*चला सोपा करूया परिपाठ*
*दिवस 143 वा*
*संकल्पना व लेखिका*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
दिनांक.०४/०१/२०२४
भारतीय सौर १३, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.
वार:- गुरूवार
अयन-उत्तरायण
ऋतू - हेमंत ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's almanac
Date 04/01/2024
Indian Solar 13, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.
Day:-Tuesday
Ayana-Uttarayana
Ritu - Hemant Ritu
The holy month of Muslims "Jamadilakhar"
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
गुरुवार, 04 जानेवारी 2024
सूर्योदय 07:08,
खगोलीय दुपार: 12:39,
सूर्यास्त: 18:11,
दिवस कालावधी: 11:03,
रात्र कालावधी: 12:57.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*सुविचार*
कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध आहे.
दिनविशेष
२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
〉
२०१०: बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले.
१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.
〉
१८०९: आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म.(मृत्यू: ६ जानेवारी १८५२)
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
आजची म्हण
आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन डोळे.
:- अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळणे.
कोडे
काळ्या रानात हत्ती मेला त्याचा पृष्ठभाग उपसून नेला.
:-उत्तर कापूस
कोकणात ना आला रंगू कोळी
त्याने आणली भिंगू चोळी
शिंपी म्हणते शिवू कशी?
परटीन म्हणते धुवू कशी?
राणी म्हणते घालू कशी?
:-कागद
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान
०१) हत्तीरोग हा कोणता डास चावल्यामुळे होतो ?
- क्युलेक्स.
०२) साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना कोणते पुस्तक लिहिले ?
- श्यामची आई.
०३) वि.वा.शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे ?
- कुसुमाग्रज.
०४) राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो ?
- २८ फेब्रुवारी.
०५) भारताचा पहिला अवकाश यात्री कोण आहे ?
- राकेश शर्मा.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बोधकथा
एकदा एका नदीतुन दोन भांडे वाहत चालले होते.
एक भांडे मातीचे होते.
एक भांडे पितळेचे होते.
पितळी भांडे मातीच्या भांड्याला हाक मारून म्हणाले “बरं झालं तू तरी आहेस सोबत. नाहीतर जमिनीवर पोहचेपर्यंत एकट्याने फार कंटाळा आला असता. जरा जवळ ये, गप्पा मारूया.”
मातीचे भांडे म्हणाले “आपण जरा दूर राहिलेलंच बरं. तु म्हणतोयस ते ठीक आहे, पण एखादी लाट जोरात आली आणि आपण एकमेकांवर आपटलो तर माझे तर तुकडेच होतील. त्यापेक्षा कंटाळा आला तर हरकत नाही, पण जमिनीवर पोहचेन तरी.”
बोध:- स्वतःचे नुकसान होईल अशा व्यक्तीशी मैत्री करू नये.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती।।
करमुले तू गोविंदम। प्रभाते कर दर्शनम्।।
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's almanac
Dated.04/01/2024
Indian Solar 13, Paush Shaka 1945 (This date is according to the Indian Solar Calendar which is the official calendar of India.
War:- Thursday
Ayana-Uttarayana
Ritu - Hemant Ritu
The holy month of Muslims "Jamadilakhar"
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*Good Thought *
Fame is the fragrance of good deeds.
special day
2004: NASA's unmanned rover Spirit lands on Mars.
〉
2010: Burj Khalifa, the world's tallest building, is inaugurated.
1643: Birth of English scientist and philosopher Sir Isaac Newton.
〉
1809: Birth of Louis Braille, inventor of Braille for the blind (died: 6 January 1852)
Story
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Proverb
haste makes waste -अति घाई संकटात नेई
general knowledge
01) Elephantiasis is caused by the bite of which mosquito?
- Culex.
02) Which book did Sane Guruji write while in jail?
- Shyam's mother.
03) What is the nickname of V.V. Shirwadkar?
- Kusumagraj.
04) On which day is National Science Day?
- 28 February.
05) Who is India's first space traveler?
- Rakesh Sharma.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Story
Once there were two vessels flowing in a river.
A pot was made of clay.
One pot was made of brass.
The brass vessel called the earthen vessel and said, "Well, you are with me." Otherwise he would have been very bored alone till he reached the ground. Come closer, let's chat.”
The earthen pot said, “It is better that we stay away. That's fine you say, but if a wave hits and we crash into each other, I'll be blown to pieces. It's okay if I get bored, but I'll reach the ground."
Moral
:- Don't make friends with a person who will harm you.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚