डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

एकदा नक्कीच पहा... Marathi status

 जीवनात काही विचार खूपच महत्त्वाचे ठरतात. सोशल मिडियावर एक फारच सुंदर पोस्ट वाचली व यातील प्रत्येक शब्द मनात घर करुन जाणारा होता. Marathistatus

आयुष्य जगत असतांना अशा सुंदर विचारांची साथ नक्कीच असावी. Good thoughts



विद्यार्थ्यांचा Apaar Id काढणेबाबत

 विद्यार्थी, पालक आणि शाळांसाठी APAAR ID चा वापर

भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालय विविध उपक्रम राबवित आहे . ज्याद्वारे सर्व नागरिकांना फायदा होतो.  तुम्ही देखील कोणत्याही वर्गात किंवा अभ्यासक्रमात किंवा संस्थेत शिकत असाल तर तुम्ही APAAR आयडी नोंदणी पूर्ण करावी आणि ते कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी कार्ड डाउनलोड करावे.  

भारत सरकारने ABC बँक म्हणून ओळखली जाणारी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट लॉन्च केली आहे ज्यामध्ये स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी (APAAR) केली जाते आणि तुमचे खाते तयार केले जाते.  पोर्टल नुसार, विद्यार्थी गतिशीलता, शैक्षणिक लवचिकता आणि बरेच काही यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल.  विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि नंतर मोबाइल नंबर आणि पासवर्ड यांसारख्या मूलभूत तपशीलांचा वापर करून APAAR ID PDF @ abc.gov.in डाउनलोड करू शकतात.  जर तुम्हाला नोंदणी पूर्ण करायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि APAAR आयडी तयार करण्यासाठी डिजिलॉकर लॉगिन आयडी वापरावा.  ऑनलाइन नोंदणीसाठी पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे मूलभूत तपशील जसे की विद्यापीठाचे नाव, आधार कार्ड क्रमांक, विद्यार्थी आयडी आणि बरेच काही असल्याची खात्री करा.

✔APAAR आयडी अद्वितीय स्वरूपाचा असेल आणि एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी म्हणून सर्व वापराच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना ओळख देईल आणि विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत, राज्य इत्यादीमध्ये स्थानांतरित करणे सोपे होईल.



✔ हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या ओळखपत्रासह सक्षम करेल.

हा युनिक आयडी आजीवन असेल आणि शैक्षणिक संसाधनांमध्येही प्रवेश करण्यात मदत होईल


APAAR आयडी शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल


विद्यार्थ्यांचे;

✔APAAR आयडी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल


त्यांना मुख्य प्रवाहात आणणे;


✓ APAAR आयडी डिजीलॉकर इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यासाठी गेटवे असेल जे विद्यार्थ्यांच्या सर्व उपलब्धी जसे की परीक्षेचे निकाल, समग्र अहवाल कार्ड, आरोग्य कार्ड, शैक्षणिक परिणाम याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर उपलब्धी मग ते ऑलिम्पियाड, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण किंवा कोणतेही क्षेत्र डिजिटली संग्रहित करेल.


विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी क्रेडिट स्कोअर वापरू शकतात


भविष्यात उद्देश.


✓ APAAR आयडी अनेक वापराच्या प्रकरणांसाठी देखील वापरला जाईल उदा., NTA द्वारे घेतलेल्या प्रवेश चाचण्या, प्रवेश, शिष्यवृत्ती वितरण, सरकारी लाभ हस्तांतरण, पुरस्कार जारी करणे, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर वापरकर्त्यांसाठी मान्यता इ.


शासन आदेश पहा....




दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात औरंगाबाद ऐवजी "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरणे बाबत

 शासकीय/निमशासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात औरंगाबाद ऐवजी "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरणे बाबत.

संदर्भ -

 1 महाराष्ट्र शासन अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 364 दिनांक 15 सप्टेंबर 2023 संदर्भ


2. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र 2023 / प्राफेब/जमाबंदी/ कायी/1163 दि.18.09.2023 3. या कार्यालयाचे पत्र जाक्रजिप औ/ 04- प्रशासन/4012/2023 दिनांक 28/09/2023


4. महाराष्ट्र शासन, अधिसूचना राजपत्र असाधारण क्र 379 दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 5. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्रक्र झेडपीए-2023/प्र.क्र.108/पं.रा-1 दिनांक 12.10.2023


उपरोक्त विषयी संदर्भ क्र. च्या अधिसुचना अन्वये महसुली क्षेत्राचे नाव औरंगाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. तसेच संदर्भिय क्र 4 नुसार ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे अधिसुचना नुसार आदेशाचे दिनांकापासून जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे.


सबब संदर्भ क्र 5 अन्वये, जिल्हा परिषद "छत्रपती संभाजीनगर" अंतर्गत सर्व खाते प्रमुख कार्यालय प्रमुख गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, त्यानी त्यांच्या कार्यालयीन फलकावर तसेच दैनंदिन कामकाज व पत्रव्यवहारात "छत्रपती संभाजीनगर" हे नाव वापरावे त्याचप्रमाणे उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावीपणे करावी. असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे.

मुळ आदेश पहा....






भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

 भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र....

ज्या शाळेने माझ्या भविष्याची पायाभरणी केली, अशी माझी प्रिय शाळा दत्तक योजनेतून मला कुठल्याही परिस्थितीत चालवायला द्या. माझ्याकडे पैसे नाहीत, हवी तर माझी किडनी विका आणि शाळा माझ्याकडे सोपवा, अशी उद्विग्न मागणी भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.



सध्या त्यांनी लिहिलेले हे आगळेवेगळे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याच पत्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शासनाच्या शाळा दत्तक योजनेबद्दल सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयावरून राज्यभरात सरकारविरूद्ध टिकेची झोड उठली असून पालक, शिक्षक संघटनांनी नाराजीचा सूर व्यक्त करीत मोर्चे काढून, आंदोलने करून आपल्या संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सरकार मोठमोठ्या देणग्या घेवून त्यांची नावे शाळेला देणार आहे. इमारत दुरुस्ती,देखभाल, रंगरंगोटीसह, उपक्रम राबवायचे आहेत. सरकारी शाळा खासगी संस्थांच्या हातात सोपविण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रस्ताव मागवून शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेणार आहे. शाळा दत्तक घेतल्यानंतर देणगीदाराने त्याचे पालकत्व स्वीकारायचे आहे. गरजेनुसार वस्तू पुरविण्याची त्याची जबाबदारी असणार आहे. त्याने इच्छा व्यक्त केल्यास त्याचे नाव शाळेला देण्यात येणार आहे. सरकार गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात लोटत असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. 

नाव नको पण शाळा हवी

जागेश्वर पाल यांचे शिक्षण डी.एड व बी.एड. पर्यंत झाले आहे. परंतु, नोकरी नसल्याने ते घरची शेती सांभाळतात. ते उपसरपंच असून त्यांच्याकडे सध्या माडगी ग्रापंच्या सरपंचपदाची जबाबदारी आहे. त्यांना शेतीसह समाजकारण आणि शिक्षणातही रस् आहे. त्यांच्या मते सरकार देणग्या घेवून शाळा खासगी संस्थांना दिल्यामुळे जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमांच्या शाळांचे नुकसान होणार आहे. आपल्या गावची शाळा इतर कोणाच्या हातात देण्यापेक्षा ती मला माजी विद्यार्थी म्हणून चालवायला द्यावी. माझ्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी माझी किडनी विकायला तयार आहे, असे पाल यांनी म्हटले आहे.



स्टार्स प्रकल्प अंतर्गत संकलित चाचणी १ ली

 

यावर्षीच्या स्टार्स प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर आता संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक होऊ पाहत आहे या चाचणीचा वेळापत्रक आता   प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परीक्षेचे वेळापत्रक आपण खाली दिलेले पाहू शकतात



संकलित मुल्यमापन चाचणी (PAT)
विषयइयत्तादिनांक कालावधी गूण
तिसरी व चौथीसोमवार९० मिनिटे30
प्रथम भाषा (सर्व माध्यम) पाचवी व सहावी दि.३०/१०/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50
गणित सर्व माध्यमतिसरी व चौथीमंगळवार९० मिनिटे30
पाचवी व सहावी दि.३१/१०/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50
तृतीय भाषा (इंग्रजी )तिसरी व चौथीबुधवार९० मिनिटे30
पाचवी व सहावी दि.०१/११/२०२३९० मिनिटे40
सातवी व आठवी९० मिनिटे50