जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन २०२४.
जुनी पेन्शन संघटनेची सहविचार सभा संपन्न|nps-pension|
दिनांक 23 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची सहविचार सभा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था या ठिकाणी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री वितेश खांडेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ,
या सहविचार सभेत राज्य सचिव गोविंद उगले, राज्य सल्लागार सुनिल दुधे,राज्य कोष्यध्यक्ष मिलिंद सोळंखी, यांच्या उपस्थितीत खालील ठराव सर्वांनोमते मान्य करण्यात आले.
● `ठराव क्रमांक १:-` महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अधिवेशन.
● `ठराव क्रमांक:- २` जिल्हास्तरावर धरणे, मोर्चे काढणे. (कालावधी ५ जुलै ते १५ जुलै)
● `ठराव क्रमांक:- ३` Vote for Ops प्रशिक्षण जिल्हास्तरावर आयोजित करणे.
● `ठराव क्रमांक:- ४` सर्व संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन संप संदर्भात नियोजन करून पुढील कार्यवाही करणे.
● `ठराव क्रमांक:- ५` कुटुंब निवृत्ती योजना सर्वच विभागात लागू करण्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर कार्यवाही करणे.
● `ठराव क्रमांक:- ६` नवनियुक्त खासदार यांना अभिनंदन पत्र देऊन सत्कार करून पेन्शन संदर्भात निवेदन देणे.
● `ठराव क्रमांक:-७` सर्व आमदार यांना तालुका अध्यक्ष यांच्यामार्फत Vote for ops चे निवेदन देणे. (निवेदनाचा नमुना राज्य कार्यकारणी देईल.)
● `ठराव क्रमांक:- ८` संघटनेत बहुमताने घेतलेले निर्णय सर्वांना मान्य असतील.
● `ठराव क्रमांक:-९` संघर्ष निधी ५०० रुपये असेल (त्यात तालुका १५० जिल्हा १५० राज्य २००)
● `ठराव क्रमांक:- १०` कोणत्याही राजकीय पक्षाने जुनी पेन्शन हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात नाही घेतला तर कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्य यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार व संपूर्ण संघटना त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार.
● `ठराव क्रमांक:-११` अभिनंदनचा ठराव:-१
_सर्व संघटना सदस्य यांनी Vote for ops अभियान प्रभावीपणे राबवले व त्यामुळे जे परिवर्तन महाराष्ट्रात दिसून आले त्याबद्दल सर्व सदस्य यांचा अभिनंदनचा ठराव मान्य केला._
_२) जिल्हा परिषद सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आदर्श बदल्या करून राज्यात दिशा देणारे कार्य केले व ते कार्य जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी करून घेतले त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाध्यक्ष यांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला._
● `ठराव क्रमांक:- १२` अद्याप ज्या जिल्हाध्यक्ष यांनी राज्यास निधी दिला नाही त्यांनी १ जुलै २०२४ पर्यंत निधी जमा करावा. ही तिसरी सूचना देण्यात येत आहे अद्याप ज्या जिल्हाध्यक्ष यांनी काहीच निधी दिला नाही त्यांच्यावर कार्यवाही करावी असा ठराव पारित झाला.
● `ठराव क्रमांक:- १३` वारंवार बैठकीस अनुपस्थित राज्य पदाधिकारी तसेच सक्रिय कार्य न करणारे पदाधिकारी यांना कार्यमुक्त करून इतर विभागातील सक्रिय पेंशन शिलेदार यांना राज्य कार्यकारणी मध्ये सहभागी करून घ्यावे.
● `ठराव क्रमांक:- १४` सोशल मीडिया राज्य, जिल्हा व तालुका टीम बैठक घेऊन सोशल मीडिया सक्षम करणे.
● `ठराव क्रमांक:-१५` राज्य पदाधिकारी या पदावर नियुक्ती देताना संबंधित पेन्शन शिलेदार याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेत जिल्हा अथवा विभाग स्तरावर किमान पाच वर्षे काम केलेले असावे.
● `ठराव क्रमांक:- १६` सर्व जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लक्षात घेता जिल्हा निवडणूक प्रभारी पद निर्माण करावे. (सदरील पद हे फक्त विधानसभा निवडणूक पर्यंत मर्यादित असेल)
● `ठराव क्रमांक:- १७` राज्य प्रसिद्धी प्रमुख यांनी संघटन विरोधी कार्यवाही केल्यामुळे संबंधितास राज्य प्रसिद्धीप्रमुख या पदावरून कमी करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वांनमते घेण्यात आला आहे. आरोग्य प्रमुख या पदाचा राजीनामा आला असता तो सद्यस्थितीत ना मंजूर करण्यात आला आहे.
या सहविचार सभेसाठी राज्य,विभाग व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
गोविंद उगले,राज्य सरचिटणीस
९७३०९४८०८१
*`महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.`*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
शिक्षकांचे समायोजन होणार | teachers-jobs-transfer|
महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या शाळेमधील शिक्षकांचे समायोजन करणे बाबत.
उपरोक्त विषयास अनुसरून मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावामधील जि.प.प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक २४/०६/२०२४ रोजी पदवीधर व मुख्याध्यापक यांचे समुपदेशनाने समायोजन करणेत येणार आहे. तसेच दिनांक २६/०६/२०२४ रोजी उपशिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन करणेत येणार आहे. तरी सदरचे समुपदेशन मा. शरदचंद्रजी पवार सभागृह जिल्हा परिषद पुणे पहिला मजला येथे सकाळी ९.०० ते ५.०० या वेळेत होणार आहे.
तरी समुपदेशनासाठी संबधित उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्यध्यापक यांना लेखी कळवुन त्यांच्या पोहच घेऊन या कार्यालयास सादर करणेत बाबतची कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार| teachers-awards|
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.
संदर्भ : १. शासन निर्णय क. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/ टीएनटी-४ दि.२८/०६/२०२२. २. शासन पत्र क्र.पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४ दि.१०/०६/२०२४.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने
सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAju7 या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५जुलै, २०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.
सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.