक ते प्रमाणपत्र दाखल केले पाहिजे. (अ) वरील (एक), (दोन) आणि (तीन) मध्ये दिलेल्या कारणाकरिता


बृहन्मुंबई


(अ) मुख्य इलाखा दंडाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला इलाखा


दंडाधिकारी किंवा


(ब) जस्टिस ऑफ पीस, किंवा


(क) समाजकल्याण अधिकारी, बृहन्मुंबई, मुंबई


: (ड) जिल्हादंडाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले कार्यकारी


अन्य क्षेत्रात


दंडाधिकारी, किंवा


(ई) मानसेवी दंडाधिकारी किंवा


(फ) संबंधित जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी


(ब)


दत्तविधानामुळे जातीतील किंवा पोटजातीतील बदल करवून घेण्याकरिता करावयाच्या अर्जासोबत दत्तकपत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तकपत्राची प्रत किंवा दत्तकविधानामुळे नावात (कोणताही असल्यास) आणि ज पोटजातीतील झालेला बदल दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पाहिजे .

(क) आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहामुळे जातीतील किंवा पोटजातीतील बदल करवून घेण्याकरिता करावयाच्या अर्जासोबत, आईवडिलांचे किंवा पालकांचे आणि स्वतः विदयार्थ्यांचे / विद्यार्थिनीचे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आणि विवाहामुळे जातीत किंवा पोटजातीत बदल झाला आहे हे दर्शविणारे वरील (अ) मध्ये नमूद केलेल्या संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडले पाहिजे. टीप.- "मागासवर्ग" या संज्ञेचा अर्थ पुढील प्रकारच्या जाती-जमाती व त्यामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो :


१) अनुसूचित जाती आणि बुद्धधर्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील


मुंबई पुनर्रचना अधिनियम, १९६० च्या सातव्या व आठव्या अनुसूचीचा भाग


२) अनुसूचित जमाती


७- अ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी स्वीकृत केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या यादयांविषयीचा फेरबदल आदेश, १९५६ आणि शासनाने याबाबतीत वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार


(३) विमुक्त व भटक्या जमाती


शासन निर्णय, शिक्षण व समाज कल्याण विभाग, क्र. सीबीसी - १३६१ एम, दिनांक २१ नोव्हेंबर १९६१ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार शासनाने वेळोवेळी मागासवर्गीय म्हणून घोषित केलेल्या जाती


(४) इतर मागासवर्गीय


(१५) बदलास मंजुरी न दिलेल्या यथास्थिती शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध करावयाचे अपील, आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित उपसंचालकाकडे सादर केले पाहिजे. ( शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. जीएसी-१०८३/८९-एसई - २, दिनांक १६ मार्च, १९८३)


👇अर्ज डाऊनलोड करा....

https://linksharing.samsungcloud.com/vSzG0usq2Vyq










पॕनकार्ड वापरतात मग हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे #pancard,

 ज्याप्रमाणे आधार ही तुमची वैयक्तिक ओळख दर्शवते त्याचप्रमाणे  पॕनकार्ड हे तुमची आर्थिक व्यवहारातील खरी ओळख दर्शवते. आर्थिक व्यवहारांकरिता सध्या पॅनकार्ड अनिवार्य आहेच. पॅनकार्डचा वापर दैनंदिन आर्थिक बाबतीत  अधिकृत ओळखपत्रच म्हणून केला जातो. 



जर तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा सरकारी  ठिकाणी काम करत असाल तर पगारासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.

जन्मतारखेचा बरोबर खाली असलेल्या पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी आकड्यांनी होते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, कोणत्याही पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी अल्फाबेटने झालेली असते, त्यात AAA पासून ZZZ पर्यंत कोणत्याही तीन अक्षरांचा समावेश असतो.

 अक्षरे कोणती असतील याचा निर्णय आयकर विभाग घेत असतो.पॅनचे चौथे अक्षर हे आयकर विभागाच्या अधिकऱ्यांकडून नक्की केले जाते. जर पॅनकार्डच्या चौथ्या स्थानी P असेल तर संबंधित पॅनकार्ड हे खासगी असून एखाद्या व्यक्तीच्या नावे त्या पॅनकार्डची नोंदणी झाली आहे. 

त्याचप्रमाणे जर चौथ्या स्थानी जर 

  • G-  ने गव्हर्नमेंट असे दर्शवल्या जाते.
  •  F - असेल तर संबंधित पॅनकार्ड हे संस्थेच्या नावे नोंदणीकृत आहे.
  • AOP - म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन, 
  •  C - द्वारे कंपनी, 
  • T - द्वारे ट्रस्ट, 
  • H - म्हणजे अविभाजित हिंदू परिवार, 
  • B - म्हणजे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, 
  • L - ने लोकल, 
  • J - ने आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, 


पॅनकार्डवरील पाचवे अक्षर हे व्यक्तीचे आडनाव दर्शवते, जर एखाद्या व्यक्तीचे नाव कदम असेल तर पाचव्या स्थानी K लिहिलेला असतो. आडनावानंतर चार आकडे असतात. यात ००००१ ते ९९९९ पर्यंत कोणतेही चार आकडे असतात. हे आकडे कोणते असतील याचा निर्णय आयकर विभाग ठरवते. पॅनकार्डच्या दहाव्या स्थानी A ते Z मधील शब्द असतो.


       अशा प्रकारे तुमच्या पॕनकार्ड क्रमांक हा बनलेला असतो.

१० वी १२ वी परीक्षा वेळापत्रक आले #ssc, #hsc timetable,

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra education board) परीक्षा बाबत....


इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार 4 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. 

याबाबतचे मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून तेच वेळापत्रक विद्यार्थी, शाळा, पालक यांनी प्रमाण मानावे, आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू असे आवाहन मंडळाने पालक व परीक्षार्थींना  केले आहे.



दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक हे राज्य शिक्षण मंडळाच्या खालील   

https://www.mahasscboard.in

  संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. 

त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.


 वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे  विषयनिहाय वेळापत्रक  जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 80 गुणाच्या पेपरला 30 मिनिटे आणि 40 गुणाच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ मिळणार आहेत.




२१ डिसेंबर सर्वात लहान दिवस ठरला कारण पहा #shortest day

  २१ डिसेंबर हा वर्षाचा ३५५ वा (लीप वर्षांतील ३५६ वा) दिवस आहे;  वर्ष संपण्यास 10 दिवस उरतात.



 उत्तर गोलार्धात 21 डिसेंबर हा बहुतेकदा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. आणि  तो हिवाळ्यात येतो हा सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला जातो.  दक्षिण गोलार्धात, 21 डिसेंबर हा बहुतेकदा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि  उन्हाळ्यात येतो.


उत्तर गोलार्धाने मंगळवारी वर्षातील सर्वात लहान दिवस अनुभवला कारण तो त्याच्या कक्षेत सूर्यापासून दूर झुकलेला होता.  ते सूर्यापासून दूर झुकलेले असल्याने, त्याला कमी सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे दिवस लहान आणि रात्र मोठी होते.





 21 डिसेंबर रोजी हिवाळी संक्रांती हा विषुववृत्ताच्या उत्तरेकडील वर्षातील सर्वात लहान दिवस म्हणून चिन्हांकित करतो आणि ग्रहाला दोन भागांमध्ये वळवणाऱ्या रेषेपासून सर्वात दूर असलेल्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येईल.


 हा डिसेंबर संक्रांती आहे जो अधिकृतपणे उत्तर गोलार्धात हिवाळा हंगाम सुरू करतो आणि ग्रहाच्या दक्षिण भागात उन्हाळ्याची सुरुवात करतो.


 वर्षातील सर्वात लहान दिवशी सूर्य कधी मावळला?

 नवी दिल्लीत मंगळवारी सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी 5:29 वाजता सुर्यास्त झाला   फक्त 10 तासांहून अधिक प्रकाश मिळाला  २१ डिसेंबरचा सूर्योदय सकाळी ७:०४ वाजता झाला होता.


 SOLSTICE (संक्रांती) किती वेळा येते?


 SOLSTICE वर्षातून दोनदा येते.  उत्तर गोलार्धासाठी, उन्हाळा (जून) संक्रांती 20-21 जूनच्या आसपास आणि हिवाळा (डिसेंबर) संक्रांती डिसेंबर 21-22 च्या आसपास घडते.  नासाच्या अभ्यासाप्रमाणे संक्रांतीच्या वेळी, सूर्याचा मार्ग सर्वात दूर उत्तरेकडे किंवा दक्षिणेला दिसतो, तुम्ही कोणत्या अर्ध्या ग्रहावर आहात यावर अवलंबून आहे.  पृथ्वीवर ऋतू बदलतात कारण ग्रह सूर्याभोवती फिरत असताना त्याच्या अक्षावर थोडासा झुकलेला असतो.

आता ४ दिवसाचा कामकाजाचा आठवडा होणार... #Wor

 

2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात असे केल्या जाण्याची शक्यता आहे.  




 नवीन नियमांनुसार, भारतभरातील कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला तीन दिवसांची रजा मिळण्याची शक्यता आहे आणि इतरांसह चार दिवस काम करण्याची शक्यता आहे.  

केंद्राने या संहिता अंतर्गत नियमांना आधीच अंतिम रूप दिले आहे आणि आता राज्यांनी त्यांच्या बाजूने नियम तयार करणे आवश्यक आहे कारण कामगार हा समवर्ती विषय आहे, असे अहवालात म्हटले आहे.


 नवे नियम लागू केले तर देशातील सर्वसाधारणपणे कार्यसंस्कृती बदलेल.  आठवड्याच्या दिवसांच्या संख्येव्यतिरिक्त, कर्मचार्‍याचा टेक होम पगार तसेच त्याच्या किंवा तिच्या कामाच्या तासांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  पीटीआय या वृत्तसंस्थेच्या,  कर्मचार्‍यांना पुढील आर्थिक वर्षापासून तीन दिवसांच्या सुट्टीसह चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा आनंद घेता येईल.

 “४  लेबर कोड 2022-23 च्या पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या संख्येने राज्यांनी यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिले आहे.  केंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्याने, केंद्राने राज्यांनीही ते एकाच वेळी लागू करावेत, 


 केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गेल्या आठवड्यात राज्यसभेत उत्तर देताना सांगितले होते की व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थिती संहिता हा एकमेव कोड आहे ज्यावर सर्वात कमी 13 राज्यांनी मसुदा नियम पूर्व-प्रकाशित केले आहेत.

अहवालात जोडले गेले आहे की 13 राज्यांनी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती हितेवरील मसुदा नियम पूर्व-प्रकाशित केले आहेत.  हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड,  छत्तीसगड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब, मणिपूर, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश आहेत.