डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

Spoken English My Body Parts (माझ्या शरीराचे अवयव)

My Body Parts (माझ्या शरीराचे अवयव)

🔅

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी व संभाषण सराव होण्यासाठी श्री नितीन गबालेसर निर्मित इंग्रजी संभाषण हा उपक्रम आपणासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे.



       संकलन व प्रकाशन

        प्रकाशसिंग राजपूत 

       (समूहनिर्माता) 

(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र  )


My Body Parts (माझ्या शरीराचे अवयव)


Now I am speaking about my body parts.


मला दोन डोळे आहेत. ते माझे दोन कॅमेरे आहेत.

I have two eyes. Those are my two cameras.


मी डोळ्याने पाहतो. मी डोळ्याने हे सुंदर जग पाहू शकतो.

I see with my eyes. I can see this beautiful world with my eyes.


माझ्या डोळ्यामुळे मी छान दिसतो. माझे डोळे मोठे आहेत.

 I look nice because of my eyes. My eyes are big.


माझ्या डोळ्यांचा रंग काळा व पांढरा आहे.

The colours of my eyes are black and white. 


मी माझ्या डोळ्यांची खुप काळजी घेतो कारण ते खुप महत्त्वाचे आहे. 

I take care of my eyes very much because it is very important. 


डोळे माझे ज्ञानेंद्रिये आहेत. कारण डोळ्याने 83% ज्ञान मिळते.

My eyes are my sense organs because I get 83% of knowledge with my eyes.


मला दोन कान आहेत. मी कानाने ऐकतो.

I have two ears. I listen / hear with my ears.


मी माझ्या कानाने गोड आवाज व संगीत ऐकु शकतो

I can listen/hear sweet sound and music, with my ears. 


आपण कोणतीही भाषा एकेल्याशिवाय शिकु शकत नाही

We can't learn any language without listening. 


ऐकण्याने मला ज्ञान मिळते, म्हणून माझे कान ज्ञानेंद्रिये आहेत

I get knowledge from my ears; so these ears are sense organs.


आपण आपल्या कानाची काळजी घ्यायला हवी

We should take care of our eyes.


मला एक नाक आहे. नाकाने मी श्वास व वास घेतो

I have a nose. I breath and smell with my nose. 


मी माझ्या नाकाने विविध पदार्थाचे, फुलांचे छान वास घेऊ शकतो.

I can smell of different dishes, flowers, with my nose.



माझ्या नाकात दोन नाकपूड्या आहेत.

There are two nostrils in my nose.


माझ्या नाकाने मला वासाचे ज्ञान मिळते म्हणून ते ज्ञानेंद्रिय आहे. 

I get knowledge of smell with my nose so it is a sense-organ.


माझ्या नाकाने मी छान दिसतो.


I look nice because of my nose.




मला डोक्यावर केस आहेत.

I have hair on my head.


 माझे केस दाट व काळे आहेत.

My hair are thick and black.


माझे केस माझ्या डोक्याचे धूळीपासून उन्हापासुन व थंडीपासून बचाव करतात.


My hair protect my head from dust, sun and cold.


मी माझे मोजू शकतन नाही.


I cannot count my hair.


म्हताऱ्या व्यक्तींचे केस पांढरे असतात.

Old persons have white hair.


काळ्या केसांमूळे मी छान दिसतो.

I look nice because of my black hair.


माझे नाक हे डाव्या आणि उजव्या कानांच्या मध्ये आहे.

My nose is between my left and right ears.


मला एक तोंड आहे मी तोंडाने खातो व बोलतो.

I have a mouth. I eat and speak with my mouth. 


मला एक जिभ आहे मी जिभेने चव घेतो.

I have a tongue. I taste with my tongue. माझी जिभ लाल व गुलाबी आहे.


My tongue is red and pink.



माझ्या जिभेमूळे मी स्पष्ट बोलू शकतो.

I can speak clearly with my tongue.


 माझ्या जिभेमूळे मला चवींचे ज्ञान मिळते म्हणून ती ज्ञानेंद्रिय आहे.

I get knowledge of taste with my tongue so it is my sense organ.


माझ्या जिभेमूळे मी अनेक पदार्थांची चव घेऊ शकतो.

I can taste many dishes with my tongue.


मला बत्तीस दात आहेत.

I have thirty-two teeth.


मी माझ्या दाताने अन्न चावतो.

I chew the food with my teeth.


मी माझ्या दाताने चावू शकतो.

I bite with my teeth.


माझे दात पांढरे व मजबूत आहेत. मी माझ्या दाताने उस देखील खाऊ शकतो,

My teeth are white and strong I can even eat


आपण दररोज दोन वेळा दात घासले पाहिजे.

We should brush our teeth twice in a day. 


माझ्या पांढऱ्या व सरळ दातांमुळे माझं हास्यं छान दिसतं

My smile looks nice because of my white and straight teeth. 


मला एक मान आहे. माझी मान ही डोक्याला शरीराशी जोडते..

I have a neck my neck connects my head with the body. 


मी माझ्या मानेने डोक्याला 180° डीग्री कोनामध्ये फिरवू शकतो.

I can move my head in 180" degree angle. 


मी माझ्या डोक्याने व मानेने होकार व नकार दर्शवू शकतो.

I can indicate 'yes' and 'no' with my head and neck.


मला एक पोटं आहे. मी पोटात अन्न व पाणी साठवतो.

I have a stomach. I stoar food and water in my stomach.



मी माझ्या दोन्ही हाताने टाळी वाजवतो, वस्तु उचलतो.

I clap and lift object with my both hands.


 मी ढोपरांपासून माझे हात हालवू शकतो.

I can move my hands from my elbows.


 मी माझ्या हाताने बॅडमिंटन, कॅरम, टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, क्रिकेट हे खेळ खेळतो.

I play badminton, carom, Tennis, chess, vollyball, basketball, cricket with my hands.



माझ्या हातांना दहा बोटे आहेत

My hands have ten fingers.


माझ्या बोटाने मी वस्तु पकडतो. मी बोटाने टिचकी मारू शकतो.

I hold things with my fingers. I can snap with my fingers.


मी कॅरम आणि धनुष्यबाण चालवणे हे खेळ बोटोन खेळतो.

I play carom and Archery with my fingers. 


मी माझ्या बोटाने गोटी मारू शकतो.

I can strike a marble with my finger. 


मी माझ्या बोटाने पेन पकडतो व लिहितो.

I hold pen and write with my fingers.


बी बोटाने मुठ बनवतो.

I make the fist with fingers.


मला दोन पाय आहे, मी पायाने चालतो, पळतो, उड़ी मारतो.

I have two legs. I walk, run, jump with legs.


मी माझ्या पायाने आणि हाताने सायकल चालवतो.

I ride bicycle with my legs and hands


मी माझ्या पायाने फूटबॉल, लंगडी हे खेळ खेळतो.

I play football, langadi with my legs.





शाळा सुरु करणेबाबत.... शासननिर्णय

 


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत आज राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.

       सविस्तरपणे जी.आर. वाचा .....

जी.आर.पहा....


इंग्रजी संभाषण शिका जलद भाग १ learn english, spoken english

 इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी व संभाषण सराव होण्यासाठी श्री नितीन गबालेसर निर्मित इंग्रजी संभाषण हा उपक्रम आपणासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे.





दिवस पहिला

भाषांतरातून इंग्रजी शिका

Learn English through the translation.

Lesson No. 1

स्वतः ची ओळख व स्वतःबद्दल बोलणे

(Introduction and speaking about myself)

 सुप्रभात. माझे नाव राम आहे.

Good Morning. 
My name is Ram 

मी आता स्वतःची ओळख करून देणार आहे.

Now I am going to introduce myself. माझे पूर्ण नाव राम गणेश पाटील आहे.

My full name is Ram Ganesh Patil. 

मी अकरा वर्षाचा आहे.

I am eleven years old.

मी पाचवीत शिकतो.

I learn / study in class five.

मी गारखेडा नं. एक या गावात राहतो.

I live in Garkheda no.1 village.

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गारखेडा न. एक आहे.

My School name is Zilla parishad central primary school Garkheda no. 1


माझ्या वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव गंगा आहे.

My father's name is Ganesh and mother's name is Ganga. 


माझे वडील शेतकरी व आई गृहिणी आहे.

My Father is a farmer and mother is housewife.

माझे वडील शेतात काम करतात.

My Father works in the farm.

माझी आई आमच्या सर्वांची काळजी घेते.

My mother takes care of us.

माझ्या कुटूंबात एकुन सहा सदस्य आहेत.

There are six members /persons in my family. माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझे आजोबा, माझी आजी आणि मी.

My mother, my father, my sister, my grandfather, my grandmother and me. 

मला एक बहिन आहे पण भाऊ नाही.

I have a sister but I don't have a brother.

 माझ्या बहिणीचे नाव साक्षी आहे व ती आठवीत शिकते.

My sister's name is Sakshi and she learns in class eight.



मी दररोज शाळेत जातो.

I go to school every day.

मला माझी शाळा, शिक्षक व मित्र फार आवडतात.

I love my school, teachers and friends very much.

मला माझं कुटूंब खुप आवडतं.

I love my family very much.

मला गोष्ट वाचनं आणि मित्रांसोबत खेळणं फार आवडतं.

I like reading story and playing with friends.



क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे.

My hobby is playing cricket. 

गाणं गाणे ही माझी विशेष आवड आहे.

My passion is singing a song.



महेश हा माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे.

My best friend is Mahesh.

तो मला नेहमी मदत करतो व माझ्यासोबत खेळतो.

He always helps me and plays with me.

आम्ही आमची सुखं दुखं एकमेकांशी वाटतो.

We share our pleasures and sorrows with each other.

तो मला नेहमीच समजून घेतो. 

He always understands me.


मी दररोज व्यायाम करतो.

I do exercise every day.

मला क्रिकेट हा खेळ खुप आवडतो.

I like the game of cricket very much.

मी माझ्या मित्रांसोबत रविवारी क्रिकेट खेळतो.

I play cricket with my friends on Sunday. 

मला क्रिकेट हा खेळ आवडतो कारण तो खूप मजेशीर व मनोरंजक खेळ आहे.

I love cricket because it is very funny and interesting game.

मला पाव-भाजी हा पदार्थ खुप आवडतो कारण तो खूप चवदार असतो. 

I like Pav-bhaji because it is very tasty.

मला इंग्रजी हा विषय आवडतो.

I like English subject.

माझे आदर्श माझे आई व वडील आहेत.

My role models are my mother and father. 

माझा आवडता सण दिवाळी आहे, कारण तो दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे.

I like Diwali festival because it is the festival of lamps and happiness.



माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे कारण तो खुप प्रामाणिक प्राणी आहे.

My favourite animal is a dog because it is very loyal animal.

माझे आवडते शिक्षक श्री. सुनिल पाटील आहेत कारण ते खुप दयाळू आहेत आणि ते खुप छान शिकवतात.

My favourite teacher is Mr. Sunil Patil sir because he is a very kind teacher and he teaches very well. 

माझा आवडता खेळाडू रोहीत शर्मा आहे कारण तो खुप छान फलंदाजी करतो.

My favourite player is Rohit Sharma because he bats. very nicely.

माझा आवडता अभिनेता अजय देवगण आहे कारण तो खुप छान अभिनय करतो.

My favourite actor is Ajay Devgan because he acts very well.

मला डॉक्टर व्हायचे आहे.

I want to be a doctor.

माझा आवडता नेता महात्मा गांधी आहेत कारण ते एक महान स्वातंत्र्यसेनानी होते.

My favourite leader is Mahatma Gandhi because he was a great freedom fighter.



मला 'तानाजी' चित्रपट फार आवडतो.

I like 'Tanaji' movie very much. 

मला मोर हा पक्षी फार आवडतो. मला पोपट हा पक्षी सुध्दा आवडतो.

I like peacock very much. I like parrot too. 

मला गाणी आणि संगीत फार आवडते.

I love songs and music very much. 

मला सफरचंद व द्राक्षे फार आवडतात.

I like apples and grapes very much. 

मी माझ्या मित्रांना, शिक्षकांना व कुटूंबाला नेहमी मदत करतो.

I always help my friends, teachers and my family. 

एक सर्वोत्कृष्ट डॉक्टर बननं हे माझं स्वप्न आहे.

My dream is to become the best doctor.


शिक्षक बदल्या २०२२ शासन निर्णय Teacher transfer


 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत... शासन निर्णय 



 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.


२. सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांवावतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाांधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालीलप्रमाणे माहितीची पुर्तता केली असावी, असे अपेक्षित आहे.


१) बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी.


२) विशेष संवर्ग भाग-१ मधील शिक्षकांची यादी.

३) विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी.


४) निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy)


५) संभाव्य रिक्त पदांची यादी.


६) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.


३. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झालेली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक २०.२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्याबाबत सुचविले आहे.


जी.आर.डाऊनलोड करा....

रात्रशाळा बाबत समितीचे गठन

 रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबी, रात्रशाळेची संचमान्यता इत्यादी बाबींच्या संदर्भात संदर्भ-१ मधील शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. 



 शासन निर्णय दिनांक १७.५.२०१७ मधील काही तरतूदी, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील तरतूदींशी विसंगत असल्याचे निदर्शनास आल्याने आता शासनाने  सन २०२१ च्या तृतीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्र. ४०५ वर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक १७.५.२०१७ चा पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यामूळे याबाबतीत शासनाने याबाबत खालील शासन निर्णय दिला आहे.

..   

शासन निर्णय:


शासन निर्णय दिनांक १७.५.२०१७ चा पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी खालील प्रमाणे समितीची स्थापना करण्यात आली आहे.


१. अध्यक्ष 

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग


२. उपाध्यक्ष

मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग


३.  सदस्य


१) मा. श्री. विक्रम काळे, वि. प.स.


२) मा. श्री. कपिल पाटील, वि. प. स.


(३) मा. श्री. विलास पोतनीस, वि. प. स.


४. सदस्य सचिव


शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४/टीएनटी-१


. समितीची कार्यकक्षा:


दिनांक १७.५.२०१७ च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करणे. रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करणे.


-


६) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


७) श्री. इ. मु. काझी, सह सचिव, शालेय शिक्षण


४) मा. श्री. ज. दि. आसगावकर, वि. प. स. ५) अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


डी.एड हे शासकीय महाविद्यालये बंद होणार...