डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस १४२ वा

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस 142 वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.०३/०१/२०२४ 

भारतीय सौर १२, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

वार:- बुधवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Today's almanac

Date 03/01/2024

 Indian Solar 12, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:-Tuesday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बुधवार, 03 जानेवारी 2024

सूर्योदय 07:08, 

खगोलीय दुपार: 12:39,

 सूर्यास्त: 18:10, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.


Good thought

Learning is never done without errors and defeat.” – Vladimir Lenin.


*दिनविशेष*

1.१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

2.१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.


3.जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन

4.मूलभूत कर्तव्यपालन दिन

5.महिला मुक्तीदिन

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*Day Special*

 1.1950: National Chemical Laboratory (NCL) inaugurated at Pune by Pandit Jawaharlal Nehru.

 2.1952: First national elections held in independent India.

 3. World Acupressure Therapy Day

 4. Basic Duty Day

 5. Women's Liberation Day

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष 3 जानेवारी

*सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन*


सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली जी भिडेवाडा येथे होती. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Special day 3 January

 *Savitribai Phule Jayanti Girl's Day*


 Savitribai Jotirao Phule was born on 3rd January 1831.  She was an Indian teacher, poet and social reformer.  She started the first girls' school in Asia which was located in Bhidewada.  Along with her husband Mahatma Jotirao Phule, she laid the foundation of women's education in the early stages of women's education in Maharashtra.  She has written a famous poem on his village Naigaon.  She spread education among women and Shudras and was the first headmistress in India.

She organized a strike of barbers in Pune to stop the beheading of widows.  Since 1995, Savitribai's birthday, 3rd January, has been celebrated as "Balikadin" in gratitude for Savitribai's social work.  Savitribai participated in all the activities of Savitribai Jotiba and her motto was that women should learn.  It was also her purview to seek shelter for orphans.  Her initiative was in social work.  That is why she worked hard during the famine of 1876-77.  Later, in 1897, when there was a terrible outbreak of plague, she worked for the plague victims regardless of his own health.  Unfortunately, she herself became a victim of the dreaded plague.  She died due to plague.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*

मूर्ख लांडगा

एकदा रात्री एका बाईचे हट्टी मूल फार रडू लागले. त्याला शांत करण्यासाठी आईने फार प्रयत्‍न केले, पण ते ऐकेना. शेवटी भीती दाखवावी म्हणून ती मुलाला म्हणाली, जर तू गप्प झाला नाहीस तर तुला दारात आलेल्या लांडग्याला देऊन टाकेन.' त्याच वेळी एक लांडगा खरोखरच दाराशी आला होता. त्याने बोलणे ऐकले व बोलल्याप्रमाणे आई मुलाला आपल्या स्वाधीन करेल अशा आशेने तो तेथेच थांबला. शेवटी मूल रडून थकले व झोपी गेले. मग त्या लांडग्याला उपाशीच रानात जावे लागले. वाटेत त्याला कोल्हा भेटला, त्याने विचारले, 'मित्रा, तू ठीक आहेस ना?' लांडगा म्हणाला, 'अरे मित्रा, ते काही विचारू नकोस. मी वेडा एका बाईचं खोटं बोलणं खरं मानून फसलो नि सगळी रात्र उपास आणि जागरण करून कंटाळून गेलो.'


तात्पर्य


- एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दावर विश्वास ठेवू नये, त्या शब्दांचा मागचा पुढचा संबंध काय आहे हे लक्षात न घेणे मूर्खपणाचे होय.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*Parable*

 stupid wolf

 One night a woman's stubborn child started crying a lot.  His mother tried hard to calm him down, but he would not listen.  Finally, to show fear, she said to the boy, "If you don't shut up, I will give you to the wolf who comes to the door."  At the same time a wolf had indeed come to the door.  He heard the talk and stayed there hoping that the mother would hand the child over to him as she was told.  Finally the child got tired of crying and fell asleep.  Then the wolf had to starve into the forest.  On the way he met a fox, he asked, 'Friend, are you all right?'  'Oh friend, don't ask that,' said the wolf.  I was fooled by the lies of a mad woman and got tired of fasting and staying awake all night.'


meaning


 - It is foolish not to believe a word that comes out of someone's speech, not to consider the connection between those words.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व अर्थ*/Proverb

अति राग भीक माग

passion leads to poverty

:-क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


*कोडे*

कोंबडी देते अंडी, गाय देते दूध,

पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?


=> दुकानदार


*puzzle*

 Chicken gives eggs, cow gives milk,

 But who is there who gives both milk and eggs?


 => Shopkeeper

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सामान्य ज्ञान प्रश्न*

1 जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?


=> उत्तरः आशिया


2  इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला?


=> उत्तर: थॉमस अल्वा एडिसन


3 कोणाची आठवण म्हणून नोबेल पारितोषिक दिले जाते?


=> उत्तरः अल्फ्रेड नोबेल


4 वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात?


=> उत्तरः फेब्रुवारी


5  दोन दिवस म्हणे किती तास?


=> उत्तर: 48 तास (24 + 24)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*General Knowledge Questions*

 1 What is the largest continent in the world?


 => Answer: Asia


 2 Who invented the electric bulb?


 => Answer: Thomas Alva Edison


 3 Nobel Prize is given in memory of whom?


 => Answer: Alfred Nobel


 4 Which month of the year has the fewest days?


 => Answer: February


 5 How many hours are two days?


 => Answer: 48 hours (24 + 24)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। 

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

अर्थ:-जीवांच्या आत्म्याला शस्त्रे  कापू शकत नाहीत आणि आग त्याला जाळू शकत नाहीत

 ते पाण्याने ओले होत नाही किंवा वाऱ्याने सुकत नाही

 Meaning

Weapons cannot pierce the soul, fire cannot burn it, water cannot wet it, and the wind cannot dry it.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: