डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

 भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र....

ज्या शाळेने माझ्या भविष्याची पायाभरणी केली, अशी माझी प्रिय शाळा दत्तक योजनेतून मला कुठल्याही परिस्थितीत चालवायला द्या. माझ्याकडे पैसे नाहीत, हवी तर माझी किडनी विका आणि शाळा माझ्याकडे सोपवा, अशी उद्विग्न मागणी भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर पाल या उच्चशिक्षित सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.



सध्या त्यांनी लिहिलेले हे आगळेवेगळे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याच पत्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शासनाच्या शाळा दत्तक योजनेबद्दल सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयावरून राज्यभरात सरकारविरूद्ध टिकेची झोड उठली असून पालक, शिक्षक संघटनांनी नाराजीचा सूर व्यक्त करीत मोर्चे काढून, आंदोलने करून आपल्या संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सरकार मोठमोठ्या देणग्या घेवून त्यांची नावे शाळेला देणार आहे. इमारत दुरुस्ती,देखभाल, रंगरंगोटीसह, उपक्रम राबवायचे आहेत. सरकारी शाळा खासगी संस्थांच्या हातात सोपविण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रस्ताव मागवून शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेणार आहे. शाळा दत्तक घेतल्यानंतर देणगीदाराने त्याचे पालकत्व स्वीकारायचे आहे. गरजेनुसार वस्तू पुरविण्याची त्याची जबाबदारी असणार आहे. त्याने इच्छा व्यक्त केल्यास त्याचे नाव शाळेला देण्यात येणार आहे. सरकार गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात लोटत असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे. 

नाव नको पण शाळा हवी

जागेश्वर पाल यांचे शिक्षण डी.एड व बी.एड. पर्यंत झाले आहे. परंतु, नोकरी नसल्याने ते घरची शेती सांभाळतात. ते उपसरपंच असून त्यांच्याकडे सध्या माडगी ग्रापंच्या सरपंचपदाची जबाबदारी आहे. त्यांना शेतीसह समाजकारण आणि शिक्षणातही रस् आहे. त्यांच्या मते सरकार देणग्या घेवून शाळा खासगी संस्थांना दिल्यामुळे जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमांच्या शाळांचे नुकसान होणार आहे. आपल्या गावची शाळा इतर कोणाच्या हातात देण्यापेक्षा ती मला माजी विद्यार्थी म्हणून चालवायला द्यावी. माझ्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी माझी किडनी विकायला तयार आहे, असे पाल यांनी म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: